जीमेलचे ‘स्पेस मॅनेजमेंट’
गुगल कंपनीच्या जीमेल या फ्री मेल सर्व्हिसने जागतिक पातळीवर फ्री ई - मेलची व्याख्याच बदलून टाकली. हॉटमेल , याहू यासारख्या मोफत ई - मेल सुविधा देत असललेल्या कंपन्या गुगलच्या जी - मेल या सर्व्हिसच्या तुलनेत मागे पडल्या . कोणतीही ब्लिंग होणार ई - मेलच्या पेजवर नसणारी अॅड , भारंभार लिस्टिंग हे जी -मेलमध्ये नसल्याने आणि यावरून डेटा पाठविता येण्याची क्षमता यांच्यामुळे यूजर हळूहळू गुगल या कंपनीच्या जी- मेल या सर्व्हिसकडे वळाले . जागतिक पातळीवरील लोकांचा कल ज्याप्रमाणे जीमेलकडे झाला , तसाच काहीसा अनुभव भारतात आला आहे . जी - मेल ही फ्री ईमेल वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे . यूजरना जी - मेलच्याबाबतीत काहीना काही नवीन देण्याचा प्रयत्न या गुगलकडून होतो . कंपनीने जी - मेलमध्ये नुकतेच मोठे बदल करणार असल्याची घोषणा केली . त्यानुसार फाइल अॅटॅचमेंटची क्षमता २५ एमबीवरून १० जीबी करण्यातयेणार आहे . ...