नवे लेख (Latest Posts)

जीमेलवरून मेसेज पाठवा फुकटात

जीमेलवरून मेसेज पाठवा फुकटात

जगातील सर्वांत मोठे सर्च इं​जिन असलेल्या गुगलने देशभरातील युझर्ससाठी मोफत एसएमएस सेवा सुरू केली आहे . गेल्या मार्चपासूनच सुरू झालेली निवडक ग्राहकांपुरती ही सेवा गुगलने आता सर्वांसाठी खुली केली आहे . यासेवेद्वारे जीमेल चॅटच्या माध्यमातून मोबाइल फोनवर एसएमएस पाठवता येईल . या एसएमएसला फोनवरून रिप्लाय करता येईल. स्पॅम रोखण्यासाठी गुगलने प्रत्येक ग्राहकाला ५० एसएमएसचे क्रेडिट दिले आहे . वॉट्स अप ,निंबूझ यासारख्या मेसेज सेवांनी मोबाइलवर यापूर्वीच अधिराज्य निर्माण केल्याने गुगलचे हे पाऊल काहीसे उशीराच पडल्याचे मानले जाते . सध्या मोफत एसएमएस सुविधा देणाऱ्या अनेक वेबसाइट आहेत . आता जीमेलनेही भारतात ही सोय उपलब्ध केली आहे . यापूर्वी आफ्रिका , उत्तर अमेरिका आणि आशियातील ५१ देशांमध्ये ही सुविधा सुरू होती . सर्वप्रथम२०११मध्ये आफ्रिकेतून या सुविधेची सुरुवात जीमेलने केली . भारतात प्रवेश करायला मात्र त्यांनी उशीर केला ,असंच म्हणावं लागेल . कारण याहूमेल आणि इंडियाटाइम्स यांसारख्या वेबसाइट्सवर एसएमएस सुविधाया आधीच उपलब्ध करून देण्यात आली होती . जीमेलची ही एसएमएस सुविधा मोफत उपलब्ध आहे . याआधारे जीमेलधारक मोबाइलवर जीमेल चॅटमार्फत एसएमएस पाठवू शकतात . या एसएमएसला आलेला रिप्लायही चॅटमध्ये दिसू शकेल आणि हे संभाषण चॅट हिस्टरीमध्ये सेव्ह केले जाईल . १० ऑक्टोबरपासून भारतीय ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध झाली असून गुगल अॅप्सवरही ती उपलब्ध आहे . सध्या एअरसेल , आयडीया , लूप , एमटीएस , रिलायन्स , टाटा डोकोमो , व्होडाफोन यांसारख्या ऑपरेटरच्या मोबाइलवर हे मोफत एसएमएस पाठवता येतात . मात्र देशातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी असलेल्या एअरटेल आणि बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांच्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही .यापूर्वी मार्च महिन्यात केवळ काही मोजक्या ऑपरेटरसह ही सुविधा गुगलने सुरू केली होती . कसा करायचा एसएमएस ? या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जीमेल काँटॅक्टमधील व्यक्तीच्या नावावर क्लिक केल्यावर ' ऑप्शन्स ' असा पर्याय येईल . त्यात ' सेंड एसएमएस ' पर्यायावर क्लिक केल्यास मोबाइल नंबर नमूद करण्याचा पर्याय येईल .त्याठिकाणी संबंधित व्यक्तीचा मोबाइल नंबर अॅड केल्यास तुम्हाला त्या व्यक्तीच्या मोबाइलवर तुमच्या चॅटवरून थेट एसएमएस पाठ ‍ वता येईल . सुरुवातीला या सेवेमध्ये ५० मोफत एसएमएसचे ' क्रेडिट ' मिळणार असून प्रत्येक पाठविलेल्या एसएमएसबरोबर ते कमी होणार आहे . त्याचवेळी त्याला मिळालेल्या प्रत्येक रिप्लायनुसार पाच क्रेडिट वाढणार आहेत . मात्र ही मर्यादाही ५०ची असणार आहे . क्रेडिट शून्य झाले तर २४ तासानंतर तुमच्या खात्यात क्रेडिट जमा होईल . जीमेलवरून ही सुविधा मोफत असली , तरी तिला रिप्लाय करण्यासाठी केलेल्या एसएमएसला ऑपरेटरनुसार शुल्क लागू शकते . कोणत्याही जीमेल चॅटवरून एसएमएस नको असल्यास + ९१८०८२८०१०६० या क्रमांकावर STOP असाएमएसएम पाठवावा लागेल तर पुन्हा सुरू करण्यासाठी त्याच क्रमांकावर START असा एसएमएस पाठवावालागेल . जीमेलवर टाइप करा मराठीत जीमेलने आता मराठीसह इतर भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये थेट टायपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करूनदिली आहे . यापूर्वी गुगल ट्रान्सलिटरॉनच्या सहाय्याने ही सुविधा उपलब्ध होती . तुमच्या मेलमध्ये ही सुविधाअॅक्टिवेट करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन जनरल ऑप्शन्समधून लँग्वेज या पर्यायातून show all language options वर क्लिक करा . त्यात येणाऱ्या उपपर्यांयांमधून enable input tools वर क्लिक केल्यास तुम्हाला मराठी ,हिंदी , उर्दू , कन्नड , तेलगू , संस्कृत , अरेबिक , जर्मन यासारख्या जवळपास सर्व भारतीय आणि परकीय भाषांचापर्याय दिसेल . त्यातून तुम्हाला हव्या असलेल्या भाषा निवडा आणि सेटिंग्जमधील बदल सेव्ह करा . तुमच्याजीमेल होमपेजच्या हेडर बार तुम्हाला मराठीसाठी ' म ' हिंदीसाठी ' अ ' असे भाषानिहाय पर्याय दिसतील .तुम्हाला ज्या भाषेत टाइप करायचे असेल त्यावर क्लिक करा आणि ट्रान्सलिटरॉनच्या पद्धतीमध्ये ( उदा . ' मला 'साठी mala ) टाइप करा की झाला तुमचा मराठीतील इमेल तयार . यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या फॉन्टची, विशेष सॉफ्टवेअरची गरज नाही .

विंडोज एक्सपीचे पॅकअप

गेल्या ११ वर्षांपासून विंडोज एक्सपी ही कम्प्युटर युझर्सचीआवडती ऑपरेटिंग सिस्टीम झाली आहे . त्यानंतर विंडोजच्यानव्या एडिशन्स आल्या असल्या तरी एक्सपी एवढी लोकप्रियता कुणालाही मिळालेली नाही . त्यामुळेच कदाचितमायक्रोसॉफ्ट , अॅडोबसह इतर सॉफ्टवेअर कंपन्यांनी आता आपल्या नव्या सॉफ्टवेअरच्या एडिशन्स एक्सपीलासपोर्ट करणार नाहीत असे जाहीर केले आहे . त्यामुळे एक्सपीच्या युझर्सला नजिकच्या भविष्यात नव्या ऑपरेटिंगसिस्टीमबरोबर जुळवून घ्यावे लागणार आहे . गुगलनेही सर्व इंटरनेट एक्सप्लोअर धारकांना त्यांचा ब्राऊझर अपडेट करायला सांगितला आहे . इंटरनेटएक्सप्लोअरर १० येत्या २६ ऑक्टोबरला बाजारात दाखल होणार आहे . त्यानंतर म्हणजे १५ नोव्हेंबरपासूनइंटरनेट एक्सप्लोअर ८ किंवा त्यापूर्वीच्या एडिशन्सला गुगल अॅप्स सपोर्ट करणार नाहीत . त्यामुळे एक्सपीयुझर्सनी नवीन एक्सप्लोअरर इन्स्टॉल करायचा म्हटला तर मायक्रोसॉफ्ट ते करू देत नाहीय . इंटरनेटएक्सप्लोअररच्या नव्या एडिशन्स एक्सपीला सपोर्ट करणार नाही असे कंपनीने जाहीर करून टाकले आहे . यायुझर्सला फायरफॉक्स , ऑपेरा , क्रोम यासारखे ब्राऊझर इन्स्टॉल करण्याची सोय आहे . पण फोटोशॉप युझर्सला तर ही सोय देखील उपलब्ध नाही . फोटोशॉपची सीएस ६ ही एक्सपीला सपोर्ट करणारीशेवटची व्हर्जन असेल असे अॅडोबने जाहीर केले आहे . कारण फोटोशॉपच्या आगामी व्हर्जनसाठी मॉडर्न हार्डवेअरग्राफिक्स लागणार असून ते एक्सपीमध्ये नाहीत , असे कंपनीचे प्रोडक्स मॅनेजर टॉम होगार्टी यांनी म्हटले आहे .विंडोजच्या नव्या एडिशन्समध्ये हे फीचर्स उपलब्ध आहेत . ग्राफीक कार्ड , ग्राफीक ड्रायव्हर्समुळे थ्रीडी , ब्लर गॅलरी, लाईटींग इफेक्ट यासारखे फीचर्स विंडोजच्या नव्या एडिशन्स युझर्सला वापरता येतील . फोटोशॉपची नवीएडिशन कधी दाखल होणार हे कंपनीने जाहीर केले नसले तरी आगामी एडिशन एक्सपीला सपोर्ट करणार नाही हेजाहीर करून ग्राहकांना ऑपरेटिंग सिस्टीम बदलण्यासाठी वेळ देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे . यापूर्वीचअडोब लाइटरुमच्या अपडेटेड एडिशन्स एक्सपीला सपोर्ट करत नाहीत . नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ऑगस्टमध्ये विंडोज ७ च्या युझर्सच्या संख्येने विंडोज एक्सपीच्यायुझर्सला क्रॉस केले आहे . त्यामुळे आगामी काळात कराव्या लागणा - या बदलांची तयारी कम्प्युटर युझर्सनेही सुरूकेल्याचे दिसून येते आहे . 

अॅपल मॅप्स : आयफोन 5 मध्ये दोष

माटुंगा रेल्वे स्टेशन कुठे आहे ? असा प्रश्न मुंबईतील शेंबड्या पोराला जरी विचारला तरी तो त्याचे उत्तर देईल . मात्र जर कोणी तुम्हाला सांगितले की माटुंगा स्टेशन अरबी समुद्रात आहे तर तुम्ही मुर्खात काढाल . पण अॅपल कंपनीच्या आयफोन ५ मध्ये हा प्रकार घडला आहे .  आयफोन ५ साठी अॅपल कंपनीने तयार केलेल्या अॅपल मॅप्सया अॅप्लीकेशनमध्ये माटुंगा स्टेशनची नोंद अरबी समुद्रात झाली आहे . मुंबईची शान असणारा वांद्रे वरळी सागरी सेतूया अॅपमध्ये अस्तित्वातच नाही . सर्वाधिक आधुनिक म्हणून ओळखल्या जाणा- या या अॅपल मॅप्समध्ये मुंबईतील अनेक रेल्वे स्टेशनची नोंद झालेली नाही . काही स्टेशन तर मूळ जागेपेक्षा खूप दूर असल्याचे दाखवण्यात आले आहे . अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्येही ( आयओएस सहा ) अनेक दोष आढळले आहेत .  आयफोन ५ हा स्टिव्ह जॉब्ज यांच्या मृत्यूनंतर अॅपलने तयार केलेला पहिला स्मार्ट फोन आहे . या फोनच्या सॉफ्टवेअरसाठी जॉब्ज यांचे मार्गदर्शन मिळालेले नाही . त्याचा फटका आयफोन ५ ला बसल्याची शक्यता व्यक्तहोत आहे . 

Page 402 of 412 1 401 402 403 412

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected!