गॅजेट चार्ज करणारा स्टोव्ह
मोबाइल किंवा गॅजेटशिवाय वीकेंडला बाहेर जाण्याची कल्पनाही करवत नाही ना? पण निसर्गरम्य वातावरणात लाकडे टाकून स्टोव्हवर स्वयंपाक करत असतानाच तुमचा ...
मोबाइल किंवा गॅजेटशिवाय वीकेंडला बाहेर जाण्याची कल्पनाही करवत नाही ना? पण निसर्गरम्य वातावरणात लाकडे टाकून स्टोव्हवर स्वयंपाक करत असतानाच तुमचा ...
मोबाइल , टॅबलेट , लॅपटॉप खराब झाला , चोरीला गेला ,हरवला तर नवीन घेणे आपसूकच येते . पण काहींना नवेकोरे गॅजेटही अपडेट करण्याची घाई झालेली असते . केवळ काही मोजक्या फिचर्सकडे आकर्षित होऊन हा निर्णय घेतला जातो . हे अपडेशन करताना बरेच पैसेही खर्च केले जातात . पण खरंच त्यांची गरज आहे का ? हा विचार केला जात नाही . अशांसाठी तुमचे गॅजेट अपडेट केव्हा करायचे याच्या टिप्स ... सर्वसाधारणपणे कुठल्याही उपकरणात ३ - ४ वर्षाच्या कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात बदल होतात . सामान्य नागरिकांनी तेव्हाच त्यात बदल करावा , असा सल्ला गार्टनरचे विश्लेषक मायकेल गार्टेनबर्ग यांनी दिला आहे .सुरुवातीच्या काळात लॅपटॉपही लोकांना हँडी वाटत होते . आता अल्ट्रा बुक आल्यावर त्याची गरज वाटू लागली .किंवा २जी आणि ३जी मोबाइलमधील फरकही स्विकारण्यासारखा आहे . पण थोडेफार बदल केलेलं मॉडेल , कमी- जास्त फिचर्स , कलर्स यासारख्या गोष्टींसाठी बदल करणे तितकेसे परवडणारे नाही . नवीन गॅजेट घेताना एक सूत्र कायम लक्षात ठेवायला हवे की , तुम्ही त्यासाठी मोजलेला पैसा पूर्ण वसूल झाला आहे याची खात्री तुम्हाला पटायला हवी . स्मार्टफोन : प्रवासात मेल चेक करण्यासाठी तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर तीनेक वर्ष तुम्ही तो अपडेट केला नाही तरी चालेल . पण सदासर्वदा तुम्ही स्मार्टफोनसोबत राहत असाल तर मग तुम्ही २० महिन्यात फोन अपडेट करण्याची गरज आहे . काही मोबाइल कंपन्यांच्या सिमकार्डसोबतच हँडसेटही विकतात . काही महिन्यांनी पुन्हा त्यांच्याकडे नवीन मॉडेल आलेले असते . पण अशावेळी जुन्या मॉडेलची गरज खरंच संपली का , नव्या हँडसेटसाठी किंमत मोजावी एवढे अपडेट्स त्यात आहेत का हे प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे . टॅबलेट : टॅबलेट्सचा प्रमुख सर्फिंग , वापर गेम खेळणे , इ - बुक वाचन किंवा चित्रपट पाहण्यासाठी केला जातो .त्यामुळे तो वारंवार अपग्रेड करू नये असा सल्ला तज्ञ देतात . मॅकरुमर्स साइटचे संस्थापक अरनॉल्ड किम म्हणतात, आयपॅडच्या प्रत्येक नव्या मॉडेलमध्ये फारसे काही मोठे बदल नसतात . त्यामुळे तुमचा जुना आयपॅडच चांगलाआहे . आणि कितीही म्हटलं तरी मोबाइल , टॅबलेट आणि लॅपटॉप परस्परांचं काम पूर्ण क्षमतेने करू शकत नाही .त्यामुळे प्रत्येकाची गरज ही भासतेच . लॅपटॉप : तुमचा दिवसातील पूर्ण वेळ लॅपटॉपसमोर जात असेल तर दर ३ वर्षांनी तुम्ही नवा लॅपटॉप घेण्यास हरकत नाही . पण दिवसातील काही तास किंवा फक्त फेसबुक , ट्विटर , चॅटिंगसाठी तुम्हाला लॅपटॉपची गरज असेल तर सध्या वापरत असलेला लॅपटॉप काय वाईट आहे ? किंवा सरळ कम्प्युटर वापरा . कम्युटरचा एखादा पार्ट खराब झाला तर बदलता येतो . स्पीड कमी झाला असेल तर रॅम वाढवून घ्या . संपूर्ण लॅपटॉपच बदलण्यापेक्षा ते कधीही परवडते . ....................................... -------महाराष्ट्र टाइम्स
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech