नवे लेख (Latest Posts)

तुलना करा, निवडा

इलेक्ट्रॉनिक वस्तू , कम्प्युटर , अॅक्सेसरी , प्रिटिंग - इमेजिंग आदीं उत्पादनांविषयीची माहिती पाहण्यासाठीत्याचबरोबच त्यांच्या किमती तसेच एका कंपनीच्या प्रॉडक्ट दुसऱ्या कंपनीच्या प्रॉडक्टशी तुलना करण्यासाठी http://compareindia.in.com/ ही साइट नक्की पाहता येऊ शकते . 

फेसबुक सुरक्षित पण स्लो होणार

वेगाच्या नव्या तंत्रज्ञानाच्या जगात रोज नवनवीन सर्व्हर , प्रोसेसर , तंत्रज्ञान यामुळे कम्प्युटर वेबसाइटचा वेग दिवसेंदिवस वाढतो आहे . सोबतच सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आहे . ऑनलाइन अॅक्टिव्हिटी अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी कंपन्या नवनवीन प्रणालीचा उपयोग करत आहेत . ही सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या फेसबुकचा वेग मात्र नव्या प्रणालीमुळे कमी होणार आहे .  युजर्सचे अकाऊंट अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी फेसबुक सुरुवातीला उत्तर अमेरिकेतील युजर्सला स्थलांतरितकरणार असून नंतर जगभरातील इतर ठिकाणच्या युजर्सला ही सुविधा दिला जाणार आहे . त्याठिकाणाहून फेसबुक https या http पेक्षा अधिक सुरक्षित कनेक्शनवर काम करणार आहे . त्यामुळे फेसबुकच्या वेब अॅड्रेसच्या अगदी सुरुवातीला http ऐवजी https दिसणार आहे . यातील s म्हणजे सिक्युअर . प्रामुख्याने बँकींग , ऑनलाइन शॉपिंग कंपन्या क्रेडीट कार्ड किंवा पासवर्डची माहिती मागताना अशाप्रकारच्या कनेक्शनचा वापर करतात .  फेसबुकच्या सर्व १ अब्जाहून अधिक युजर्ससाठी हेच कनेक्शन वापरले जाणार आहे . जानेवारी २०११ मध्ये फेसबुकने या स्थलांतरणाची सुरुवात केली . आतापर्यंत काही ठिकाणी ही सुविधा पर्यायी उपलब्ध होती .भारतातही इंटरनेट एक्सप्लोअरर सारख्या ब्राऊझरवर http तर मोझिलावर https कनेक्शन उपलब्ध होते . मात्र लवकरच सर्वांना ती बंधनकारक केली जाणार आहे . त्यामुळे अधिक सुरक्षित होण्याबरोबरच फेसबुक सुरक्षितहोणार आहे . वेग कमी होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी फेसबुककडून प्रयत्न केले जात असले तरी https वर ट्रान्सफर होण्यासाठीची प्रक्रिया थांबवणार नसल्याचे फेसबुकचे फ्रेडरीक वूलन्स यांनी स्पष्ट केले आहे .  या बदलाचा एक फायदा म्हणजे फेसबुक अकाऊंट अधिक सुरक्षित तर होईलच सोबत हॅकर्सपासूनही त्यांचे संरक्षण होईल . कारण https मध्ये सर्व डेटा एनक्रिप्टेड फॉर्ममध्ये असणार आहे . त्यामुळे वायफाय कनेक्शन वापरताना किंवा फेसबुक लॉग आऊट न करता कम्प्युटर बंद केल्यावरही अकाऊंटची सुरक्षा कायम राहणार आहे . या स्थलांतरणाचा आणखी एक फायदा म्हणजे ओळख नसलेल्या व्यक्तींनाही आता फेसबुक गेम खेळण्यासाठी आमंत्रित करता येईल . त्यामुळे फेसबुकच्या गेमिंगचा महसूल वाढणार आहे .  जानेवारी २०१० मध्ये जीमेलने सर्व युजर्सला https वर स्थलांतरित केले होते . पुढे जुलै २०१० मध्ये वेब ब्राऊझिंगच्या स्पीडमध्ये कुठलाही फरक पडला नसल्याचे जीमेलने म्हटले होते . हॉटमेल आणि ट्विटरवरही पूर्वीपासून https कनेक्शन वापरले जात आहे . 

एसएमएस होणार इतिहासजमा

दिवसभरात तुम्हाला मेसेजेस येण्याचे प्रमाण आणि तुम्ही मेसेजेस फॉरवर्ड करण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे तुमच्या लक्षात येईल . स्मार्टफोनचा जन्म आणि सोशल नेटवर्किंग साईटचा मोबाइलवरील वाढता वापर यामुळे एसएमएसच्या वापरावर परिणाम होऊ लागला आहे .  बहुतांश स्मार्टफोन युजर हे मेसेंजर सर्व्हिसेसचा सर्वाधिक वापर करू लागले आहेत . वायबारडॉटकॉम ,जक्सटर एसएमएस , आय मेसेज , व्हॉटसअॅप , अशा विविध फ्री अॅप्समुळे टेक्स्ट मेसेजेस पाठवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण टेक्नोलॉजी एक्सपर्ट , जेफ कागन यांनी मांडले आहे .  अमेरिकेतील मेजेस पाठवण्याच्या घटत्या प्रमाणाचा सर्वाधिक फटका जगातील तमाम मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्याना बसू लागला आहे . मेसेजेससाठी इतर पर्याय वापर वापरल्यास मोबाइल कंपन्यांना आर्थिक फायदा होत नाही . यामुळे अमेरिकेतील अनेक मोबाइल कंपन्यांनी आपल्या एसएमएस सुविधांचा पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे .  चेतन शर्मा या मोबाइल कन्सल्टंटने केलेल्या सर्व्हेत २०१२च्या तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेत टेक्स मेसेजेसमध्ये तब्बल तीन टक्के घट झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे . २०१२च्या सुरुवातीला फोर्बनेही अशीच आकडेवारीप्रसिद्ध केली होती यामध्ये हाँगकाँग , ऑस्ट्रेलिया , ब्रिटन , अमेरिका या देशांमधील आकडेवारी प्रसिद्ध करण्यातआली होती .  भारताच्या बाबतीत अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाली नसली तरी इथेही चित्र फारसे वेगळे नाही . येथील मोबाइल कंपन्यांनीही पर्यायी सुविधांचा विचार सुरू केला आहे . थ्रीजी तसेच लवकरच सुरू होणाऱ्या फोरजी या सुविधांमुळे टेक्स्ट मेसेजेस इतिहास जमा होतील , अशी भीती व्यक्त होत आहे . 

‘अॅपल’पुढे गुगलची अँड्रॉइड सरस

जगातील सर्वांत मोठा मोबाइल प्लॅटफॉर्म कोणता , तर अँड्रॉइड असे म्हणावे लागले . या ओपन सोर्स मोबाइल ऑपरेटिंग प्लॅटफॉर्ममुळे इनोव्हेश करण्यास वाव मिळतअसून , परिणामी मोबाइल फोनच्या किमतीही कमी होत आहेत . यामुळे अॅपल कंपनीपुढे गुगल कंपनीच अँड्रॉइडही ऑपरेटिंग सिस्टिम वरचढ ठरत आहे .  जगात विविध ठिकाणी पाठविण्यात येत असलेल्या फोनमध्ये चार फोनमागे तीन फोन हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचे आहेत . याबाबतची पुष्टीही आयडीसीने केली आहे . २००८ मध्ये गुगल कंपनीने अँड्रॉइड ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम लाँच केली . तेव्हापासून स्मार्टफोनच्या विक्रीतही मोठी वाढ झाली असून , ही ऑपरेटिंग सिस्टिमच या वाढीचे मुख्य इंजिन आहे . लाँच झाल्यापासून प्रत्येक वर्षीअँड्रॉइड ही सिस्टिम वाढीच्या बाबतीत सरस ठरली आहे .  दुसऱ्या तिमाहीत टॅब्लेट बाजारपेठेत अॅपल कंपनीचा हिस्सा ६५ टक्के होता आणि आता तो ५० टक्क्यांपेक्षा किंचित जास्त आहे . जागतिक पातळीवर विविध उत्पादकांकडून या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित डिव्हाइस तयार केली जात असून , त्यांच्या किमतीतही विविधता आहे . अँड्रॉइड स्मार्टफोनची निर्यात १३ . ६ कोटी युनिटवर पोचली आहे . गेल्या वर्षापेक्षा यात ९०टक्क्यांहून अधिक वाढ आहे .  सॅमसंग गॅलेक्स एस३ या स्मार्टफोनने अॅपल कंपनीच्या आयफोन ४ एसला तिसऱ्या तिमाहीत मागे टाकत जगात सर्वाधिक विकला जाणारा फोन होण्याचा मान मिळाविला आहे , असे पाहणी अहवालत नमूद केले आहे . अॅपलपेक्षा इनोव्हेशनच्या बाबतीत अँड्रॉइडचा वेग अधिक आहे . अँड्रॉइडकडून जोरदार प्रयत्न सरू असून , अॅपल कंपनी बरीच मागे आहे , असे गार्टरनचे म्हणणे आहे .  अँड्रॉइड हा ओपन सोर्सप्लॅटफॉर्म असून , वापरण्यास कोणतेही शुल्क द्यावे लागत नसल्याने अनेक कंपन्या या सिस्टिमचा आधार घेतडिव्हाइस डेव्हलप करीत आहेत . याचा फायदा हा अँड्रॉइडला मार्केट वाढण्याच्या रूपाने होत आहे . अँड्रॉइडप्लॅटफॉर्मवर अनेक पर्याय उपलब्ध असून  बहुतेक पर्याय स्वस्तात मिळतात . हा प्लॅटफॉर्म वापरण्याकडे लोकांचाकल वाढत आहे . दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा असली , तरी त्याचा फायदा हा प्रॉडक्ट रास्त किमतीला प्रसंगी स्वस्तात मिळण्याच्या रूपाने होत आहे हे नक्की ! 

Page 389 of 412 1 388 389 390 412

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected!