व्हॉट्सअॅपच्या संदेश पाठवल्यावर डिलिट करण्याच्या सुविधेत नवा बदल!
मागील वर्षी व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांना पाठविलेला संदेश डिलीट करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती त्याअंतर्गत सुरवातीस ७ मिनिटांपर्यंत संदेश मागे घेता ...
मागील वर्षी व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांना पाठविलेला संदेश डिलीट करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती त्याअंतर्गत सुरवातीस ७ मिनिटांपर्यंत संदेश मागे घेता ...
भारतीय भाषांमध्ये व्हिडीओ, विनोद, Quotes असा कंटेंट उपलब्ध करून देणाऱ्या सोशल प्लॅटफॉर्म शेअरचॅट (ShareChat) या अॅपने नुकतेच ७२० कोटींचं ($100 Million) भांडवल उभं केलं ...
मोबाइल व ई - मेल हे संवादाचे उत्तम माध्यम बनले असले ,तरी त्यातही आपणच आपल्याला कुणाच्याही नावे बनावटमेसेजेस करण्याची नवी अॅप्स बाजारात आली आहेत .संशयाने पोखरलेले कौटुंबिक नातेसंबंध किंवा व्यावसायिकअसूया यांच्यात मोबाइल - ईमेलवरील अशा माध्यमांचावापर वाढला असल्याने फेक मेसेजेसच्या अॅप्लिकेशनची त्यातनवी भर पडेल , अशी भीती तज्ज्ञांना वाटते . आपणच स्वतःला तिऱ्हाईतांच्या नावे ई - मेल करायचे आणित्यांचा भांडणतंटे किंवा व्यावसायिक काटाकाटीत पुरावाम्हणून वापर करायचा , असे प्रकार काही प्रकरणात उघडझाले आहेत . अशा प्रकारांमध्ये इंटरनेटवरील प्रॉक्सीसर्व्हरचा वापर केला जातो . हे सर्व्हर नायजेरिया , इंग्लंडआदी देशांमध्ये असल्याने भारतातील सायबर पोलिसांनागुन्हेगारापर्यंत पोहोचणे अशक्य बनते . आश्चर्य म्हणजे ,प्रत्यक्षात हा गुन्हेगार भारतातूनच फेक संदेशांचे व्यवहारकरीत असतो . काही पेड किंवा अनपेड वेबसाइट्सवरूनहीस्वतःच स्वतःला तिऱ्हाईत व्यक्तींच्या नावे ई - मेल करण्याचीसुविधा उपलब्ध होते . त्याचाही गैरवापर होत असतो , असेगुप्तवार्ता अधिकाऱ्यांना तपासात आढळले आहे . काहीदिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने तपास केलेल्या एका प्रकरणात एक बडी खासगी बँक बंदहोत असल्याच्या अफवा फेक संदेशाद्वारे पसरविण्यात आल्या होत्या . ठेवीदार खात्यातील पैसे काढू लागल्यावरत्यावर प्रकाश पडला होता . या माध्यमांमध्ये स्मार्टफोनसाठी उपलब्ध झालेल्या फेक मेसेजेस या अॅपची भर पडली आहे . यात इनकमिंग आणिआऊटगोइंग असे दोन्ही मेसेजेस कुणाच्याही नावे बनावट स्वरुपात तयार करण्याची सोय आहे . केवळ हे मेसेजेसतिऱ्हाइत व्यक्तीपर्यंत पाठविले जात नाहीत , इतकेच . केवळ मेसेजेस नव्हे तर कॉलच्या वेळा , आदी तपशीलांचेबनावट रेकॉर्ड तयार करण्याचे तंत्रही या अॅपमध्ये असते . अलीकडे पती - पत्नींमधील बिघडलेले संबंध आणि संशयाचे गढूळ वातावरण यांच्यात मोबाइलवरील मेसेजेसचावेगवेगळे दावे - प्रतिदावे करण्यासाठी उपयोग केला जातो . हे प्रमाण आता वाढल्याचे सायबर डिटेक्टिव्ह तज्ज्ञसांगतात . त्याचप्रमाणे दोन व्यवसाय भागीदारांमध्येही मोबाइल संभाषणांचा , कॉल रेकॉर्ड्सचा वापर केला जातो. एकमेकांमधले फेक मेसेजेस क्लायंटना दाखविल्यास त्यांचा त्यावर विश्वास बसू शकतो . पोलिस किंवा कोर्टाकडून या प्रकरणांच्या चौकशीचे आदेश आल्यास मोबाइल कंपन्यांमार्फत कॉलरेकॉर्ड्सचीखातरजमा होऊ शकते . पण प्रकरणे पोलिसांपर्यंत जाण्यापूर्वीच मेसेजेस , कॉल्सचे लॉग यांच्यावरून बिघडलेल्यानातेसंबंधांना तणावाचे नवे कारण मिळालेले असते . फेक मेसेजेस हे अशा प्रकारे दिशाभूल करू शकतात . त्यांचागैरवापर होऊ शकतो किंवा त्यातून नाहक गोंधळही उडू शकतो .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech