मोबाइल शॉपिंग जोरात
हातात स्मार्टफोन आला आणि कुठलीही कामं एका क्लिकवर होऊ लागली. कडक उन्हाळ्याच्या या दिवसांत तर बहुतेकांनी , दुकानांमध्ये जाऊन घामाघूम होत खरेदी ...
हातात स्मार्टफोन आला आणि कुठलीही कामं एका क्लिकवर होऊ लागली. कडक उन्हाळ्याच्या या दिवसांत तर बहुतेकांनी , दुकानांमध्ये जाऊन घामाघूम होत खरेदी ...
हल्ली सगळंकाही ऑनलाइन असतं . मित्र - मैत्रिणी , गप्पा ,रूसवे - फुगवे , भेटीगाठी , प्रेम इतकंच काय तर अगदी लग्न -पत्रिकाही आणि इव्हेण्ट्सही . मग या सगळ्यात गिफ्ट्स आणि त्यासाठी केलं जाणारं शॉपिंगही . जवळपास सगळीपेमेण्ट्स ऑनलाइन करण्याचीही हल्ली सोय आहे . रांगेत उभे राहून वेळ घालवत ' सुट्टे पैसे द्या ', ' ही नोटचालणार नाही ' अशी काही कटकट सहन करण्यापेक्षा ऑनलाइन पेमेण्टचा पर्याय आजकाल अनेकजण अवलंबतात. शॉपिंगप्रमाणे मोबाइल आणि ऑनलाइन बँकिंगचा ट्रेण्डही एकीकडे झपाट्याने पसरत आहे . बँकेतल्या गदीर्लाफाटा देत या नव्या पर्यायांकडे लोकांचा ओढा वाढत आहे . पण हे करत असताना अनेकदा फसल्या जाण्याचीशक्यताही असते . त्यापासून काळजी घेण्यासाठीच या काही टिप्स ऑनलाइन शॉपिंग टिप्स * शक्यतो नावाजलेल्या वेबसाइट्सवरून शॉपिंग करा . जेणे करून काही अडचण आल्यास त्यांच्याशी थेट संपर्कसाधता येतो . * कोणत्याही साइटवरून शॉपिंग करताना खाली ' लॉक सिम्बॉल ' आहे का याची खात्री करून घ्या . आणि पेमेण्टकरताना आपल्या ब्राउजरवर असणाऱ्या अॅड्रेस बारमध्ये द्धह्लह्लश्चह्य आहे याकडे लक्ष असू द्या , कारण सुरक्षितव्यवहार होत असल्याची ती खूण असते . * कोणतीही शॉपिंग वेबसाइट तुमची जन्मतारीख किंवा तुमची अन्य माहिती मागवत नाही . पण जर तुमचीजन्मतारीख आणि क्रेडीट - डेबिट कार्ड नंबर जर कोणाला मिळाला तर ते कॉम्बीनेशन करून कार्ड वापरायचाप्रयत्न करू शकतात . * आपले क्रेडीट आणि बँक स्टेटमेण्ट चेक करत राहा आणि कोणतेही अन्य चाजेर्स लावलेले नाहीत हे पडताळा . * तुमचा कॉम्पुटरवर अपडेेटेड अॅण्टिव्हायरस आणि लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स इन्स्टॉल्ड आहेत याकडेलक्ष असू द्या . * आपला पासवर्ड कोणाला सहज कळेल असा नसावा . * शक्यतो बाहेरच्या मशीन्सवरून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करणे टाळावे . * वायफाय नेटवर्क सिक्युअर्ड आणि पासवर्ड प्रोटेक्टेड असावे . ऑनलाइन बँकिंग टिप्स * बँकेच्या साइटवर नेहमीच नवीन लिंक ओपन करून जावे . इ - मेलमध्ये आलेली लिंक ओपन करू नये . आणितशी कोणती लिंक आल्यास बँकेला कळवावे . * कुठलीही बँक कधीही तुमची खासगी माहिती परत मागत नाही . तुम्हाला त्यासंबंधीचा एखादा मेल आला तरीती माहिती बँकेत जाऊन द्यावी . त्या मेलवरून माहिती देऊ नये . * आपला मोबाइल नंबर रजिस्टर्ड असल्यास आपल्याला ठराविक रकमेच्या व्यवहारांसाठी तुम्हाला एसएमएसअलर्ट येऊ शकतात . * बँक स्टेटमेण्ट जर काही वेगळे आढळले तर लगेच बँकेशी संपर्क साधावा . * ऑनलाइन बँकिंग वापरून झाल्यावर अकाउण्ट नेहमी लॉगआउट करावे .
इलेक्ट्रॉनिक वस्तू , कम्प्युटर , अॅक्सेसरी , प्रिटिंग - इमेजिंग आदीं उत्पादनांविषयीची माहिती पाहण्यासाठीत्याचबरोबच त्यांच्या किमती तसेच एका कंपनीच्या प्रॉडक्ट दुसऱ्या कंपनीच्या प्रॉडक्टशी तुलना करण्यासाठी http://compareindia.in.com/ ही साइट नक्की पाहता येऊ शकते .
अलीकडे ऑनलाइन शॉपिंग करणार्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे . कॅश ऑन डिवेलेरी ...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech