विंडोज १०, होलोलेन्स, कोर्टाना व एज ब्राऊजर बद्दल …
मायक्रोसॉफ्टच्या Build २०१५ मध्ये झालेल्या महत्वाच्या घडामोडींबद्दल थोडक्यात माहिती. मायक्रोसॉफ्ट Build २०१५ २८ एप्रिल रोजी पार पडला जिथे मायक्रोसॉफ्टने अनेक ...
मायक्रोसॉफ्टच्या Build २०१५ मध्ये झालेल्या महत्वाच्या घडामोडींबद्दल थोडक्यात माहिती. मायक्रोसॉफ्ट Build २०१५ २८ एप्रिल रोजी पार पडला जिथे मायक्रोसॉफ्टने अनेक ...
गेल्या काही वर्षांमध्ये मायक्रोसॉफ्टच्या इवेंटमध्ये काय होणार याची जवळपास सर्वच माध्यमांना आधीच खबर असायची. मात्र यावेळच्या इवेंटमधील काही गोष्टी अतिशय ...
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनातील अग्रणी 'सॅमसंग' आणि ब्राउजरच्या दुनियेतील 'मोझिला' यांच्यातर्फे संयुक्तपणे नवे वेब ब्राउजर सादर करण्यात येणार आहे. 'सर्वो' या नावाने ...
नोव्हेंबर महिना वेब ब्राऊजर्सच्या स्पर्धेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरला आहे . या महिन्यात तीन बड्या कंपन्यांनी आपल्या ब्राऊजर्सचया नवीन आवृत्या बाजारात आल्या आहेत . यात इंटरनेट एक्स्प्लोररची १०वी आवृत्ती मॉझिला फायरफॉक्स १७ आणि गुगल क्रोम २३ यांचा समावेश आहे . यात इंटरनेट एक्स्प्लोररने बाजी मारली असून गुगल क्रोमला मात्र उतरती कळा लागली आहे . ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एक्स्प्लोररच्या डाऊनलोडिंगमध्ये ० . ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर फायफॉक्सच्या डाऊनलोडिंग ० . ४५ टक्के घसरले आहे . तर क्रोमचे डाऊनलोडिंग तब्बल १ . ३१ टक्क्यांनी घसरले आहे . आश्चर्याची बाब म्हणजे सफारी या ब्राऊजरचे डाऊनलोडिंग ० . ०४ टक्के तर ओपेरा ब्राऊजरचे डाऊनलोडिंग ० . ०७ टक्क्यांनी वाढले आहे . सध्या इंटरनेट युजर्समधील निम्म्याहून अधिक युजर हे इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत आहेत . नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एक्स्प्लोरर हे ५४ . ७६ टक्के इतके वापरले जात आहे . उर्वरित टक्क्यांमध्ये इतर ब्राऊजर्सचा शेअर आहे . यात मॉझिला फायरफॉक्स आघाडीवर आहे . दोन महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या विंडोज ८ या ऑपरेटिंग सिस्टिममुळे एक्स्प्लोररचा वापर वाढल्याचे निरिक्षण अभ्यासात नोंदविण्यात आले आहे . याचा फायदा एक्स्प्लोररच्या नवव्या आवृत्तीलाही झाला आहे .याचा वापर करणा - यांची संख्याही कमालीची वाढली आहे . नोव्हेंबर महिन्यात एक्स्प्लोरर नऊची युजर संख्या २० . ८० टक्के इतकी वाढली आहे . एक्स्प्लोररच्या नव्या व्हर्जन्समुळे जुन्या व्हर्जन्सचा वापर करणा - यांची संख्या घटत चालली आहे . पण नवीन व्हर्जन्समध्ये संख्यात्मक युजर्स अधिक असल्याचे निरिक्षणही यात नोंदविण्यात आले आहे . क्राम आणि मॉझिल्याच्या ताज्या व्हर्जनपेक्षाही काही प्रमाणात मागसलेल्या असलेल्या एक्स्प्लोरर १०ची युजरसंख्या वाढणे हे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते . मात्र विंडोज ८सोबत हे एक्स्प्लोरर देण्यात आल्यामुळे याचा वापर करणा - यांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होत आहे . एक्स्प्लोररखालोखाल फायफॉक्स ब्राऊजर लोकप्रिय आहे . याचा वापर करणा - यांची संख्या नोव्हेंबर महिन्यात कमी झाली असली तरी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधित युजर्सनी फायरफॉक्सची मदत घेतली आहे .फायरफॉक्स १७चा वापर वाढत असताना जुन्या व्हर्जन्सचा वापर मात्र कमी कमी होऊ लागला आहे . सध्या इंटरनेट युजर्समधील २० . ४४ युजर्स मॉझिलाचा वापर करतात तर १७ . २४ टक्के लोक हे क्रामचा वापर करतआहेत . क्रामच्या २३व्या आवृत्तीला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी त्यांना मॉझिलाचे आणि एक्स्प्लोररचे जाळे भेदणे कठीण आहे . यामुळे पुन्हा एकदा एक्स्प्लोररने आपली नवी आवृत्ती बाजारात आणून आपले अस्तित्त्व सिद्ध केले आहे .
मायक्रासॉफ्टचं कोणतंही उत्पादन कम्प्युटर बाजारात चाललंनाही असं नाही . मग याला ' इंटरनेट एक्स्प्लोलर ९ ' ('आयई९ ') अपवाद कसं ठरणार . एक्स्प्लोरर लाँच झाल्यानंतर अल्पावधीतच गेल्या काही महिन्यांमध्ये मार्केटमध्येआपलं स्थान प्रस्थापित केलेल्या मॉझिला , क्रोम , सफारी या ब्राऊजर्सना पुन्हा मागे टाकले आहे . एनएसएसनेलॅबने केलेल्या पाहणीत ही बाब प्रकर्षाने जाणवली आहे . ' इंटरनेट एक्स्प्लोलर ९ ' मध्ये वेबसाइट ओपन केली की, त्यातील मालवेअर , फ्रॉड्स तातडीने कळतात . यामुळे या ब्राऊजरला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं निरीक्षणयात नोंदविण्यात आलं आहे . एनएसएसने गेले ७५ दिवस विविध ब्राऊजर्सवर ओपन झालेल्या वेबसाइट्स आणि त्यांनी रोखलेले मालवेअर यांचेसर्वेक्षण केले . यामध्ये ' आयई९ ' वर ओपन झालेल्या एकूण साइट्सपैकी सुमारे ९५ टक्के मालवेअर रोखण्यात त्यांना यश आले आहे . फायफॉक्स आणि सफारी हे ब्राऊजर्स मालवेअर रोखण्याच्या स्पर्धेत कुठेच नसल्याचे दिसूनआले आहे . या दोन्ही ब्राऊजर्सनी केवळ सहा टक्केच मालवेअर रोखले आहेत . क्रोमने यामध्ये समाधानकारककामगिरी केली असून या ब्राऊजरला ७४ टक्के मालवेअर रोखण्यात यश आले आहे . यासाठी एनएसएसने प्रत्येकब्राऊजर्सच्या सुमारे साडे सात लाख वेब पेजेस टेस्ट केले आहेत . ब्राऊजर सिक्युरिटी हे आपल्याला पूर्णतः सुरक्षादेत नाहीत . त्याचा वापर केवळ प्राथमिक सुरक्षा म्हणून केला जाऊ शकतो , असे एनएसएसने आपल्यानिरीक्षाणात नमूद केले आहे . ब्राऊजर्सची ही सुरक्षा क्लाऊड तंत्राज्ञानावर अवलंबून आहे . ज्या कंपनीची क्लाऊडटेक्नॉलॉजी चांगल्या दर्जाची आहे त्यांना ही मालवेअर सुरक्षा पुरविणंच शक्य होणार आहे . आपण जेव्हा एखादीवेबसाइट ओपन करतो तेव्हा ती साइट ' बॅड ' म्हणून दर्शविण्यात आली तर ती ओपन होण्याआधी युजर वॉर्निंगदेण्यात येते . तरीही युजरला ती साइट ओपन करायची असेल तर तो पर्यायही खुला राहतो . अशाच अनेकप्रकरांमधून अॅण्टीव्हारसचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षणही सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे . ' आयई९ 'आणि क्राममध्ये मालवेअर असलेले वेबपेज ओपन होते मात्र त्या पेजेसवरून डाऊनलोडिंग करता येत नाही .बहुतांश मालवेअर हे अॅडच्या माध्यमातून पसविले जातात , असे निरीक्षण एनएसएसने या सर्वेक्षणात नोंदविलेआहे . यामध्ये गुन्हेगारांना पे - पर - क्लिकनुसार पैसे मिळत असतात . क्लिक फ्रॉड रोखण्याचे काम सर्वाधिकचांगल्याप्रकारे ' आयई९ ' ने केलेले आहे . त्याचेप्रमाण ९६ . ६ टक्के इतके आहे . त्याखालोखाल क्रोम १ . ६ टक्के ,फायरफॉक्स ० . ८ टक्के आणि सफारी ० . ७ टक्के असे मालवेअर रोखण्याचे ब्राऊजर्सचे प्रमाण आहे .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech