Tag: Dropbox

मोबाइल झाला सेट : अॅप्स असूनही त्याचं काय करायचं

बाजारातला सगळ्यात भारी फोन आपण हौसेनं घेतो , पणत्याचा वापर मात्र पुरेपूर होत नाही . बऱ्याचदा फोनमध्ये अॅप्स असूनही त्याचं काय करायचं ते कळत नाही . हीअॅप्स जरा समजून घेतली तर , लाइफ और आसान बन सकती है भिडू . एमईटी प्रस्तुत मुंबई टाइम्सकार्निवलमध्ये याच विषयावर सेमिनार झालं . वसईच्या वर्तक कॉलेजमध्ये ही धमाल सेटिंग जुळून आली .यावेळी सर्वांत आधी आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी ठरत असेलेल्या १२ अॅप्सबद्दल विद्यर्थ्यांना माहितीदेण्यात आली , ती अशी ..  गुगल गॉगल्स  हे अॅप वापरून आपण आपल्या मोबाइलवरुन फोटोच्या माध्यमातून सर्च करू शकतो . म्हणजे , समजा आपणएखद्या प्रसिद्ध मंदिराचा फोटो घेऊन तो सर्च केला , तर आत्ता आपण असलेल्या ठिकाणापासून तिथे जाण्याचासंपूर्ण मार्ग हे अॅप आपल्याला दाखवतं . इतकंच नव्हे , तर एखाद्या वस्तूचा फोटो जर आपण सर्च केला , तर त्यावस्तूबद्दलची संपूर्ण माहिती आपल्यायला मिळू शकते .  ड्रॉपबॉक्स  आपला महत्वपूर्ण डेटा क्लाउड स्टोरेजच्या मदतीने सेव्ह करता येतो तो या अॅपमुळे . हे अॅप प्ले स्टोअरमध्येहीउपलब्ध आहे . यातून स्टोअर केलेला डेटा आपण कधीही आणि कुठेही अगदी मोबाइलमध्ये , लॅपटॉपमध्ये किंवाकम्पुटरमध्ये ओपन करू शकतो .  शेयर कॉंटॅक्ट्स व्हाया एसएमएस  फोनमधले कॉंटॅक्ट्स शेअर करायला आपल्याला मदत करतं ते हे अॅप . तेही एसएमएसच्या मदतीने . सध्याबहुतांश मोबाइलमध्ये बिसनेस कार्ड पाठवण्याची सोय नसते , अशा मोबाइलमध्ये हे अॅप खूप उपयुक्त ठरतं .  एमएक्स प्लेयर  हे अॅप सगळ्या प्रकारच्या व्हिडिओ फाइल्स प्ले करतो . या अॅपमध्ये ब्राइटनेस वाढवणे , झूम आणि इतर फीचर्सवापरू शकतो . यामुळे आपल्याला फिल्म पाहण्याचा चांगला आनंद लुटता येतो .  स्कॅन  हे अॅप QR कोड स्कॅन करायला वापरलं जातं . सध्या विविध जाहिरातींमध्ये QR कोड वापरला जातो . यामुळे आपल्याला जाहिरात आपल्या मोबाइलवर पाहता येऊ शकते . याचबरोबर त्यातील अधिक माहितीही आपल्यालायातून मिळते .  एव्हेर्नोट  आयडियाज किंवा आपल्या कामाबद्दलची माहिती सेव्ह करून ठेवण्यासाठी हे अॅप महत्त्वाचं ठरतं . ही माहितीआपण मोबाइल , कम्पुटर असे कुठेही आणि काहीही ओपन करू शकतो .  झोमॅटो  हे अॅप तुमच्या एरियामधलं हॉटेल किंवा रेस्टॉरंट आणि मेन्यू कार्ड्स अशा गोष्टी शोधण्यात मदत करतं . हे अॅपजीपीएसचा वापर करून आपल्याला उपयुक्त असं रिझल्ट देतं .  निंबझ  हे अॅप सगळ्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये आहे . या अॅपमधून फेसबुक , हॉटमेल , जीमेलचं अकाउंटवापरता येतं . शिवाय मित्र आणि मैत्रिणीशी चॅटही करता येतं .  झेझ  या अॅपमधून वॉलपेपर , रिंगटोन्स , थीम्स आणि इतर गोष्टी फ्रीमध्ये डाउनलोड करता येतात .  वायबर  ...

ADVERTISEMENT
error: Content is protected!