नवे लेख (Latest Posts)

आठवी खिडकी उघडली!

आठवी खिडकी उघडली!

कम्प्युटर , स्टायलसवर आधारित स्मार्टफोन , टचस्क्रीन फोन, टॅब्लेट पीसी , लॅपटॉप आदी सर्व आधुनिक युगातील संदेशवहन आणि माहितीसाठा करणाऱ्या गॅजेट्सना पूरक ठरणारी बहुचर्चित ' विंडोज ८ ' ही नवी ऑपेरेटिंग सिस्टिम गुरुवारी मायक्रोसॉफ्ट कंपनीने बाजारात आणली .  विंडोज यूजरना ' विंडोज ८ ' साठी अपग्रेड करणे शक्य होणार असून, तशी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .  या नव्या सिस्टिममुळे संधीची नवी खिडकी उघडण्याबरोबरच तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनी पुन्हा एकदा झेपावेल , अशी अपेक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) स्टीव्ह बालमेर यांनी व्यक्त केली . विंडोज अपग्रेडची सुविधा ३९ . ९९डॉलरपासून उपलब्ध असेल , असे कंपनीच्या विंडोज विभागाचे अध्यक्ष स्टीव्हन स्निफेस्की यांनी जाहीर केले  . गॅजेटप्रेमींसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे जगातील अग्रेसर आयटी कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'ने भारतात 'विंडोज- 8' लॉन्च केले आहे. गेल्या...

इंटरनेटची साथ प्रगतीला

इंटरनेटमुळे मुले बिघडतात , त्यांच्यावर वाइट संस्कार होतात, लहान वयात त्यांना टेक्नॉलॉजी हाताळायला देऊ नये , असे आपल्याकडे नेहमी बोलले जाते . मात्र अमेरिकेत वॉशिंग्टन येथे करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे मुलांची प्रगती होते आणि त्यांची जबाबदारीची जाणीव वाढते , असे दिसून आले आहे . ' स्व ' ची जाणीव वृद्धिंगत होण्यासाठी टेक्नॉलॉजीचा कितपत उपयोग होतो , यावर मात्र या सर्व्हेतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे .  ' डिजिटल मीडिया ' च्या तज्ज्ञ आणि इन्फर्मेशन स्कूलमधील सहाय्यक प्राध्यापिका केटी डेविस यांनी ३२किशोरवयीन मुलांच्या मुलाखती घेतल्या . १३ ते १८ या वयोगटातील मुलामुलींना त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. या सर्व्हेसाठी त्यांनी बर्मुडा बेट निवडले . तेथील मुलांच्या टेक्नॉलॉजी हाताळण्याच्या सवयी अमेरिकेतील मुलांप्रमाणेच आहेत .  मित्रांशी संवाद साधण्यासाठी या माध्यमांचा वापर कशा पद्धतीने करता , अशा प्रकारचे प्रश्न मुलांना विचारण्यात आले . त्यांना जी उत्तरे मिळाली , त्यावरून मोबाईल , इंटरनेट यांचा वापर किशोरवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि या मुलांना घडवण्यात या टेक्नॉलॉजीचाही बराच वाटा आहे , याची जाणीव त्यांना झाली .९४ टक्के मुलांकडे सेल फोन आहेत . त्यातील ५३ टक्के मुलांकडे इंटरनेट आहे . ९१ टक्के मुलांचे फेसबुक प्रोफाइल्सआहे .  ७८ टक्के जणांकडे ' एमएसएन ', ' एओएल ' किंवा स्काइप या ' ऑनलाइन इन्स्टंट मेसेजिंग ' सुविधा आहेत . ९४टक्के मुले यू - ट्यूब वापरतात आणि ९ टक्के मुले ट्विटर वापरतात . या माध्यमांद्वारे ते नेमका कोणता संवाद साधतात , याबद्दल डेविस यांनी मुलांना विचारले आणि त्यांच्या वेगवेगळ्या अशा दोनशे उत्तरांचे विश्लेषण केले .वैयक्तिक समस्या आणि एखाद्याबद्दल आपल्याला काय वाटते , याविषयी फारसे बोलले गेले नाही .  होमवर्क आणि दिवसभरात आपण काय केले , याविषयी मात्र बरेचसे बोलले गेले . अशा प्रकारचे संभाषण मुलांचे दिवसभर चालते . कॉलेज आणि जेवणाच्या वेळेला मात्र हा ऑनलाइन संवाद बंद असतो . ६८ टक्के कम्युनिकेशन फेसबुकवरून चालते . कुठला फोटो अपलोड केला आहे , यू - ट्यूबवर काय पाहण्यासारखे यांसारख्या संवादातून किशोरवयीन मुले ' कनेक्टेड ' राहतात . ६९ टक्के मुले भावनिक गप्पा मारताना दिसतात . त्यात मुलींचे प्रमाण अधिक आहे .  भावनिक गुंता सोडवण्यामागे आपला मित्र - मैत्रीण आपल्याला मदत करेल , अशी भावना त्यांच्यामध्ये असते .प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा डिजिटल कम्युनिकेशनच ही मुले अधिक पसंत करतात . टेक्नॉलॉजीपासून आपण दूर जाऊ नये ,यासाठी ते सतत स्वतःला अपडेट ठेवतात . या टेक्नॉलॉजीमुळे मुले बाह्यतः बरीच प्रगती करतील . इतरांना ओळखायला शिकतील ; पण ' स्व ' ची अनुभूती अर्थात ' स्व ' ची जाणीव यांतून नेमकी किती तयार होईल , हे मात्र आताच सांगता येणार नाही , असे डेविस यांनी सांगितले . नोव्हेंबरमधील ' अॅडॉल्सन्स ' या जर्नलमध्ये हे संशोधनप्रसिद्ध होणार आहे .  ।।।-----------       महाराष्ट्र  टाइम्स  

वेबसाइट खेळ होणार मल्टिडायमेन्शनल

वेबसाइट खेळ होणार मल्टिडायमेन्शनल

इंटरनेटच्या महाजालातील वेबसाइट मल्टिडायमेन्शनल व्हाव्यात , यासाठी मोठ्या प्रमाणावर चाललेल्या प्रयत्नांना लवकरच मूर्त रूप मिळणार असून ' मल्टिडायमेन्शनल वेबसाइट्स ' ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येणार आहे .२६ ऑक्टोबरला सादर होणारे इंटरनेट एक्स्प्लोअरर १० आणि विंडोज ८ यांच्या वेगवेगळ्या फीचर्सची झलक 'कॉन्टर जूर ' या गेमने नुकतीच दाखवली . केवळ स्मार्टफोन आणि टॅब्लेटमध्येच असणाऱ्या या गेमने आता वेबवर एन्ट्री केली आहे . त्यामुळे अॅप्सना वेबचे दरवाजे खुले झाले आहेत . टचस्क्रीनचा समावेश असल्याने वेबवर हा गेमखेळताना नक्कीच वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटेल .  ' कॉन्टर जूर ' हा खेळ म्हणजे वेबची मजल कुठपर्यंत जाईल याची झलक आहे , अशी प्रतिक्रिया इंटरनेट एक्स्प्लोअररचे जनरल मॅनेजर रायान गाविन यांनी दिली . अॅप्सप्रमाणेच वेबसाइट या अधिक ' यूजफूल ' असतात, हे दाखवण्यासाठी ' मायक्रोसॉफ्ट ' ने ' आयफोन ' आणि ' आयपॅड ' वरील ' कॉन्टर जूर ' हा गेम ' ऑनलाइन 'स्वरुपात आणला आहे . इंटरनेट एक्स्प्लोअरर १० चे वेब ब्राउझिंग कसे असेल , याचाही अंदाज त्यांनी त्यामधूनदिला आहे .  हा गेम भौतिकशास्त्रावर आणि ' द लिटल प्रिन्स ' या कादंबरीवर आधारित आहे . व्हिडिओ गेमच्या धर्तीवर असलेल्या बटनांद्वारे त्यांनी खेळ खेळून दाखवला . जमिनीचा काही भाग वर किंवा खाली करून त्यांनी यागेममधील ' पेटिट ' या कॅरॅक्टरला त्या अडथळ्यांवरून जायला सांगितले . विंडोज ८ वर आयई १०च्या सहाय्यानेया गेमचे अतिशय उत्कृष्ट असे सादरीकरण झाले . जवळपास दोन्ही हातांच्या सर्व म्हणजे दहा बोटांनी एकाच वेळी कमांड दिली , तरी त्याची अमलबजावणी करण्याची क्षमता या प्रोग्रॅममध्ये आहे . गेमच्या तिसऱ्या लेव्हलला खेळताना प्लेयरला टच स्क्रीनवर किमान तीन बोटांचा वापर करावा लागतो . हा खेळ ऑनलाइन होणे म्हणजे स्मार्टफोन आणि टॅब्लेटमधील ' अॅप्स ' ना वेबचे दरवाजे खुले होण्यासारखेच आहे . यासंदर्भात गाविन म्हणाले ,आजचे वेब हे उद्याचे नसेल . अधिकाधिक सुंदर , आकर्षक वेबसाइट्स लोक पाहत जातील . यामध्ये टच स्क्रीनचाही समावेश असेल . वेब हे आजच्यासारखे ' वन डायमेन्शनल ' नसेल , हे लोकांना दाखवून देण्याचेच आमचे काम आहे. मात्र टच स्क्रीनचा वापर आला , तरी ब्राउझिंगसाठी माऊसवर अवलंबून राहावे लागणार आहे , अशी खंत त्यांनी व्यक्त केली .

अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार  रुपये

अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार रुपये

सप्टेंबर महिन्यात आय फोन फाइव्ह लॉन्च करताना , आपण लवकरच मिनी ऑयपॅड घेऊन येणार असल्याची खुशखबर अॅपलनं टेक - सॅव्ही तरुणांना दिली होती . आपला हा शब्द त्यांनी पाळला असून , मिनी आयपॅडचं दर्शन जगाला घडवले. नव्या मिनी आयपॅडची स्क्रीन फक्त ७ . ९ इंचांची आहे . याआधीच्या आयपॅडची स्क्रीन दहा इंचांची होती . ए - ५प्रोसेसर , पाच मेगापिक्सल कॅमेरा , एचडी व्हिडिओ चॅट ही नव्या मिनी आयपॅडची वैशिष्ट्ये आहेत . नव्या मिनी आयपॅडचे वाय - फाय मॉडेल ३२९ डॉलर (सुमारे १७ हजार ६७८ रुपये ) किंमतीचे आहे , तर थ्री जी मॉडेलची किमान किंमत ४५९ डॉलर सुमारे २५हजार २०० रुपये  आहे . अॅपलच्या नव्या आयपॅडसाठी २६ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होत आहे .  नवा मिनी आयपॅड टॅबलेट गूगलच्या नेक्सस - ७ टॅबलेटपेक्षा जास्त उत्तम आहे ; असे अॅपल कंपनीने सांगितले .कंपनीने मिनी आयपॅड टॅबलेट व्यतिरिक्त १३ इंची स्क्रीन आणि ० . ७५ इंची जाडीचे मॅकबुक प्रो देखिल लाँच केले. हे आतापर्यंतचे वजनाने सर्वात हलके मॅकबुक प्रो आहे .   अ‍ॅपलने मंगळवारी रात्री उशिरा सॅन जोन्‍स येथे बहुप्रतिक्षित आयपॅड मिनी लॉंच केले. यावेळी अ‍ॅपलचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष फिलिप शिलर...

Page 396 of 412 1 395 396 397 412

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected!