गूगल सर्चचा वापर करून शैक्षणिक विषय समजून घेणं आणखी सोपं!
फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अशा विषयांचा अभ्यास 3D मॉडल्ससह सहज करता येईल!
फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अशा विषयांचा अभ्यास 3D मॉडल्ससह सहज करता येईल!
Promo Code TECHNOW अप्लाय करा आणि पूर्ण कोर्स ३० दिवस मोफत मिळवा !
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक अॅप डाउनलोड करण्याचं प्रमाण ६० टक्क्यानी वाढलं
शाळा- महाविद्यालयांमध्ये टॅब्लेट शाळा- महाविद्यालयांमध्ये टॅब्लेट वाटपाच्या घोषणा काही राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यांमध्ये केल्या. काहींनी प्रत्यक्ष वाटपास सुरुवातही केली. वाटपाला ...
अभ्यास करताना एखाद्या प्रॉब्लेमपाशी येऊन तुमची गाडीअडलीय ... डोंट वरी . इथेही तुमच्या मदतीला अॅप धावूनआलंय . तुमच्या कम्प्युटर किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातूनतज्ज्ञ प्राध्यापकांकडून एका क्लिकवर तुम्ही तुमच्या प्रश्नाचंउत्तर मिळवू शकता . हे शक्य झालंय मुंबई आयआयटीच्या 'आस्क अ क्वेश्चन ' या उपक्रमातून . तुम्ही इंजिनीअरिंगचा अभ्यास करत आहात आणि तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नाहीय . पण ,घाबरु नका . फक्त तुमचा स्मार्टफोन सुरू करा . ' आस्क अक्वेश्चन ' नावाचं अॅप सुरू करा आणि तुमचा प्रश्न पोस्ट करा . इतकचं नाही तर तुम्ही तुमचा प्रश्न ' ट्विट ' ही करूशकता . याला उत्तर देतील ते थेट आयआयटीमधील तज्ज्ञ प्रोफेसर्स . यात काहीही आश्चर्य वाटून घ्यायचं कारणनाही , हे खरं आहे . हे प्राध्यापक ई - मेलद्वारे तुमच्या प्रश्नाचं उत्तर कळवतील किंवा थेट तुमच्याशी संवादहीसाधतील . यामुळे आता इंजिनीअरिंगच्या जाडजूड पुस्तकात डोकं खुपसल्यानंतर पडणा - या हजारो प्रश्नांची मुद्देसुद आणितांत्रिकदृष्ट्या योग्य अशी बिनचूक उत्तरं तुम्हाला सहज मिळू शकणार आहे . कोणत्याही प्रकारचा प्रश्न पडल्यासत्यात खूप वेळ न घालवता किंवा मित्र - मैत्रिणींना विचारण्यात वेळ न घालवता प्रश्न इथं पोस्ट करा . म्हणजेतुम्हाला उत्तर हमखास मिळणार हे निश्चित . आयआयटीसारख्या संस्थेत सर्वांनाच प्रवेश मिळत नाही .प्रत्येकाला चांगल्या प्राध्यापकांचं मार्गदर्शन मिळेल याची खात्री नाही . तसंच अभ्यास करता - करताविद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका येऊ शकतात . याच गोष्टी लक्षात घेऊन मुंबई आयआयटीने ११ नोव्हेंबर २०१०रोजी ' राष्ट्रीय शिक्षण दिना ' च्यानिमित्ताने ' आस्क अ क्वेश्चन ' नावाचा हा उपक्रम सुरू केला . या उपक्रमांतर्गतइंजिनीअरिंगचा अभ्यास करणारा कोणताही विद्यार्थी आपला प्रश्न आयआयटीच्या प्राध्यापकांना विचारू शकणारआहे . आठवड्याभरात येणा - या प्रश्नांपैकी काही प्रश्नांना प्राध्यापक ई - मेलद्वारे उत्तरं देतात तर काही प्रश्न जेसार्वत्रिक असू शकतात अशा प्रश्नांची उत्तर दर गुरूवारी संध्याकाळी ४ ते ५ यावेळात होणा - या लाइव्हकार्यक्रमात दिली जातात . वेबकास्टिंगद्वारे पाहता येणा - या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना थेट सहभागीही होता येतं . या कार्यक्रमाचानुकताच १००वा भाग पूर्ण झाला . यानिमित्ताने ' आस्क अ क्वेश्चन ' चे अँड्रॉइड अॅप्लिकेशन आणि ' अॅप्लिकेशनप्रोग्रामिंग इंटरफेस '( एपीआय ) लाँच करण्यात आले आहे . याचं अँड्रॉइड अॅप हे आता गुगल प्ले स्टोअरमध्येमोफत उपलब्ध झालं आहे . तर याचा ' एपीआय ' म्हणजे आपण एकदा का हे प्रोग्रामिंग आपल्या कम्प्युटरवरलोड केलं की , त्याचा एक छोटा टूलबार आपल्याला दिसतो . आपल्याला प्रश्न पडला की , त्या टूलबारवर क्लिककरायचं आणि आपला प्रश्न पोस्ट करायचा . म्हणजे अगदी ट्विट केल्यासारखा आपला प्रश्न काही शब्दांत मांडूनतो थेट ' आस्क अ क्वेश्चन ' च्या बँकमध्ये जाऊन पडतो . आतापर्यंत ७५ शैक्षणिक संस्थांमधील ३६ हजारविद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे . या उपक्रमाच्या १००व्या कार्यक्रमानिमित्त १४०० प्रश्नांची एक बँकहीप्रसिद्ध करण्यात आली आहे . तसंच १२ मार्च ते २६ मार्च या कालावधीत एक ' क्वेश्चनोथॉन ' घेण्यात आली होती, ज्यात सुमारे तीन हजार प्रश्न जमा झाले आहेत . ही सुविधा सध्या इलेक्ट्रिकल , इलेक्ट्रॉनिक्स , इलेक्ट्रॉनिक्सअॅण्ड कम्युनिकेशन , इंस्ट्रूमेंटेशन , इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स , पॉवर सिस्टिम , इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी , मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स या शाखांसाठी सुरू आहे . उपक्रमाची माहिती आणि अधिक तपशीलासाठी http://www.ask.co-learn.in/ वर लॉगइन करा . असा विचारा प्रश्न तुमचा प्रश्न तुम्ही ई - मेल करू शकता . यासाठी प्रश्न 3t.aaq @iitb.ac.in वर ई - मेल करा . तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल तर तुम्ही तुमचा प्रश्न एसएमएसही करू शकता . यासाठी तुमचा एसएमएस९७६९७९४५२५ वर पाठवा . ' आस्क अ क्वेश्चन ' नावाचं एक फोरम आहे . यात तुम्ही तुमचा प्रश्न पोस्ट करू शकता . यासाठी http://www.ask.co-learn.in/forum/ वर लॉगइन करा . अँड्रॉइड अॅपच्या माध्यमातून आणि एपीआयच्या माध्यमातून तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता . नीरज पंडित
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech