Tag: 4G

इंटरनेटची पाचवी पिढी – 5G Network invented by Samsung Korea

माणसाच्या इंटरनेटसोबतच्या नात्याची वीण दिवसेंदिवस घट्ट होऊ लागली आहे . इंटरनेट सुरू झाल्यापासूनचा प्रवास सर्वांनाच परिचित आहे . कम्प्युटरवर केबलच्या माध्यमातून चालणाऱ्या इंटरनेटने केव्हाच कात टाकली आणि वायरलेस कम्युनिकेशनने जोर पकडला . त्यातही आता मोठ्याप्रमाणावर प्रगती झाली आहे .  ' वाय - फाय ' मुळे इंटरनेट वेगवेगळ्या संवादसाधनांवर वापरता येऊलागले . लॅपटॉप , हँडसेटवरही इंटरनेट सुरू झाले आणि मग स्पर्धा सुरू झाली , ती इंटरनेटच्यावेगाची . या वेगाच्या सूत्राला अनुसरून मग पहिल्या पिढीचे ( फर्स्ट जनरेशन ), दुसऱ्या पिढीचे (सेकंड जनरेशन ) तंत्रज्ञान बाजारात आले . पहिल्यापेक्षा दुसरे अधिक फास्ट असे हे सूत्र . वेग वाढवण्यातही मोठी स्पर्धा चालू असून अधिकाधिक वेग कसा वाढवता येईल , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .  ' सॅमसंग ' ने याबाबतीत मोठी झेप घेतली असून अतिजलद पाचव्या पिढीच्या ( ५जी ) वायरलेस तंत्रज्ञानाची चाचणी घेतली आहे . ' सॅमसंग ' च्या नव्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेट आणि मोबाइल क्षेत्रात क्रांती घडणार आहे . यामुळे एखादा मोठा चित्रपटसुद्धा एका सेकंदात डाऊनलोड करता येईल . दोन किमीच्या अंतरामध्ये सेकंदाला एक गिगाबाइट एवढा डेटा डाउनलोड करण्याची चाचणी यशस्वी झाल्याचे दक्षिण कोरियाच्या या कंपनीने सांगितले आहे . हे तंत्रज्ञान त्वरित बाजारात उपलब्ध होणार नाही . त्यासाठी आणखी किमान पाच ते सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागेल . २०२० पर्यंत हे तंत्रज्ञान बाजारात येईल . तोपर्यंत कंपनी ' ट्रान्समीटिंग स्पीड ' उपलब्ध करणार आहे . सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या चौथ्या पिढीच्या ( ४जी ) तंत्रज्ञानापेक्षा याचा वेग शंभर पटीने अधिक असेल , असा दावा कंपनीने केला आहे . अनेक ' हेवी फाइल्स ' फारसा त्रास न घेता मूव्ह करता येणार आहे . या तंत्रज्ञानामुळे ३डी चित्रपट , गेम्स , अल्ट्रा हाय डेफिनिशन कंटेन्ट ( यूएचडी ) या सेवांचा वापर यूजर विनासायास करू शकतील . मिलिमीटर वेव्हबँडचा वापर करून घेण्याचे तंत्रज्ञानही कंपनीकडे आहे . त्याचा फायदा मोबाइल इंडस्ट्रीला होईल . ' सॅमसंग ' तर्फे घेण्यात आलेल्या चाचणीत ' ६४अँटेना एलिमेंट ' चा वापर करण्यात आला . यामुळे लांब अंतरावरून येणाऱ्या ' डेटा ' ला अडथळा झाला नाही . जगामध्ये सर्वाधिक वायर नेटवर्क असलेल्या दक्षिण कोरियासारख्या देशात आत्ताच ४जीतंत्रज्ञान वापरणारे दोन कोटी लोक आहेत . ज्या मानवी मेंदूतून पाचव्या पिढीपर्यंतच्या ( ५जी ) तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे आणि इतर अनेक क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर मानव आकाशाला गवसणी घालत आहे , त्या या मेंदूच्या ' स्पीड ' चाउपयोग प्रत्यक्षात करण्यात आला , तर ती जागतिक क्रांती ठरेल . अर्थात त्यासाठी आणखी कितीपिढ्यांचे ( ४जी , ५जी , ६जी , ७जी ...) तंत्रज्ञान बाजारात येईल , कोण जाणे ! 

Page 2 of 2 1 2
ADVERTISEMENT
error: Content is protected!