नवे लेख (Latest Posts)

फॉण्ट्सची गंमत

कम्प्युटरमध्ये टायपिंग करत असताना एरिअल , टाइम्सरोमन फार फार तर कॅम्बरिया आणि  मराठीसाठी मंगल अशा ठराविक फॉण्टच्या पलीकडे आपण कधीच विचार करत नाही . प्रत्यक्षात  कम्प्युटरमध्ये खूप फॉण्ट्स असतात . प्रत्येक फॉण्ट बनवण्यामागचा एक उद्देश असतो . हेफॉण्ट  बनवताना टायपोग्राफर्स त्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत असतात , त्यात आपल्या भावना उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो . वर्षाला असे शेकडो फॉण्ट्स बाजारात येत असतात . सुंदर अक्षर ज्याप्रमाणे आपले लक्ष वेधून घेते त्याप्रमाणेच सुंदर फॉण्टही आपले लक्ष वेधून घेत असतो . यामुळे  टेक जगतात फॉण्टला विशेष महत्त्व आहे . सरत्या वर्षात बाजारात आलेल्या वेबवर तसेच मोबाइलवर वापरता येतील अशा काही बेस्टफॉण्ट्स विषयी ...  नोटीसीआ  हा फॉण्ट कॉम्पटीबल टाइपचा आहे . टॅबलेटच्या स्क्रीनवर कोणतीही गोष्ट वाचताना सुसह्य  व्हावी यादृष्टीने हा फॉण्ट तयार करण्यात आला आहे . या फॉण्टमध्ये वळदार अक्षरे चांगल्या  प्रकारे दिसतात . यामुळे हा फॉण्ट्सला अनेकांनी पसंती दर्शविली आहे . या फॉण्टमधील  वळणदारपणामुळे नेहमीच्या मोठ्या फॉण्टला पर्याय मिळणार आहे , असे फॉण्ट बनवणाऱ्यांचे  म्हणणे आहे . यात फॉण्टचे चार प्रकार असतील . हे फॉण्ट गुगल वेब फॉण्टमध्येउपलब्ध  आहेत . हे चारही फॉण्ट्स मोफत उपलब्ध आहेत .  बॅरिओल  विविध वेबसाइट्स आणि विविध अॅप्समध्ये दिसणारा गोलाकार फॉण्ट हा बॅरिओल फॉण्ट आहे  . हा फॉण्ट रेग्युलर आणि इटॅलिक अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे . गोलाकार अक्षरांमुळे  कोणतीही मोठी गोष्ट छोट्या जागेत सेट करता येणे शक्य होत आहे . कोणत्याही वेबसाइटच्या  मोबाइल आणि टॅबलेट व्हर्जनमध्ये मोठे फॉण्ट वापरले की , अनेकदा आपल्याला त्या गोष्टी  वाचण्यासाठी स्क्रोल करावे लागते . या त्रास या फॉण्टमुळे कमी होतो आणि छोट्या स्क्रीनवरही  फॉण्ट तितकाच चांगला दिसतो , असे फॉण्ट क्रिएटरने स्पष्ट केले आहे . ...

अ‍ॅपल, नोकियाला धोबीपछाड देऊन सॅमसंग पहिल्यांदाच टॉपवर!

अ‍ॅपल, नोकियाला धोबीपछाड देऊन सॅमसंग पहिल्यांदाच टॉपवर!

मोबाईल फोन बाजारात गेल्या 14 वर्षापासून प्रथम क्रमांकावर असलेल्या ब्रॅंड 'नोकिया'ला कोरियन कंपनी 'सॅमसंग'ने धोबीपछाड दिला आहे. संशोधन संस्था 'आयएचएस'ने सॅमसंगला...

स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी एअरबॅग

स्मार्टफोनमध्ये टचस्क्रीनचे प्रमाण सर्वाधिक आहे. टचस्क्रीन हा नाजूक  प्रकार आहे. त्यामुळे फोन पडल्यास स्क्रीन फुटण्याचा धोका अधिक  असतो ; तसेच फोनमध्ये बिघाड...

Page 383 of 412 1 382 383 384 412

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected!