Tag: Education

इंटरनेटची साथ प्रगतीला

इंटरनेटमुळे मुले बिघडतात , त्यांच्यावर वाइट संस्कार होतात, लहान वयात त्यांना टेक्नॉलॉजी हाताळायला देऊ नये , असे आपल्याकडे नेहमी बोलले जाते . मात्र अमेरिकेत वॉशिंग्टन येथे करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे मुलांची प्रगती होते आणि त्यांची जबाबदारीची जाणीव वाढते , असे दिसून आले आहे . ' स्व ' ची जाणीव वृद्धिंगत होण्यासाठी टेक्नॉलॉजीचा कितपत उपयोग होतो , यावर मात्र या सर्व्हेतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे .  ' डिजिटल मीडिया ' च्या तज्ज्ञ आणि इन्फर्मेशन स्कूलमधील सहाय्यक प्राध्यापिका केटी डेविस यांनी ३२किशोरवयीन मुलांच्या मुलाखती घेतल्या . १३ ते १८ या वयोगटातील मुलामुलींना त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. या सर्व्हेसाठी त्यांनी बर्मुडा बेट निवडले . तेथील मुलांच्या टेक्नॉलॉजी हाताळण्याच्या सवयी अमेरिकेतील मुलांप्रमाणेच आहेत .  मित्रांशी संवाद साधण्यासाठी या माध्यमांचा वापर कशा पद्धतीने करता , अशा प्रकारचे प्रश्न मुलांना विचारण्यात आले . त्यांना जी उत्तरे मिळाली , त्यावरून मोबाईल , इंटरनेट यांचा वापर किशोरवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि या मुलांना घडवण्यात या टेक्नॉलॉजीचाही बराच वाटा आहे , याची जाणीव त्यांना झाली .९४ टक्के मुलांकडे सेल फोन आहेत . त्यातील ५३ टक्के मुलांकडे इंटरनेट आहे . ९१ टक्के मुलांचे फेसबुक प्रोफाइल्सआहे .  ७८ टक्के जणांकडे ' एमएसएन ', ' एओएल ' किंवा स्काइप या ' ऑनलाइन इन्स्टंट मेसेजिंग ' सुविधा आहेत . ९४टक्के मुले यू - ट्यूब वापरतात आणि ९ टक्के मुले ट्विटर वापरतात . या माध्यमांद्वारे ते नेमका कोणता संवाद साधतात , याबद्दल डेविस यांनी मुलांना विचारले आणि त्यांच्या वेगवेगळ्या अशा दोनशे उत्तरांचे विश्लेषण केले .वैयक्तिक समस्या आणि एखाद्याबद्दल आपल्याला काय वाटते , याविषयी फारसे बोलले गेले नाही .  होमवर्क आणि दिवसभरात आपण काय केले , याविषयी मात्र बरेचसे बोलले गेले . अशा प्रकारचे संभाषण मुलांचे दिवसभर चालते . कॉलेज आणि जेवणाच्या वेळेला मात्र हा ऑनलाइन संवाद बंद असतो . ६८ टक्के कम्युनिकेशन फेसबुकवरून चालते . कुठला फोटो अपलोड केला आहे , यू - ट्यूबवर काय पाहण्यासारखे यांसारख्या संवादातून किशोरवयीन मुले ' कनेक्टेड ' राहतात . ६९ टक्के मुले भावनिक गप्पा मारताना दिसतात . त्यात मुलींचे प्रमाण अधिक आहे .  भावनिक गुंता सोडवण्यामागे आपला मित्र - मैत्रीण आपल्याला मदत करेल , अशी भावना त्यांच्यामध्ये असते .प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा डिजिटल कम्युनिकेशनच ही मुले अधिक पसंत करतात . टेक्नॉलॉजीपासून आपण दूर जाऊ नये ,यासाठी ते सतत स्वतःला अपडेट ठेवतात . या टेक्नॉलॉजीमुळे मुले बाह्यतः बरीच प्रगती करतील . इतरांना ओळखायला शिकतील ; पण ' स्व ' ची अनुभूती अर्थात ' स्व ' ची जाणीव यांतून नेमकी किती तयार होईल , हे मात्र आताच सांगता येणार नाही , असे डेविस यांनी सांगितले . नोव्हेंबरमधील ' अॅडॉल्सन्स ' या जर्नलमध्ये हे संशोधनप्रसिद्ध होणार आहे .  ।।।-----------       महाराष्ट्र  टाइम्स  

सोशल नेटवर्किंग ई-लर्गिग टूल

उदाहरण पहिले : एखाद्या गणित विषयाच्या शिक्षकास गणितातील सूत्र संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून रंजकपणे शिकवायचे असेल व त्याला तंत्रज्ञानाची पुरेशी ...

Page 4 of 4 1 3 4
ADVERTISEMENT
error: Content is protected!