शर्यत ही आपुली! : अॅपल आणि गुगल तुंबळ युद्ध
गेम्स , अॅप्स , या गोष्टी बघून पूर्वी स्मार्ट फोनची निवड व्हायची. मात्र आता हीच निवड ' ऑपरेटिंग सिस्टिम ' वरून केली जाऊ लागलीय. यामुळे सध्या स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये...
गेम्स , अॅप्स , या गोष्टी बघून पूर्वी स्मार्ट फोनची निवड व्हायची. मात्र आता हीच निवड ' ऑपरेटिंग सिस्टिम ' वरून केली जाऊ लागलीय. यामुळे सध्या स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये...
स्वस्तातील टॅबलेट उपलब्ध झाल्याने भारतीय टॅबलेटवर अक्षरशः तुटून पडले असून तीन महिन्यात तब्बल ५लाखाहून अधिक टॅबलेटची खरेदी भारतीयांनी केली आहे . एप्रिल ते जून या कालावधीत ही खरेदी झाली असूनगेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ ६७३ टक्क्यांची आहे . सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालानुसार भारतीय टॅबलेट बाजारपेठेत मायक्रोमॅक्सचा सर्वाधिक म्हणजेच १८ .४ टक्के हिस्सा आहे . त्यापाठोपाठ सॅमसंग ( १३ . ३ टक्के ) आणि अॅपलचा ( १२ . ३ टक्के ) क्रमांक लागतो .गेल्यावर्षी भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या टॅबलेटची सरासरी किंमत २६ हजार होती . यंदा ती निम्म्यावर म्हणजेच १३ हजार रुपयांवर आली आहे . देशातील टॅबलेट बाजारपेठ अजूनही प्राथमिक अवस्थेत असली तरी नवनवीन पुरवठादार आणि त्यांच्या स्वस्तातील टॅबलेटमुळे देशात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे . चालू वर्षाच्या तिस - या तिमाहीतील विक्रीझालेले ४७ . ४ टक्के टॅबलेट नव्या कंपन्यांचे होते . त्यांचा प्रमुख फोकस शैक्षणिक आणि मनोरंजनाच्या अॅप्सचा प्रसार करण्याचा आहे . यावरून टॅबलेट विक्रेत्यांनी भारतीय युवकांवर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट होत असल्याचेसीएमआर टेलिकॉम प्रॅक्टीसचे प्रमुख विश्लेषक फैसल कावूसा यांनी सांगितले . भविष्यात विंडोज , आयओएस ,क्यूएनएक्स या ऑपरेटींग सिस्टीमवर आधारित टॅबलेटचे प्रमाण आयपॅड ३ आणि प्लेबुकच्या घसरणा - या किमतीमुळे वाढणार असल्याचे ते म्हणाले .
हल्ली बाहेर फिरायला जायचं म्हटलं की सर्वप्रथम विचारणा होते कॅमेरा घेतला का? एका दिवसाचं आऊटिंग असो वा महिन्याभराचा परदेश प्रवास,...
पीडीएफ फाइल्सने कम्प्युटरधारी समाजाचे सर्व आयुष्यव्यापले आहे . फॉन्ट , वर्ड , एक्सेल , पॉवरपॉइंट , फोटोशॉपअसे कुठलेही सॉफ्टवेअर नसले तरी त्यातून तयार केलेल्या पीडीएफ फाइल्स जशाच्या तशा अॅक्रोबॅट रिडरमध्येदिसू शकतात . त्यामुळेच अॅडोबची सॉफ्टवेअर सर्वत्र लोकप्रिय असून त्यात सातत्याने नवनवीन एडिशन्स येतअसतात . आता अॅडोबने मॅक आणि विंडोजसाठी अॅक्रोबॅट ११ बाजारात आणले आहे . मोबाइल आणि टॅबलेटयुझर्स ध्यानात ठेवून यात विविध सुविधा देण्यात आल्या आहेत . नवे अॅक्रोबॅट एमएस ऑफिससोबत अधिक संलग्नकरण्यात आले असून यातून फोटो रिसाइज आणि रोटेट करता येतात , टेबल्स , फॉर्म्स एडिट करता येतात तसेचडॉक्युमेंट एडिटही करता येतात . इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सध्या अनेक कागदपत्रांवर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर केल्या जातात . ही प्रक्रीया नव्या अॅक्रोबॅटमध्ये आणखी सुलभकरण्यात आली आहे . इकोसाइन या उपकंपनीच्या सहकार्याने कंपनीने विंडोज ८ टॅबलेटधारकांना ही सुविधा दिलीआहे . त्यामुळे सहीच्या ठिकाणी नाव टाइप करणे किंवा आयपॅडवर बोटाच्या सहाय्याने सही करण्याच्या पलीकडेअनेक सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत . त्यामुळेच येत्या काही वर्षात ऑनलाइन सही केलेल्या कंत्राटांचे प्रमाण १टक्क्यावरून ५० टक्क्यांपर्यंत वाढेल असे कंपनीला वाटते . फॉर्म वापरण्यात सुलभता एका संशोधनानुसार कर्मचाऱ्यांचे आठवड्यातील ११ तास कागदी अर्ज शोधण्यात आणि विविध फॉरमॅटमधीलडॉक्युमेंट उघडण्यात व फाइल्सचे लोकेशन्स शोधण्यात वाया जातात . या समस्येवर अॅक्रोबॅटने अॅडोब फॉर्म्ससेंट्रलच्या माध्यमातून तोडगा काढला आहे . यामध्ये कुठल्याही प्रकारचा डेटा तुमच्या टॅबवर , पीसीवर अॅटोमॅटीकउपलब्ध होणार असून त्यासाठी कुठल्याही प्रकारचे कन्वर्जन करण्याची गरज पडणार नाही आणि थेट टेबल्स आणितक्त्यांच्या स्वरूपात ही माहिती उपलब्ध होईल . अॅक्रोबॅट रीडरच्या मोबाइलसाठी उपलब्ध असलेल्या मोफतएडिशनमध्ये पीडीएफ फॉर्म भरता येणार असून अॅक्रोबॅट . कॉमवर ते सेव्ह करता येणार आहेत . कागदपत्रांची सुरक्षा जगभरातील किमान २५ टक्के कंपन्यांना माहितीच्या सुरक्षेची समस्या जाणवते . त्यांच्यासाठी नव्या अॅक्रोबॅटमध्येपीडीएफ फाइल्सचा अॅक्सेस मर्यादित करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे . नव्या रिस्ट्रीक्टएडिटींग पर्यायात फाइल्ससाठी पासवर्ड देण्यात आला असून त्याआधारे डेटा इन्क्रिप्शन आणि छुपी माहिती काढूनटाकणे यासारखे पर्याय उपलब्ध आहेत . आयटी कंपन्यांसाठी यामध्ये अतिरिक्त पर्याय देण्यात आले असून एकापेक्षाअधिक पीसीवर अॅक्रोबॅट फाइल्स एडिट करणे , अॅपलच्या रिमोट डेस्कटॉप टूलचा सपोर्ट यासाररख्या गोष्टी यातदेण्यात आल्या आहेत .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech