नवे लेख (Latest Posts)

मराठी विश्वकोश ई-बुक स्वरूपात

मराठी विश्वकोश ई-बुक स्वरूपात

माहिती आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या मराठी विश्वकोशाचे सर्व १ ते १६ खंड आता ई - बुक स्वरूपात उपलब्धझाले आहेत . नियोजन आयोगाचे सदस्य डॉ . नरेंद्र जाधव यांच्या हस्ते नुकतेच सोळाव्या खंडाचे लोकार्पणकरण्यात आले . तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेले पहिले पंधरा खंड आणि प्रा . मे . पुं . रेगेयांनी संपादित केलेला सोळावा खंड असा हा लाखो पानांचा ऐतिहासिक दस्तावेज आता इंटरनेटच्या माध्यमातूनजगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे .  चेंबूर येथील आचार्य मराठे कॉलेजमध्ये आयोजित या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ . जाधव यांनी आज घराघरात कम्प्युटर तसेच मोबाइलद्वारे प्रत्येकाच्या हातात इंटरनेट पोहोचले असताना युनिकोडमधून विश्वकोश जसा आहे , तसा वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याची मराठी विश्वकोश मंडळाची संकल्पना अफाट असल्याचे सांगून विश्वकोश मंडळाची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारे ' सी - डॅक ' चे महेश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचीही स्तुती केली .  विश्वकोश मुलांनी वाचावा आणि इतरांनाही इंटरनेटवर तो वाचण्यास प्रवृत्त करावे , असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला . प्रयत्नवाद , आशावाद , उच्च ध्येय , नम्रता , आत्मविश्वास ,अपयशावर मात करण्याची जिद्द , प्रागतिक दृष्टिकोन , वेळेचे नियोजन आणि देशप्रेम ही यशाची नऊ सूत्रे असून त्यांची कास विद्यार्थ्यांनी कधी सोडू नये , असेही ते म्हणाले . तर ' विश्वकोश कोशात न राहता तो विश्वात यावा ,यासाठी ही सारी धडपड आहे ' असे विश्वकोश मंडळाच्या अध्यक्ष डॉ . विजया वाड यांनी सांगितले . ई - बुक आवृत्तीनंतर विश्वकोश आता टॅबलेटवरही उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सी - डॅकचेसंचालक महेश कुलकर्णी यांनी सांगितले . विश्वकोशाचे सर्व खंड  marathivishwakosh.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत . 

स्कायड्राइव्हचं ऑफिस : मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५

एमएस ऑफिस आणि कम्प्युटर यांचे एक अनोखे नाते . परंतु मध्यंतरीच्या काळात ओपन ऑफिस आणि गुगल डॉक यांनी मायक्रोसॉफ्टला शह देण्याचा प्रयत्न केला . तो प्रयत्नतितकासा यशस्वी झाला नसला तरी मायक्रोसॉफ्टला या दोन्ही उत्पादनांतील सुविधांचा विचार करून एमएस ऑफिसमध्ये बदल करणे क्रमप्राप्त झाले . ऑफिस २०१०मध्ये पूर्वीपेक्षा अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या .मात्र त्याही पलीकडे जाऊन काही सुधारणा आवश्यक होत्या म्हणून मायक्रोसॉफ्टने नुकतेच ऑफिस ३६५ लाँचकेले आहे . यामध्ये वर्ल्ड , एक्सेल , पॉवर पॉइंट , वन नोट , आऊटलूक , पब्लिशर अॅण्ड अॅक्सेस याचबरोबर २०जीबीपर्यंतचा स्कायड्राइव्ह स्टोअरेज मिळणार आहे .  मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं हे व्हर्जन आपल्याला मासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन भरून वापरू शकतो . याचावापर आपण एकावेळी पाच कम्प्युटर्स आणि पाच मोबाइल्समध्ये वापरू शकतो . आजपर्यंत ऑफिसची अशाप्रकारची कोणतीही सुविधा नव्हती . मायक्रोसॉफ्ट वेब अॅपच्या माध्यमातून आपण हे ऑफिस वापरू शकतो .याचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला मायक्रोसॉफ्ट आऊटलूक ही नवी मेल सुविधाही वापरता येणार आहे . तसेच मायक्रोसॉफ्टच्या वन नोट या नवीन सुविधेचा वापरही या ऑफिसच्या माध्यमातून करता येईल . वन नोट म्हणजे आपण आपली कामे यामध्ये स्टोअर करून ठेऊ शकतो . तसेच काही वाक्य जी आपण नेहमी आपल्या लिखाणात वापरत असतो ती वाक्यही सेव्ह करून ठेवता येतील .            ऑफिसच्या या व्हर्जनची आणखी एक खासियत म्हणजे यामध्ये आपल्याला स्कायड्राइव्ह वापरायला मिळणार आहे . या स्कायड्राइव्हमध्ये आपल्याला २० जीबीपर्यंतचा डेटा स्टोअर करता येणार आहे . यासाठी आपल्याला वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत . ते आपल्या ऑफिसच्या पॅकेजमध्येच मिळते . सध्या याचे ट्रायल व्हर्जन ३० दिवसांसाठी मोफत उपलब्ध आहेत . यापुढे येणाऱ्या विंडोज८ च्या सर्व कम्प्युटर्सवर ऑफिस ३६५ इंस्टॉल अॅप्लिकेशन म्हणून असेल . ऑफिसच्या या व्हर्जनमध्ये आपल्याला थर्ड पार्टी अॅप्स वापरता येणार आहे . यामध्ये पीडीएफ हे सर्वात उपयुक्त अॅप वापरता येईल . यामध्ये विंडोज७ प्रमाणेच आपण फाइल पीडीएफ फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो . याशिवाय लवकरच यामध्ये भारतीय युजर्सना उपयुक्त ठरतील असे रिड अॅण्ड राइटचे २०० अॅप्स येतील , असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे . यामध्ये ऑफिसहोम , स्टुडंट आणि प्रिमियम असे तीन व्हर्जन्स उपलब्ध आहेत .

पाच हजारांहून कमी किंमतीत शानदार ड्युअल सिम मोबाईल!

पाच हजारांहून कमी किंमतीत शानदार ड्युअल सिम मोबाईल!

सिंगल सिम मोबाईल फोनचा ट्रेंड हळूहळू कमी होतोय. कारण गॅझेटच्या दुनियेत ड्युअल सिम मोबाइलचा चांगलाच बोलबाला झाला आहे. मल्टीमीडिया, टच...

स्मार्टफोनमध्ये असलेल्या स्मार्ट कॅमेऱ्यांची ही ओळख

तंत्रज्ञान स्मार्ट झालं आणि एकाच उपकरणात अनेक उपकरणं सामावून घेण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. आता हेच बघा ना , एखाद्याला खुशाली कळवण्यासाठी उपयोगात...

Page 376 of 412 1 375 376 377 412

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected!