सोनी वायो टी ११ (अल्ट्राबुक)
गेल्या वर्षअखेरीस त्या वर्षांतील तंत्रज्ञानाचा आढावा न घेता नव्या वर्षांत येणाऱ्या आणि रुळणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी 'टेक-इट'मध्ये माहिती देण्यात आली होती. त्यात...
गेल्या वर्षअखेरीस त्या वर्षांतील तंत्रज्ञानाचा आढावा न घेता नव्या वर्षांत येणाऱ्या आणि रुळणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी 'टेक-इट'मध्ये माहिती देण्यात आली होती. त्यात...
लेनोवो या संगणक उत्पादनाच्या क्षेत्रातील कंपनीने आता भारतातील स्मार्टफोनच्या बाजारपेठेमध्ये प्रवेश केला आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या या लिनोवो स्मार्टफोन्समध्ये...
फूजीफिल्म ही एकेकाळी नावाजलेली कंपनी डिजिटल जमान्यात काहीशी मागे पडल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. मात्र गेल्या वर्षीपासून त्यांनीही या बाजारपेठेमध्ये...
भारतीय वंशाच्या संशोधकांची किमया जगातील सर्वाधिक वेगवान आणि अचूक गणिती प्रक्रिया करणारा कम्प्युटर विकसित करण्यात आला असून , मानवी मनातील भावना आणि विचारांच्या माध्यमातून त्याची हाताळणी शक्य असल्याचा दावा भारतीय वंशाच्या संशोधकाने केला आहे . या विशिष्ट कम्प्युटरचा फायदा शारिरीकदृष्ट्या अपंगांना होणार असल्याचेही त्यांनी स्पष्टकेले . अचूकता आणि गतिमानता यांच्या बरोबरीने नैसर्गिकरित्या चलनवलन ही या कम्प्युटरची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत .स्टॅन्फोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी मानवी मेंदूमध्ये बसविता येईल , अशी कृत्रिम प्रणाली निर्माण केली असून , ' रीफिट ' असे तिचे नामकरण करण्यात आले आहे .या प्रणालीसाठी आज्ञावलीदेखील ( अल्गोरिदम ) तयार करण्यात आली आहे . या प्रणालीच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या मानवी मज्जासंस्थेतून ( न्यूरल प्रोस्थेटिक ) कम्प्युटरच्या कर्सरवर नियंत्रण ठेवता येणार आहे . ' या प्रणालीच्या माध्यमातून शरीरावरील नियंत्रण हरवून बसलेल्या व्यक्तीदेखील सर्वसामान्यांनुसार कम्प्युटरची हाताळणी सहजरीत्या करू शकेल ,' असा विश्वास भारतीय वंशाचे संशोधक कृष्णा शेणॉय यांनी व्यक्त केला . ही प्रणाली मानवी मेंदूत बसविलेल्या सेन्सरद्वारे कार्यरत राहील . सेन्सरद्वारे होणारी प्रत्येक हालचाल अथवा कृती रेकॉर्ड करण्यात येईल . तसेच ती माहिती ' डेटा ' स्वरूपात कम्प्युटरकडे पाठविण्यात येईल , असेही शेणॉय यांनी नमूद केले . या संशोधनासाठी शेणॉय यांना डॉ . विकाश गिल्जा यांनी सहकार्य केले . हे महत्त्वपूर्ण संशोधन ' नेचरन्युरोसायन्स ' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech