Tag: Cameras

स्मार्टफोन होणार ऑल इन वन

इंटरनेट , मोबाइल संवादाच्या क्षेत्रात प्रगती होण्याबरोबरच संबंधित क्षेत्रांमधील तांत्रिक बाबींमध्ये लक्षणीयरित्या बदल झाला . कम्प्युटर , इंटरनेट क्षेत्रात मिनिटामिनिटाला अपडेट्स येत असतात . मोबाइल , स्मार्टफोनमध्येही सतत नवी व्हर्जन्स येत असतात . त्यातील तंत्रज्ञान आणि इतर फिचर्स अपडेट होताना कॅमेरा मात्र तितकासा प्रगत नव्हता .आता ही कमतरता दूर होणार असल्याने स्मार्टफोनला ' ऑल इन वन ' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .  मोबाइल अथवा स्मार्टफोनमधील कॅमेरा ही कल्पना काही नवीन नाही . मात्र , या नव्या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यात फ्रेममधील कुठल्याही ऑब्जेक्टवर फोकस करता येणार आहे .त्यामुळे फोटोमधील एखादी ठराविक वस्तू स्पष्ट बघता येणारआहे . असा कॅमेरा येत्या काही वर्षांत तयार केला जाणार आहे.  या क्षेत्रातील नवनवे शोध पाहिले , की मल्टिपरपझ तंत्रज्ञान बनवण्याकडे कंपन्यांचा ट्रेंड आहे , असे जाणवते .त्यातल्या त्यात स्मार्टफोनसारख्या तंत्रज्ञानाचा विचार केला , तर या एका स्मार्टफोनमध्येच इंटरनेट , फोन करण्याची सुविधा , फोटो काढण्याची सुविधा तयार आहे . जेणेकरून डेस्कटॉप कम्प्युटर , लॅपटॉप आदी बाबींना 'चालता - बोलता ' पर्याय तयार होईल . आता नव्याने सांगितलेल्या या कॅमेऱ्याच्या पर्यायामुळे अत्याधुनिक कॅमेऱ्यांनाही कदाचित पर्याय तयार होईल .  तोशिबा कंपनी या कॅमेऱ्यावर काम करत आहे . या कॅमेऱ्यासाठी पाच लाख छोट्या लेन्सेसचा वापर कंपनी करणार आहे . हा कॅमेरा केवळ स्मार्टफोनसाठी नसेल , तर टॅब्लेटमध्येही वापरता येणार आहे . वेगवेगळ्या ' फोकल लेन्थ 'ने या लेन्सेस ' फिल्ड ऑफ व्ह्यू ' कॅप्चर करतील . यामुळे फोटोग्राफरना फोटोमध्ये नेमके कुठे फोकस करायचे , हे ठरवता येईल . एका किड्याच्या डोळ्याप्रमाणे या लेन्सची रचना तयार करण्यात आली आहे . ' कम्पाउंड लेन्स 'त्यामध्ये बसवण्यात आल्या आहेत . या वर्षाअखेरीला व्यावसायिक स्तरावर स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या उत्पादनाला सुरुवात होईल .  पाच वर्षांपूर्वी ' आयफोन ' च्या निर्मितीनंतर डिजिटल कॅमेऱ्यांच्या विक्रीत घट झाली होती . ' लिट्रो ' कंपनीकडून अशीच सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे . डिजिटल कॅमेऱ्याला तोडीस तोड सुविधा स्मार्टफोनमध्ये निघाल्यामुळे डिजिटल कॅमेऱ्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे . 

अनोख्या रंगसंगतीचा फूजीफिल्म जेझेड १०० सोशल नेटवर्क असिस्टसह.

फूजीफिल्म ही एकेकाळी नावाजलेली कंपनी डिजिटल जमान्यात काहीशी मागे पडल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. मात्र गेल्या वर्षीपासून त्यांनीही या बाजारपेठेमध्ये ...

दहा हजार रूपयाच्‍या आतील TOP 5 डिजिटल कॅमेरे

दहा हजार रूपयाच्‍या आतील TOP 5 डिजिटल कॅमेरे

इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट बाजारात डिजिटल कॅमे-यांनाही मोठया प्रमाणात मागणी आहे. स्‍मार्टफोनप्रमाणे डिजिटल कॅमे-यांप्रमाणे लो कॉस्‍ट कॅमेरांमध्‍ये स्‍पर्धा लागली आहे. यामध्‍ये निकॉन, ...

आयफोनचा व्यावसायिक कॅमेरा कसा तयार करायचा याची रेसिपी

आयफोनचा व्यावसायिक कॅमेरा कसा तयार करायचा याची रेसिपी

बाहेर मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जायचं असो वा कामासाठी, पन्नास गोष्टी कुठे वागवत बसणार? तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय मग अनेक गोष्टी सहज शक्य ...

Page 12 of 13 1 11 12 13
ADVERTISEMENT
error: Content is protected!