इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ‘ मायक्रोसॉफ्ट ‘
टेक्नॉलॉजी हा बदलता आणि सतत संधोधनाचा विषय आहे .टेक्नॉलॉजीमघील काही घडामोडी आणि संशोधन पाहिले , की हा ' जादूचाच कारखाना ' वाटावा , इतक्याघडामोडी अत्यंत वेगाने घडताना दिसत आहेत . स्मार्टफोन क्षेत्रात सध्या जी तीव्र स्पर्धा चालू आहे , त्यातून थोडेसेबाहेर डोकावून पाहिले , की सॉफ्टवेअर क्षेत्रातही नवनवे संशोधन चालू आहे आणि त्यासाठी अब्जावधी रुपयांचानिधी खर्च केला जात आहे , हे लक्षात येते . ' मायक्रोसॉफ्ट ' लवकरच ' इंटरॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ' लाँच करणारआहे . या प्रॉडक्टची तयारी कंपनीत सध्या जोरात चालू आहे . ' लार्ज स्क्रीन टेक्नॉलॉजी ' प्रकारात हे संशोधन येत असून अशा प्रकारची विविध संशोधने कंपनीमध्ये चालू आहेत . ' मायक्रोसॉफ्ट ' कंपनी तयार करत असलेल्या या संवादात्मक बोर्डमुळे लोकांशी ' संवाद ' साधणे सोपे होणार आहे. हा संवाद म्हणजे संभाषण नव्हे , तर तो असेल प्रेझेंटेशनरूपी संवाद आणि त्यासाठी मदत होणार आहे स्केचेसची. युझरने काही स्केचेस काढले , तर त्यावरून पूर्ण ग्राफिक , चार्ट पूर्ण करता येईल . घरी , ऑफिसमध्ये ; तसेचजवळपास सगळ्याच ठिकाणी या ' इंटरअॅक्टिव्ह व्हाइटबोर्ड ' चा वापर करता येईल . यूझरना त्यांना हव्याअसलेल्या डायग्राम्स तयार करता येतील . प्रेझेंटेशन अधिकाधिक ' इंटरअॅक्टिव्ह ' करण्यासाठी याचा उपयोगहोईल . सध्या ' मायक्रोसॉफ्ट ' चेच पॉवरपॉइंट हे सॉफ्टवेअर प्रेझेंटेशनसाठी अनेक ठिकाणी वापरले जाते . ' टेकफेस्ट ' या कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या मेळ्यामध्ये हे संशोधन सादर होईल . या ठिकाणी अनेक देशांतील शास्त्रज्ञत्यांचे संशोधन सादर करतात . ' मायक्रोसॉफ्ट ' ही आपले नवीन संशोधन सादर करणार आहे . वर्षातून एकदाहोणाऱ्या या ' टेकफेस्ट ' मध्ये व्हाइटबोर्डचे प्रोटोटाइप सादर केले जाणार आहे . या संशोधनासाठी कंपनीने इतरकंपन्यांच्या तुलनेत मोठा निधी खर्च केला आहे . अब्जावधी डॉलरची गुंतवणूक या संशोधनामागे आहे . ' टेकफेस्ट ' मध्ये या बोर्डाचे प्रत्यक्ष काम कंपनीच्या वॉशिंग्टनमधील रेडमंड येथील हेडक्वार्टरच्या बोंगशिन लीसादर करतील . एका मोठ्या टचस्क्रीनवर एक इमेज काढली जाईल . ही इमेज आणि प्री - लोडेड डेटा यांचावापर करून ग्राफिक , चार्ट , डायग्राम , नकाशे तयार करता येतील . यासाठी ' डिजिटल कॅनव्हास ' तयार केलाआहे . हा बोर्ड बनवण्याचे काम मायक्रोसॉफ्ट करत असून ' लार्ज स्क्रीन टेक्नॉलॉजी ' मध्ये कंपनी करत असलेल्याअनेक प्रयोगांपैकी हा एक आहे . मायक्रोसॉफ्टच्या या प्रयत्नाला यश आले , तर तंत्रज्ञानामधील ती एक मोठीअचिव्हमेंट ठरणार आहे .