ब्रिटिश फेसबुकला कंटाळले!
कुठल्याही गोष्टीचा एक काळ असतो. त्यानंतर सर्वच जण त्याला कंटाळतात.तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर ही वेळ फारच लवकर येते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी ...
कुठल्याही गोष्टीचा एक काळ असतो. त्यानंतर सर्वच जण त्याला कंटाळतात.तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर ही वेळ फारच लवकर येते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी ...
एखाद्या गोष्टीची सवय झाली , की नवे काही स्वीकारायला आपले मन तयार होत नाही. इंटरनेटवर सर्च इंजिनचा वापर करण्याच्या झालेल्या सवयीमुळे दुसऱ्या ...
एसएमएसपाठोपाठ फेसबुकने आता मोफत व्हॉइल कॉलिंगचीसुविधाही देण्याची तयारी सुरू केली आहे . सध्या कॅनडातीलस्मार्टफोन युझर्सना ही सुविधा देण्यात येत आहे . फेसबुक मेसेंजर अॅप अपडेट केलेल्यांना या माध्यमातून व्हॉइसओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल ( व्हीओआयपी ) सुविधा देण्यात येत आहे . फेसबुकने तीन जानेवारीपासून अपडेट केलेल्या मेसेंजर अॅपच्या माध्यमातून जगभरातील युझर्सना व्हॉइस मेसेजपाठविण्याची सुविधा देऊ केली आहे . या माध्यमातून व्हाइस मेसेज पाठविण्यासाठी + बटन प्रेस केल्यानंतरव्हॉइस मेसेज पाठविण्याची सुविधा सुरू होते . यात रेकॉर्ड बटन प्रेस ठेवल्यापासून रेकॉर्डिंग सुरू होते व त्याबटनावरून हात बाजूला केल्यास रेकॉर्डिंग बंद होते आणि मेसेज पाठवला जातो . बोट स्लाइड केल्यानंतर मेसेजरद्द करता येतो . याचबरोबर कंपनीने इंटरनेटवरून मोफत व्हॉइस कॉल देण्याचीही सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीनेपावले टाकायला सुरुवात केली आहे . सध्या कॅनडातील आयफोन युझर्सवर या सुविधेची चाचणी घेण्यात येत आहे. त्यात अॅपवरील ' आय ' प्रेस केल्यावर फ्री कॉलचा पर्याय निवडता येतो . फेसबुक या कॉलसाठी कुठलेही शुल्कघेत नसले , तरी यासाठी युझरच्या डेटा प्लॅनमधील डेटा वापरला जातो . त्यामुळे रूढार्थाने यासाठी कुठलेही शुल्कद्यावे लागत नसले , तरी डेटा मात्र वापरला जातो आहे . सध्या सुमारे एक अब्ज ७ लाख फेसबुक युझर्स असून त्यापैकी ६० कोटी यूझर्स मोबाइलवरून फेसबुक वापरतात .त्यातील सुमारे ४७ कोटी लोक अॅपच्या माध्यमातून फेसबुक वापरतात आणि उर्वरित फेसबुकची मोबाइल व्हर्जनवापरतात . सुमारे १४ कोटी आयफोन युझर्स तर साडेचार कोटी आयपॅड युझर्स आयपॅडवरून फेसबुक वापरतात .त्यामुळेच सुरुवातीला कंपनीने त्यांच्यासाठी हे व्हर्जन चाचणीसाठी उपलब्ध करून दिले असावे , असा अंदाज आहे. आगामी काळात फेसबुक व्हिडिओ मेसेजिंगची सुविधाही देईल , अशी अपेक्षा आता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करूलागले आहेत . पण पारंपारिक नंबरवरून कॉल करण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करून फेसबुकच्या माध्यमातून कॉलकरण्याच्या नव्या प्रयत्नांसाठी ग्राहकांचे मन वळविणे मात्र कंपनीला कठीण जाईल , अशी शक्यता वर्तवली जातआहे . पण मोफत मिळणारी सुविधा पाहून ग्राहक याकडे आकर्षित होतील . त्यामुळे भविष्यात कुणाचाहीमोबाइलनंबर सेव्ह करण्याची गरज राहणार नाही . थेट फेसबुक फ्रेण्ड्समधून संबंधित व्यक्ती शोधायचा आणि थेटकॉल करायचा .
आपण फेसबुकवर भ्रमंती करत असतो... अचानक आपल्यालाएखादा चेहरा, एखादं प्रोफाइल आवडतं... त्याच्याशी / तिच्याशी मैत्री करावीशी वाटते आणि आपण लगेचच त्याला' फ्रेण्ड रिक्वेस्ट ' पाठवतो... कधीकधी या रिक्वेस्टसोबतमेसेजही पाठवतो . मात्र आता अशा अनोळखी (नॉन-फ्रेण्ड) 'फेसबुकर ' ला मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला एक डॉलर, अर्थात ...
वेगाच्या नव्या तंत्रज्ञानाच्या जगात रोज नवनवीन सर्व्हर , प्रोसेसर , तंत्रज्ञान यामुळे कम्प्युटर वेबसाइटचा वेग दिवसेंदिवस वाढतो आहे . सोबतच सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आहे . ऑनलाइन अॅक्टिव्हिटी अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी कंपन्या नवनवीन प्रणालीचा उपयोग करत आहेत . ही सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या फेसबुकचा वेग मात्र नव्या प्रणालीमुळे कमी होणार आहे . युजर्सचे अकाऊंट अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी फेसबुक सुरुवातीला उत्तर अमेरिकेतील युजर्सला स्थलांतरितकरणार असून नंतर जगभरातील इतर ठिकाणच्या युजर्सला ही सुविधा दिला जाणार आहे . त्याठिकाणाहून फेसबुक https या http पेक्षा अधिक सुरक्षित कनेक्शनवर काम करणार आहे . त्यामुळे फेसबुकच्या वेब अॅड्रेसच्या अगदी सुरुवातीला http ऐवजी https दिसणार आहे . यातील s म्हणजे सिक्युअर . प्रामुख्याने बँकींग , ऑनलाइन शॉपिंग कंपन्या क्रेडीट कार्ड किंवा पासवर्डची माहिती मागताना अशाप्रकारच्या कनेक्शनचा वापर करतात . फेसबुकच्या सर्व १ अब्जाहून अधिक युजर्ससाठी हेच कनेक्शन वापरले जाणार आहे . जानेवारी २०११ मध्ये फेसबुकने या स्थलांतरणाची सुरुवात केली . आतापर्यंत काही ठिकाणी ही सुविधा पर्यायी उपलब्ध होती .भारतातही इंटरनेट एक्सप्लोअरर सारख्या ब्राऊझरवर http तर मोझिलावर https कनेक्शन उपलब्ध होते . मात्र लवकरच सर्वांना ती बंधनकारक केली जाणार आहे . त्यामुळे अधिक सुरक्षित होण्याबरोबरच फेसबुक सुरक्षितहोणार आहे . वेग कमी होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी फेसबुककडून प्रयत्न केले जात असले तरी https वर ट्रान्सफर होण्यासाठीची प्रक्रिया थांबवणार नसल्याचे फेसबुकचे फ्रेडरीक वूलन्स यांनी स्पष्ट केले आहे . या बदलाचा एक फायदा म्हणजे फेसबुक अकाऊंट अधिक सुरक्षित तर होईलच सोबत हॅकर्सपासूनही त्यांचे संरक्षण होईल . कारण https मध्ये सर्व डेटा एनक्रिप्टेड फॉर्ममध्ये असणार आहे . त्यामुळे वायफाय कनेक्शन वापरताना किंवा फेसबुक लॉग आऊट न करता कम्प्युटर बंद केल्यावरही अकाऊंटची सुरक्षा कायम राहणार आहे . या स्थलांतरणाचा आणखी एक फायदा म्हणजे ओळख नसलेल्या व्यक्तींनाही आता फेसबुक गेम खेळण्यासाठी आमंत्रित करता येईल . त्यामुळे फेसबुकच्या गेमिंगचा महसूल वाढणार आहे . जानेवारी २०१० मध्ये जीमेलने सर्व युजर्सला https वर स्थलांतरित केले होते . पुढे जुलै २०१० मध्ये वेब ब्राऊझिंगच्या स्पीडमध्ये कुठलाही फरक पडला नसल्याचे जीमेलने म्हटले होते . हॉटमेल आणि ट्विटरवरही पूर्वीपासून https कनेक्शन वापरले जात आहे .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech