Tag: Apple

गुगल मॅप पुन्हा ‘आयफोन’वर

पूर्वी पत्ता विचारायचा झाला , की रस्त्यावरील एखाद्याव्यक्तीला गाठले जायचे . आजही तसे होते पण सध्याच्या युगात पत्ता किंवा एखादे ठिकाण शोधण्याकरिताइंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे ... पूर्वी एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे झाल्यास त्या ठिकाणीजायचे कसे ? जवळची खूण काय ? असा तपशील गोळा करावा लागे . मात्र , आता इंटरनेटवर सर्च करायचाअवकाश की तेथे कसे जायचे , जवळचा रस्ता कोणता आदी माहिती काही क्षणांतच मिळते .  ' जीपीएस ' वर आधारित मोबाइल असल्यास इंटरनेटच्या साह्याने मॅपचे अॅप्लिकेशन सुरू करून संबंधित ठिकाणीपोचता येऊ शकते . कागदावरील मॅपचे थोडक्यात नकाशांचे व्हर्च्युअल रूप सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गुगलनेआपल्या मॅप्सच्या सर्व्हिसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले . अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारितमोबाइल फोनमध्ये गुगलच्या मॅप्सचे अॅप दिलेले असते . नसल्यास ते डाउनलोड करून घेणे उपयोगाचे ठरू शकते. गुगलच्या मॅपच्या आधारे अनेक लोकांनी त्यांची घराचे पत्ते अॅड केले आहेत . त्यामुळे गुगल मॅपवरून संबंधितव्यक्ती कोठे राहते किंवा संबंधित व्यक्तीचे ऑफिस कोठे आहे , हे कळते . मात्र , आयफोन बनविणाऱ्या अॅपलकंपनीने ' गुगल मॅप ' सुविधा आयफोनवरून काही महिन्यांपूर्वी काढून टाकली होती . अॅपलने स्वतःची मॅपसर्व्हिस सप्टेंबरमध्ये सुरू केल्याने हे पाऊल उचलण्यात आले होते .  पूर्वी अॅपलच्या आयफोनमध्ये गुगल मॅपचे प्री - लोड अॅप येत होते . ते बंद करण्याच्या कंपनीच्या या निर्णयासग्राहकांकडून तीव्र विरोध झाला . अखेर अॅपल कंपनीने आयफोनवर गुगलची फ्री मॅप सुविधा पुन्हा उपलब्ध करूनदिली आहे . चाळीस देशांत तिचा अॅक्सेस करणे शक्य असल्याचे कंपनीने स्पष्ट केले . गुगलने आकाशातून दिसणारेदृश्य , टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन हे नवे फीचर उपलब्ध केले आहे . ही सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर डाउनलोडच्या बाबतीतही अॅपल अॅप स्टोअरवर गुगल मॅपिंग अॅपला सर्वाधिक मागणी होती . गुगल मॅप अॅपलच्याउत्पादनावर उपलब्ध झाला आहे . यूजर पब्लिट ट्रान्झिट इन्फॉर्मेशन यावर पाहू शकणार आहे ; तसेच लाइव्हट्रॅफिक अपडेटबरोबर स्ट्रीट व्ह्यू फीचरचाही यात समावेश करण्यात आला आहे . यामुळे यूजरना विविध प्रकारचीमाहिती आपल्या गरजेनुसार जाणून घेता येणार आहे . गुगलचे मॅप किती लोकप्रिय आहे , हे अॅपलच्या ग्राहकांच्यामागणीवरून कळू शकते . अॅपल या कंपनीची गुगल ही स्पर्धक कंपनी आहे . मात्र , असे असतानाही यूजरचीमागणी पूर्ण करण्यासाठी अॅपलला पुन्हा ही सर्व्हिस उपलब्ध करून देण्याची दखल घ्यावी लागली आहे . 

आयट्यून्स भारतात

देशातील मोबाइल आणि टॅबलेटधारकांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे पाहिजे असेल , तर ते अॅपलचा मार्ग चोखाळतात. भारतात एमपी३ प्लेयरच्या सुरुवातीच्या काळात तर आयपॉडची ...

‘अॅपल’पुढे गुगलची अँड्रॉइड सरस

जगातील सर्वांत मोठा मोबाइल प्लॅटफॉर्म कोणता , तर अँड्रॉइड असे म्हणावे लागले . या ओपन सोर्स मोबाइल ऑपरेटिंग प्लॅटफॉर्ममुळे इनोव्हेश करण्यास वाव मिळतअसून , परिणामी मोबाइल फोनच्या किमतीही कमी होत आहेत . यामुळे अॅपल कंपनीपुढे गुगल कंपनीच अँड्रॉइडही ऑपरेटिंग सिस्टिम वरचढ ठरत आहे .  जगात विविध ठिकाणी पाठविण्यात येत असलेल्या फोनमध्ये चार फोनमागे तीन फोन हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचे आहेत . याबाबतची पुष्टीही आयडीसीने केली आहे . २००८ मध्ये गुगल कंपनीने अँड्रॉइड ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम लाँच केली . तेव्हापासून स्मार्टफोनच्या विक्रीतही मोठी वाढ झाली असून , ही ऑपरेटिंग सिस्टिमच या वाढीचे मुख्य इंजिन आहे . लाँच झाल्यापासून प्रत्येक वर्षीअँड्रॉइड ही सिस्टिम वाढीच्या बाबतीत सरस ठरली आहे .  दुसऱ्या तिमाहीत टॅब्लेट बाजारपेठेत अॅपल कंपनीचा हिस्सा ६५ टक्के होता आणि आता तो ५० टक्क्यांपेक्षा किंचित जास्त आहे . जागतिक पातळीवर विविध उत्पादकांकडून या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित डिव्हाइस तयार केली जात असून , त्यांच्या किमतीतही विविधता आहे . अँड्रॉइड स्मार्टफोनची निर्यात १३ . ६ कोटी युनिटवर पोचली आहे . गेल्या वर्षापेक्षा यात ९०टक्क्यांहून अधिक वाढ आहे .  सॅमसंग गॅलेक्स एस३ या स्मार्टफोनने अॅपल कंपनीच्या आयफोन ४ एसला तिसऱ्या तिमाहीत मागे टाकत जगात सर्वाधिक विकला जाणारा फोन होण्याचा मान मिळाविला आहे , असे पाहणी अहवालत नमूद केले आहे . अॅपलपेक्षा इनोव्हेशनच्या बाबतीत अँड्रॉइडचा वेग अधिक आहे . अँड्रॉइडकडून जोरदार प्रयत्न सरू असून , अॅपल कंपनी बरीच मागे आहे , असे गार्टरनचे म्हणणे आहे .  अँड्रॉइड हा ओपन सोर्सप्लॅटफॉर्म असून , वापरण्यास कोणतेही शुल्क द्यावे लागत नसल्याने अनेक कंपन्या या सिस्टिमचा आधार घेतडिव्हाइस डेव्हलप करीत आहेत . याचा फायदा हा अँड्रॉइडला मार्केट वाढण्याच्या रूपाने होत आहे . अँड्रॉइडप्लॅटफॉर्मवर अनेक पर्याय उपलब्ध असून  बहुतेक पर्याय स्वस्तात मिळतात . हा प्लॅटफॉर्म वापरण्याकडे लोकांचाकल वाढत आहे . दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा असली , तरी त्याचा फायदा हा प्रॉडक्ट रास्त किमतीला प्रसंगी स्वस्तात मिळण्याच्या रूपाने होत आहे हे नक्की ! 

आता अ‍ॅपल आयफोन-5 मिळवा सुलभ हप्‍त्‍याने

आता अ‍ॅपल आयफोन-5 मिळवा सुलभ हप्‍त्‍याने

गत शुक्रवारी भारतात दिल्‍ली, मुंबई आणि बेंगळूरूसारख्‍या मोठया शहरांमध्‍ये आयफोन-5  मोठया उत्‍साहाने लॉंच करण्‍यात आला. देशातील दोन मोठे टेलिफोन ऑपरेटर ...

अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार  रुपये

अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार रुपये

सप्टेंबर महिन्यात आय फोन फाइव्ह लॉन्च करताना , आपण लवकरच मिनी ऑयपॅड घेऊन येणार असल्याची खुशखबर अॅपलनं टेक - सॅव्ही तरुणांना दिली होती . आपला हा शब्द त्यांनी पाळला असून , मिनी आयपॅडचं दर्शन जगाला घडवले. नव्या मिनी आयपॅडची स्क्रीन फक्त ७ . ९ इंचांची आहे . याआधीच्या आयपॅडची स्क्रीन दहा इंचांची होती . ए - ५प्रोसेसर , पाच मेगापिक्सल कॅमेरा , एचडी व्हिडिओ चॅट ही नव्या मिनी आयपॅडची वैशिष्ट्ये आहेत . नव्या मिनी आयपॅडचे वाय - फाय मॉडेल ३२९ डॉलर (सुमारे १७ हजार ६७८ रुपये ) किंमतीचे आहे , तर थ्री जी मॉडेलची किमान किंमत ४५९ डॉलर सुमारे २५हजार २०० रुपये  आहे . अॅपलच्या नव्या आयपॅडसाठी २६ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होत आहे .  नवा मिनी आयपॅड टॅबलेट गूगलच्या नेक्सस - ७ टॅबलेटपेक्षा जास्त उत्तम आहे ; असे अॅपल कंपनीने सांगितले .कंपनीने मिनी आयपॅड टॅबलेट व्यतिरिक्त १३ इंची स्क्रीन आणि ० . ७५ इंची जाडीचे मॅकबुक प्रो देखिल लाँच केले. हे आतापर्यंतचे वजनाने सर्वात हलके मॅकबुक प्रो आहे .   अ‍ॅपलने मंगळवारी रात्री उशिरा सॅन जोन्‍स येथे बहुप्रतिक्षित आयपॅड मिनी लॉंच केले. यावेळी अ‍ॅपलचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष फिलिप शिलर ...

Page 20 of 24 1 19 20 21 24
ADVERTISEMENT
error: Content is protected!