राकूटेन कंपनीने 5580 कोटीत विकत घेतले व्हाइबर स्मार्टफोन अॅप
Viber Messaging App Logo जपानी कंपनी राकूटेने लोकप्रिय व्हाइस आणि मॅसेजिंग अॅप व्हाइबर 5580 कोटी रूपयांत विकत घेतले आहे. भारतासोबतच ...
Viber Messaging App Logo जपानी कंपनी राकूटेने लोकप्रिय व्हाइस आणि मॅसेजिंग अॅप व्हाइबर 5580 कोटी रूपयांत विकत घेतले आहे. भारतासोबतच ...
मोबाइलवरून करण्यात येणाऱ्या मेसेजच्यादेवाणघेवाणीचे स्वरूप पुरते पालटून टाकणाऱ्याव्हॉट्सअॅपची लोकप्रियता व उपयोग भारतातही प्रचंडवेगाने वाढत असून , या अॅपचा वापर करणाऱ्यांचाआकडा तब्बल तीन कोटीवर पोहोचला आहे . इंटरनेट सुविधा असलेल्या फोनच्या , स्मार्ट फोनच्यावाढत्या वापरासोबत पारंपरिक एसएमएस सुविधेचावापर झपाट्याने कमी होत चालला असून , त्याची जागाव्हॉट्सअॅप , लाइन , हाइक , चॅटऑन , ब्लॅकबेरीबीबीएम अशा भिडूंनी घेतली आहे . त्यातही व्हॉट्सअॅपने घेतलेली आघाडी मोठी आहे . ऑगस्ट महिन्यात भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या दोन कोटीच्या घरात होता . केवळ महिनाभराच्याकाळात त्यात तब्बल एक कोटीची भर पडून हा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे . व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांचीजगभरातील एकूण संख्या सुमारे ३० कोटी आहे . याचाच अर्थ जगभरातील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांपैकी १० टक्केलोक भारतात आहेत . व्हॉट्सअॅपची ही कमालीच्या वेगाने वाढत असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन विविध मोबाइल कंपन्याही त्याचालाभ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत . आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅपच्या जोडीनेआकर्षक पॅकेज देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे . येत्या काळात विविध कंपन्यांत याबाबत मोठी स्पर्धा दिसेल ,अशी चिन्हे आहेत .
भारतासह जगभरातील मोबाइलच्या बाजारपेठेत आलेली अँड्रॉइडची लाट , आयफोनविषयीचे वाढते आकर्षण आणि व्हॉट्स अॅपचं प्रस्थ वाढत चालल्याचं पाहून ब्लॅकबेरीने बीबीएमची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनच्या ओएससाठी दिली आहे . आपल्या अनोख्या फिचर्सच्या जोरावर एकेकाळी स्मार्टफोन म्हणून बिरुद मिरवणाऱ्या ब्लॅकबेरीने पुन्हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ब्लॅकबेरीला हे पाऊल उचलावे लागले आहे . To download Go To >>>> bbm.com अँड्रॉइड युझर्सना गुगल प्लेवरुन इतर अॅप्लिकेशनप्रमाणे बीबीएम डाऊनलोड करता येणार असून आयस्टोर वरुन आयफोनमध्ये हे अॅप डाऊनलोड करता येईल लॉन्चिगनंतर काही तासांतच हजारोंच्या संख्येने अँड्रॉइड मोबाईल यूझर्सने गुगल प्लेवरून बीबीएम डाऊनलोड केले असून बीबीएम पीन शेअरिंगही सुरु झाले आहे . मात्र काही वेळातच अनेक यूझर्सने बीबीएम डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केल्याने कंपनीने एक व्हर्च्युअल वेटिंग लिस्ट तयार केली असून सर्व्हरवरील जागा खाली होईल त्याप्रमाणे लोकांना ईमेल द्वारे माहिती देऊन बीबीएम डाऊनलोड करण्याची माहिती देण्यात येत आहे . बीबीएममध्ये तुम्ही एका यूझरशी किंवा ग्रुपमध्ये चॅट करू शकता . एका ग्रुपमध्ये ३० व्यक्तींचा समावेश करतायेईल . कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीशीही चॅट करता येईल . त्यासाठी तुम्ही सध्या चॅट करत असलेल्याव्यक्तीने तुम्हाला त्या कॉन्टॅक्टशी चॅटसाठी आमंत्रण द्यावे लागेल . यामध्ये तुम्ही टेक्स्ट , व्हॉइस नोट , चित्र ,सिम्बॉल्स शेअर करू शकतात . मात्र व्हॉट्स अॅप , लाइन प्रमाणे बीबीएममध्ये व्हीडिओ फाइल शेअर करता येत नाही .
अपडेट : ३०-१२ -२०१३ आता भारतीय तिरंगा उपलब्ध हाय गुड मॉर्निंग, व्हॉट्सअॅप ब्रो?... व्हॉट्सअॅपवर हा नित्यनेमाने फिरणारा मेसेज. पण गेल्या ...
स्मार्ट फोनमुळे मेसेंजरपासून ते जीटॉकपर्यंत सर्व काही आपल्या हातात आले आहे. बरेच पर्याय उपलब्ध असल्यामुळे नेमके काय आणि कशा प्रकारे ...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech