नवे लेख (Latest Posts)

पोर्टेबल ड्राइव्ह ::  पेन ड्राइव्ह

पोर्टेबल ड्राइव्ह :: पेन ड्राइव्ह

ऑपरेटिंग सिस्टीम उबूंटू आणि फेडेरासह लिनक्सच्या बहुतांश ऑपरेटिंग सिस्टीम पूर्णपणे पेन ड्राइव्हवर चालू शकतात . अगदी तुमच्या हार्डडिस्कवर इन्स्टॉल केल्याप्रमाणे ही सिस्टीम तुम्हाला वापरता येते . त्यात वेब ब्राऊझिंग , वर्ड - एक्सेल फाइल्स एडिट करता येतात पण स्पीड फक्त थोडा कमी असतो . याचा एक फायदा म्हणजे , तुम्ही कम्प्युटर खिशात घेऊन फिरू शकता . सध्या विंडोज आणि मॅकचा असा वापर करता येत नाही पण मायक्रोसॉफ्ट या दृष्टीने विचार करत आहे . पोर्टेबल प्रोग्रॅम्स पोर्टेबल ऑपरेटिंग सिस्टीमप्रमाणे काही पोर्टेबल सॉफ्टवेअर असतात . ती थेट पेन ड्राइव्हवर वापरता येतात .फायरफॉक्स , क्रोम हे ब्राऊझर , वर्डवेब हे डिक्शनरी सॉफ्टवेअर , इरफान व्ह्यू हे इमेज एडिटींग सॉफ्टवेअरयासारखी अनेक सॉफ्टवेअर पोर्टेबल स्वरूपात पेनड्राइव्हमधून वापरता येतात . त्यामुळे अॅडमिनिस्ट्रेटरची परवानगी नसतानाही तुम्ही गरजेच्यावेळी हे सॉफ्टवेअर वापरू शकता . www.portableapps.com, www.portablefreeware.com, www.pendriveapps.com या वेबसाइटवर तुम्हाला पोर्टेबल प्रोग्रॅम मिळू शकतील .  फक्त डिलीट करू नका विंडोजमध्ये तुम्ही डिलीट केलेली फाइल रिसायलकल बिन मध्ये जाते . त्यामुळे चुकून डिलीट झालेली फाइल पुन्हा मिळवण्याची संधी तुमच्यासमोर कायम असते . पण पेन ड्राइव्हमध्ये ही सोय नाही . पण आयबिन हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरत असाल तर तो प्रॉब्लेमही सुटला . आयबिन हे पोर्टेबल रिसायल बिन असून ते डाऊनलोड करून पेन ड्राइव्हमध्ये एक्स्ट्रॅक्ट केल्यास पुढील वेळेपासून ते आपोआप काम सुरू करते . एखादी फाइल तुम्ही डिलीट करण्याचा प्रयत्न केल्यास ती आयबिनमध्ये ट्रान्सफर करायची का असा प्रश्न हे सॉफ्टवेअर विचारते ,परवानगी दिल्यावर तुमची फाइल थेट आयबिनमध्ये जाते . सध्याच्या काळात पेन ड्राइव्हचे आकार वाढत असल्याने तुम्ही आयबिन वापरू शकता आणि जागा कमी पडल्यास त्यातील फाइल्स डिलीट करू शकता . व्हायरसपासून सुरक्षा एखाद्या कम्प्युटरमधील व्हायरस तुमच्या पेन ड्राइव्हमध्ये आणि नंतर घरच्या कम्प्युटरमध्ये पोहोचू शकतो .त्यामुळे तुमच्या पेन ड्राइव्हला केवळ रिड ओन्ली मोडमध्ये ठेवणे योग्य . युएसबी राइट प्रोटेक्टर हे सॉफ्टवेअर www.gaijin.at/dlusbwp.-php याठिकाणाहून डाऊनलोड करून तुम्ही वापरू शकता . पेन ड्राइव्हमध्ये हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यावर ते ऑन किंवा ऑफ करून तुम्ही पेन ड्राइव्हचा रिड ओन्डी मोड ऑन / ऑफ करू शकता . पण हे सॉफ्टवेअर ऑन / ऑफ केल्यावर पेन ड्राइव्ह बाहेर काढून पुन्हा जोडावा लागतो . तेव्हाच सॉफ्टवेअर काम करते . पासवर्ड सुरक्षा तुमच्या पेनड्राइव्हमधील काही डेटा इतरांनी वापरू नये अशी तुमची इच्छा असेल तर Rohos Mini Drive Portable (www.rohos.com/products/rohos-minidrive ) हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही तुमच्या पेनड्राइव्हमध्ये छुपे हिस्से तयार करू शकतात . या पार्टिशनला पासवर्ड सुरक्षाही देता येते . संपूर्ण पेन ड्राइव्हला पासवर्ड प्रोटेक्शन द्यायचे असेल तर  Cryptainer LE (www.cypherix.com/cryptainer_le_download_center.htm). या सॉफ्टवेअरचा वापर करता येईल . अॅटोमॅटिक बॅकअप USB Flash Copy (www.usbflashcopy.com) हे सॉफ्टवेअर तुम्हाला पेन ड्राइव्हचा अॅटोमॅटिक बॅक अप घेण्याची सुविधा देते . यात तुम्ही फाइलचा प्रकार वगैरेही ठरवून फक्त त्याचा बॅकअप घेऊ शकता . यामध्ये तुम्हाला प्रोफाइल तयार करण्याचीही सुविधा आहे . त्यामुळे घरच्यासाठी आणि ऑफिससाठी स्वतंत्र प्रोफाइल तयार करून ठेवू शकता . 

धोका ‘फेक मेसेजिंग अॅप्स’चा

मोबाइल व ई - मेल हे संवादाचे उत्तम माध्यम बनले असले ,तरी त्यातही आपणच आपल्याला कुणाच्याही नावे बनावटमेसेजेस करण्याची नवी अॅप्स बाजारात आली आहेत .संशयाने पोखरलेले कौटुंबिक नातेसंबंध किंवा व्यावसायिकअसूया यांच्यात मोबाइल - ईमेलवरील अशा माध्यमांचावापर वाढला असल्याने फेक मेसेजेसच्या अॅप्लिकेशनची त्यातनवी भर पडेल , अशी भीती तज्ज्ञांना वाटते . आपणच स्वतःला तिऱ्हाईतांच्या नावे ई - मेल करायचे आणित्यांचा भांडणतंटे किंवा व्यावसायिक काटाकाटीत पुरावाम्हणून वापर करायचा , असे प्रकार काही प्रकरणात उघडझाले आहेत . अशा प्रकारांमध्ये इंटरनेटवरील प्रॉक्सीसर्व्हरचा वापर केला जातो . हे सर्व्हर नायजेरिया , इंग्लंडआदी देशांमध्ये असल्याने भारतातील सायबर पोलिसांनागुन्हेगारापर्यंत पोहोचणे अशक्य बनते . आश्चर्य म्हणजे ,प्रत्यक्षात हा गुन्हेगार भारतातूनच फेक संदेशांचे व्यवहारकरीत असतो . काही पेड किंवा अनपेड वेबसाइट्सवरूनहीस्वतःच स्वतःला तिऱ्हाईत व्यक्तींच्या नावे ई - मेल करण्याचीसुविधा उपलब्ध होते . त्याचाही गैरवापर होत असतो , असेगुप्तवार्ता अधिकाऱ्यांना तपासात आढळले आहे . काहीदिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने तपास केलेल्या एका प्रकरणात एक बडी खासगी बँक बंदहोत असल्याच्या अफवा फेक संदेशाद्वारे पसरविण्यात आल्या होत्या . ठेवीदार खात्यातील पैसे काढू लागल्यावरत्यावर प्रकाश पडला होता . या माध्यमांमध्ये स्मार्टफोनसाठी उपलब्ध झालेल्या फेक मेसेजेस या अॅपची भर पडली आहे . यात इनकमिंग आणिआऊटगोइंग असे दोन्ही मेसेजेस कुणाच्याही नावे बनावट स्वरुपात तयार करण्याची सोय आहे . केवळ हे मेसेजेसतिऱ्हाइत व्यक्तीपर्यंत पाठविले जात नाहीत , इतकेच . केवळ मेसेजेस नव्हे तर कॉलच्या वेळा , आदी तपशीलांचेबनावट रेकॉर्ड तयार करण्याचे तंत्रही या अॅपमध्ये असते . अलीकडे पती - पत्नींमधील बिघडलेले संबंध आणि संशयाचे गढूळ वातावरण यांच्यात मोबाइलवरील मेसेजेसचावेगवेगळे दावे - प्रतिदावे करण्यासाठी उपयोग केला जातो . हे प्रमाण आता वाढल्याचे सायबर डिटेक्टिव्ह तज्ज्ञसांगतात . त्याचप्रमाणे दोन व्यवसाय भागीदारांमध्येही मोबाइल संभाषणांचा , कॉल रेकॉर्ड्सचा वापर केला जातो. एकमेकांमधले फेक मेसेजेस क्लायंटना दाखविल्यास त्यांचा त्यावर विश्वास बसू शकतो . पोलिस किंवा कोर्टाकडून या प्रकरणांच्या चौकशीचे आदेश आल्यास मोबाइल कंपन्यांमार्फत कॉलरेकॉर्ड्सचीखातरजमा होऊ शकते . पण प्रकरणे पोलिसांपर्यंत जाण्यापूर्वीच मेसेजेस , कॉल्सचे लॉग यांच्यावरून बिघडलेल्यानातेसंबंधांना तणावाचे नवे कारण मिळालेले असते . फेक मेसेजेस हे अशा प्रकारे दिशाभूल करू शकतात . त्यांचागैरवापर होऊ शकतो किंवा त्यातून नाहक गोंधळही उडू शकतो .

टॅबलेटसाठी भारत मोठी बाजारपेठ ||  —  स्‍वस्‍त टॅबलेटची विक्री सर्वात जास्‍त

टॅबलेटसाठी भारत मोठी बाजारपेठ || — स्‍वस्‍त टॅबलेटची विक्री सर्वात जास्‍त

टॅबलेटसाठी भारत आता मोठी बाजारपेठ बनला आहे. अ‍ॅपलच्‍या हायएंड टॅबपासून भारतीय कंपन्‍यांच्‍या कमी किंमतीचे टॅबलेटस बाजारपेठेत मोठयाप्रमाणात विकले जात आहेत....

Page 394 of 412 1 393 394 395 412

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected!