एयरटेल देत आहे हजारो इ बुक्स मोफत! : Juggernaut Books अॅप
आपल्याला विविध विषयांच्या इ बुक्स, कादंबऱ्या मोफत वाचता येतील.
आपल्याला विविध विषयांच्या इ बुक्स, कादंबऱ्या मोफत वाचता येतील.
अॅमेझॉनकडून नवीन किंडल पेपरव्हाईट सादर करण्यात आले आहे. याची खासियत म्हणजे नवीन किंडल पेपरव्हाईट IPX8 रेटेड असून आता वॉटरप्रूफ बनले ...
टेक्नोलॉजीच्या जमान्यात वाचन - लेखन आणि इतर अनेक बाबींमधील तंत्रेच बदलली . टेक्नोक्रांती झाल्यामुळे काम करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल झाले . प्रत्यक्षात आता कुणीही कागदावर हाताने फारसे लिहित नाही . त्याची गरजच उरलेली नाही . पुस्तकांच्या बाबतीत ही छापील पुस्तकाची जागा ' ई - बुक ' घेऊ लागले आहे दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक पुस्तक मेळाव्यातही ' ई - बुक ' ची दखल घेतली गेली . एक वेगळा विभाग 'ई - बुक ' च्या प्रकाशकांसाठी , निर्मात्यांसाठी ठेवण्यात आला होता . कम्प्युटर , इंटरनेटबरोबरच स्मार्टफोनवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध झाली . सुरुवातीला इंग्रजी भाषेपुरतेच मर्यादित असणारे हे क्षेत्र आता जवळपास सर्व भाषांमध्ये विस्तारले आहे . स्मार्टफोन , आयफोन , अन्ड्रॉइड यांसारख्या फोनवर अनेक अॅप्लिकेशन्स आहेत .त्यात आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तके डाउनलोड करण्याच्या अॅप्लिकेशनची भर पडणार आहे . टॅबलेट आणि मोबाइलसाठी ई - बुक आणि ई - मॅगझिन्स पुरवणाऱ्या ' रॉकस्टँड ' या कंपनीने दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांच्या पहिल्या संचाचे अनावरण केले आहे . यामुळे प्रादेशिक भाषांमधील ई - पुस्तकेही फोनवर वाचता येणार आहेत . विविध प्रकाशनांची इंग्रजी पुस्तके ' ई - बुक 'वर उपलब्ध आहेत . आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांची मागणी यामुळे वाढणार आहे . केवळ ' प्रिंट कॉपीं 'च्या विक्रीवर होणाऱ्या नफ्याची गणिते आता केव्हाच मागे पडली आहेत . ' अॅन्ड्रॉइड ' वर एका अॅप्लिकेशनद्वारेही पुस्तके डाउनलोड करता येतील . ' रॉक असाप रिटेल प्रायव्हेट लिमिटेड ' चे संस्थापक संचालक प्रवीण राजपाल यांनी या अॅप्लिकेशनची माहिती दिली . ते म्हणाले , ' हिंदी , गुजराती , मराठी यांसारख्या प्रादेशिक भाषांमधील पुस्तके यामुळे सर्वांना मिळणारआहेत . एकूण १८ भाषांमध्ये आम्ही पुस्तके प्रसिद्ध करत आहोत .' यासाठी अॅन्ड्रॉइड फोनवर एक अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल . हे अॅप्लिकेशन मोफत डाउनलोड करता येईल . डाउनलोड केलेले पुस्तक कायमस्वरूपी वापरता येईल . इंटरनेट अॅक्सेस नसला , तरी डाउनलोड केलेले पुस्तक वाचता येणार आहे . नाइट रीडिंग मोड ,फॉण्ट साइजमध्ये बदल करणे , पुस्तक वाचताना नोट्स काढण्याची सोय यांसारखी वैशिष्ट्ये या अॅप्लिकेशनमध्ये आहेत . एवढेच नव्हे , तर वाचायचा आपल्याला कंटाळा आला , तर वाचून दाखवण्याची सोय या अॅपमध्ये आहे .पुस्तक डाउनलोड करण्याची किंमत ही छापील पुस्तकाच्या किमतीपेक्षा फार कमी आहे . सर्वांत स्वस्त पुस्तक हे 'चाचा चौधरी कॉमिक बुक ' असून पुस्तकाची किंमत केवळ एक रुपया आहे . कंपनीने नुकतेच देशातील पन्नास प्रकाशकांशी ' टाय - अप ' केलेले आहे . विविध भाषांमधील आणखी एक हजार पुस्तके त्यामुळे कंपनीच्या संग्रहात दाखल झाली आहेत . सध्या ' रॉकस्टँड ' कडे वीस लाख पुस्तके आहेत . आर्थिक फायद्यांबरोबरच वाचनसंस्कृती वाढीला लागावी हा या बदलत्या आणि प्रगतीशील तंत्रज्ञानाचा उद्देश आहे . हेसर्वांनी लक्षात घेऊन टेक्नॉलॉजीचा वापर वाचून समृद्ध होण्यासाठी करावा .
माहिती आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या मराठी विश्वकोशाचे सर्व १ ते १६ खंड आता ई - बुक स्वरूपात उपलब्धझाले आहेत . नियोजन आयोगाचे सदस्य डॉ . नरेंद्र जाधव यांच्या हस्ते नुकतेच सोळाव्या खंडाचे लोकार्पणकरण्यात आले . तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेले पहिले पंधरा खंड आणि प्रा . मे . पुं . रेगेयांनी संपादित केलेला सोळावा खंड असा हा लाखो पानांचा ऐतिहासिक दस्तावेज आता इंटरनेटच्या माध्यमातूनजगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे . चेंबूर येथील आचार्य मराठे कॉलेजमध्ये आयोजित या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ . जाधव यांनी आज घराघरात कम्प्युटर तसेच मोबाइलद्वारे प्रत्येकाच्या हातात इंटरनेट पोहोचले असताना युनिकोडमधून विश्वकोश जसा आहे , तसा वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याची मराठी विश्वकोश मंडळाची संकल्पना अफाट असल्याचे सांगून विश्वकोश मंडळाची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारे ' सी - डॅक ' चे महेश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचीही स्तुती केली . विश्वकोश मुलांनी वाचावा आणि इतरांनाही इंटरनेटवर तो वाचण्यास प्रवृत्त करावे , असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला . प्रयत्नवाद , आशावाद , उच्च ध्येय , नम्रता , आत्मविश्वास ,अपयशावर मात करण्याची जिद्द , प्रागतिक दृष्टिकोन , वेळेचे नियोजन आणि देशप्रेम ही यशाची नऊ सूत्रे असून त्यांची कास विद्यार्थ्यांनी कधी सोडू नये , असेही ते म्हणाले . तर ' विश्वकोश कोशात न राहता तो विश्वात यावा ,यासाठी ही सारी धडपड आहे ' असे विश्वकोश मंडळाच्या अध्यक्ष डॉ . विजया वाड यांनी सांगितले . ई - बुक आवृत्तीनंतर विश्वकोश आता टॅबलेटवरही उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सी - डॅकचेसंचालक महेश कुलकर्णी यांनी सांगितले . विश्वकोशाचे सर्व खंड marathivishwakosh.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech