इंटरनेट सोपं करण्यासाठी… एव्हरनोट
मनोरंजन , ऑनलाइन व्हिडीओ आणि गेम्स , डॉक्युमेंटवर काम करणे , डाटाबेस हे सर्व क्लाऊडवर करण्याचे प्रमाण वाढले आहे . सोशल नेटवर्किंगवर मित्र आणि कुटुंबांबरोबर गप्पा होत असतात . हे सर्व करताना मोबाइलवरील इंटरनेटचा ब्राऊजर महत्त्वाची भूमिका बजावत असतो . ब्राऊजर हे एक प्रकारचे फ्री मिळणारे अॅप्लिकेशन आहे . मात्र , या सॉफ्टवेअरवर काही विशेष सुविधा आपल्या अॅड करता येऊ शकतात . वेबपेजवर एखादा लेख वाचताना अनेक स्पॉन्सर्ड लिंक ( अॅड ) असतात . त्या फोटो , पॉपअप स्वरूपात पुढे येतात. मात्र , अशा अॅड वाचण्यात अडथळा निर्माण करतात . मात्र , पुन्हा तेच आर्टिकल ऑनलाइन स्वरूपात वाचायचे असल्यास पॉपअपचा अडथळा टाळता येऊ शकतो . ' एव्हरनोट ' मुळे हे करता येणे शक्य आहे . डार्क आणि लाइट थीम यात निवडता येते . ' एव्हरनोट ' चे अकाऊंट असल्यास संबंधित लेखाचे क्लिप किंवा त्यातील काहीभाग अधोरेखित करून संदर्भासाठी वाचता येतो . डाऊनलोड Evernote : >>>>> एव्हरनोट <<<< फायरफॉक्स , क्रोम वापरणाऱ्यांना ही सुविधा वापरता येते .इंटरनेट एक्सप्लोअरर वापरत असलेल्या ' एव्हरनोट ' वेब क्लिपरचा वापर करता येऊ शकतो . मात्र , यासाठी 'एव्हरनोट ' प्रोग्रॅम कम्प्युटरवर लोड करावा लागतो . ही विशिष्ट अॅप्लिकेशन वापरल्यास वेब वापरण्याचा अनुभव सु्खद होऊ शकतो . त्यामुळे या अॅप्लिकेशनचा विचार करायला हरकत नाही . स्मार्टफोन आणि इंटरनेट प्लॅन रास्त दरात उपलब्ध असल्याने मोबाइलवर इंटरनेट सर्फ करण्याचे प्रमाण वाढले आहे . ऑनलाइन व्हिडीओ बघणे अनेकांना आवडते . ब्राऊजरमधील प्लग - इनच्यामार्फत आवडते व्हिडीओ डाऊनलोड करता येतात . इंटरनेट एक्सप्लोअरर वापरणारे यूजर आयई डाऊनलोड हेल्परचा वापर करता येऊ शकतो . इंटरनेट एक्सप्लोअररच्या नव्या ३ . ५ व्हर्जनवर व्हिडीओ फाइलच्या साइझबाबत मर्यादा आहेत .त्यामुळे आयईचे ३ . ३ च्या व्हर्जनचा विचार करता येईल . फायरफॉक्स वापरणाऱ्यांनी व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी व्हिडीओ डाऊनलोड हेल्परची मदत घ्यावी . वेबपेजचा अॅक्सेस केल्यावर या एक्स्टेंशन प्रोससमुळेव्हिडीओ हा एएलव्ही , एमपी४ आणि ३जीपी फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करता येऊ शकतो . याचे रेझोल्यूशन१०८० पिक्सेलपर्यंत असू शकतो . क्रोम वापरणारे यूजर यू - ट्यूब डाऊनलोडरचा विचार करू शकतात . आपण पाहत असलेल्या व्हिडीओच्या खालीच डाऊनलोड बटन असते . त्यामुळे फाइल डाऊनलोड करणे सोपे जाते . Tubemate : >>>> tubemate.net <<<< * marathitech does not take responsibility ...