Tag: App Store

अँड्रॉइड अॅपची चलती

अॅपल , विंडोज , ब्लॅकबेरी आणि अँड्रॉइड अशा चार ऑपरेटिंग सिस्टिमची सध्या मार्केटमध्ये चांगलीच चलती आहे . विंडोज मार्केटमध्ये नवीनच असल्याने अजून त्याची म्हणावी , तशी स्पर्धा सुरू झालेली नाही . पण अॅपल आणि अँड्रॉइड या दोन ऑपरेटिंग सिस्टिममध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे . या दोन्ही ओएसमध्ये नेमकी कोण बाजी मारतो , याकडे मार्केटचं नेहमीच लक्ष असतं . नवीन वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात अँड्रॉइड अॅप्स सर्वाधिक डाऊनलोड झाले आहेत , अशी माहिती कॅनलिस या आयटी सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे .  जानेवारी २०१३ ते मार्च २०१३ या कालावधीत डाऊनलोड झालेल्या अॅप्लिकेशन्सपैकी ५१ टक्के अॅप्लिकेशन्सही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारी होती . गुगल प्लेवरून ही सर्व अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करण्यात आली होती . उर्वरित ४९ टक्क्यांमध्ये ब्लॅकबेरी , अॅपल आणि विंडोज या ओएसचा क्रमांक येतो .डाऊनलोडिंगमध्ये अँड्रॉइड आघाडीवर असलं तरी उत्पन्न कमविण्यामध्ये अॅपलने बाजी मारली आहे .                     या तीन महिन्यांच्या कालावधीत डाऊनलोड झालेल्या अॅप्लिकेशनच्या उत्पन्नाचा विचार केल्यास त्या उत्पन्नातील ७४टक्के उत्पन्न हे अॅपलला मिळाले आहे . उर्वरित २६ टक्क्यांमध्ये ' गुगल प्ले ' चा वाटा सर्वाधिक आहे . ब्लॅकबेरीवर्ल्ड आणि विंडोज फोन स्टोअरमध्ये सर्वात कमी उत्पन्न मिळाल्याचे या सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे .पहिल्या तीन महिन्यांमध्ये एकूण १३ . ४ अब्ज अॅप्लिकेशन्स डाऊनलोड झाली आहेत . यातून सुमारे २ . २ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे उत्पन्न मिळाले आहे . अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले यांच्यात चांगलीच स्पर्धा आहे . पण ब्लॅकबेरी वर्ल्ड आणि विंडोज फोन स्टोअर हे या दोन्ही ब्रॅण्डसच्या स्पर्धेत कुठेही तोडीस तोड येत नाहीत , असे मत कॅनलिसचे ज्येष्ठ अभ्यासक टीम शेफर्ड यांनी सांगितले . या तीन महिन्यांमध्ये सर्वाधिक अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करण्यात आल्याचेही या सर्वेक्षणात म्हटले आहे . यावरून असे स्पष्ट होते की , जगभरात स्मार्टफोन वापरणा -यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे .  इंडोनेशिया , दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील या देशांमध्ये सर्वाधिक अॅप्लिकेशन्स डाऊनलोड झाली आहेत . पण तेथून उत्पन्न फार कमी आले आहे . याचाच अर्थ असा आहे की येथे या भागात फ्री अॅप्लिकेशन्स सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आले आहेत . भारतात स्मार्टफोन युजर्सच्या संख्येत ४२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे .

भारतीयांच्या कल्पक अ‍ॅप्सने सजले नोकियाचे अ‍ॅप स्टोअर

भारतीयांच्या कल्पक अ‍ॅप्सने सजले नोकियाचे अ‍ॅप स्टोअर

नोकिया स्टोअरमध्ये असलेल्या विविध अ‍ॅपमध्ये जागतिक पातळीवर भारतीय अ‍ॅप विकासकांनी आघाडी घेतली आहे. या स्टोअरमध्ये असलेल्या जवळपास 1 लाख 20 ...

Page 2 of 2 1 2
ADVERTISEMENT
error: Content is protected!