तुमचा आयफोन, आयपॅड किंवा आयपॉड टच करा अपडेट
सध्या तुम्ही आयफोन , आयपॅड किंवा आयपॉड टच वापरत असाल आणि आयफोन ५ वापरण्याची तुमची इच्छा असेल पण घेण्याची तयारी नसेल तर ...
सध्या तुम्ही आयफोन , आयपॅड किंवा आयपॉड टच वापरत असाल आणि आयफोन ५ वापरण्याची तुमची इच्छा असेल पण घेण्याची तयारी नसेल तर ...
माटुंगा रेल्वे स्टेशन कुठे आहे ? असा प्रश्न मुंबईतील शेंबड्या पोराला जरी विचारला तरी तो त्याचे उत्तर देईल . मात्र जर कोणी तुम्हाला सांगितले की माटुंगा स्टेशन अरबी समुद्रात आहे तर तुम्ही मुर्खात काढाल . पण अॅपल कंपनीच्या आयफोन ५ मध्ये हा प्रकार घडला आहे . आयफोन ५ साठी अॅपल कंपनीने तयार केलेल्या अॅपल मॅप्सया अॅप्लीकेशनमध्ये माटुंगा स्टेशनची नोंद अरबी समुद्रात झाली आहे . मुंबईची शान असणारा वांद्रे वरळी सागरी सेतूया अॅपमध्ये अस्तित्वातच नाही . सर्वाधिक आधुनिक म्हणून ओळखल्या जाणा- या या अॅपल मॅप्समध्ये मुंबईतील अनेक रेल्वे स्टेशनची नोंद झालेली नाही . काही स्टेशन तर मूळ जागेपेक्षा खूप दूर असल्याचे दाखवण्यात आले आहे . अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्येही ( आयओएस सहा ) अनेक दोष आढळले आहेत . आयफोन ५ हा स्टिव्ह जॉब्ज यांच्या मृत्यूनंतर अॅपलने तयार केलेला पहिला स्मार्ट फोन आहे . या फोनच्या सॉफ्टवेअरसाठी जॉब्ज यांचे मार्गदर्शन मिळालेले नाही . त्याचा फटका आयफोन ५ ला बसल्याची शक्यता व्यक्तहोत आहे .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech