नवे लेख (Latest Posts)

प्रादेशिक भाषांतील ई-बुक

टेक्नोलॉजीच्या जमान्यात वाचन - लेखन आणि इतर अनेक बाबींमधील तंत्रेच बदलली . टेक्नोक्रांती झाल्यामुळे काम करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल झाले . प्रत्यक्षात आता कुणीही कागदावर हाताने फारसे लिहित नाही . त्याची गरजच उरलेली नाही . पुस्तकांच्या बाबतीत ही छापील पुस्तकाची जागा ' ई - बुक ' घेऊ लागले आहे  दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक पुस्तक मेळाव्यातही ' ई - बुक ' ची दखल घेतली गेली . एक वेगळा विभाग 'ई - बुक ' च्या प्रकाशकांसाठी , निर्मात्यांसाठी ठेवण्यात आला होता . कम्प्युटर , इंटरनेटबरोबरच स्मार्टफोनवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध झाली . सुरुवातीला इंग्रजी भाषेपुरतेच मर्यादित असणारे हे क्षेत्र आता जवळपास सर्व भाषांमध्ये विस्तारले आहे . स्मार्टफोन , आयफोन , अन्ड्रॉइड यांसारख्या फोनवर अनेक अॅप्लिकेशन्स आहेत .त्यात आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तके डाउनलोड करण्याच्या अॅप्लिकेशनची भर पडणार आहे . टॅबलेट आणि मोबाइलसाठी ई - बुक आणि ई - मॅगझिन्स पुरवणाऱ्या ' रॉकस्टँड ' या कंपनीने दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांच्या पहिल्या संचाचे अनावरण केले आहे . यामुळे प्रादेशिक भाषांमधील ई - पुस्तकेही फोनवर वाचता येणार आहेत . विविध प्रकाशनांची इंग्रजी पुस्तके ' ई - बुक 'वर उपलब्ध आहेत . आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांची मागणी यामुळे वाढणार आहे . केवळ ' प्रिंट कॉपीं 'च्या विक्रीवर होणाऱ्या नफ्याची गणिते आता केव्हाच मागे पडली आहेत . ' अॅन्ड्रॉइड ' वर एका अॅप्लिकेशनद्वारेही पुस्तके डाउनलोड करता येतील . ' रॉक असाप रिटेल प्रायव्हेट लिमिटेड ' चे संस्थापक संचालक प्रवीण राजपाल यांनी या अॅप्लिकेशनची माहिती दिली . ते म्हणाले , ' हिंदी , गुजराती , मराठी यांसारख्या प्रादेशिक भाषांमधील पुस्तके यामुळे सर्वांना मिळणारआहेत . एकूण १८ भाषांमध्ये आम्ही पुस्तके प्रसिद्ध करत आहोत .' यासाठी अॅन्ड्रॉइड फोनवर एक अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल . हे अॅप्लिकेशन मोफत डाउनलोड करता येईल . डाउनलोड केलेले पुस्तक कायमस्वरूपी वापरता येईल . इंटरनेट अॅक्सेस नसला , तरी डाउनलोड केलेले पुस्तक वाचता येणार आहे . नाइट रीडिंग मोड ,फॉण्ट साइजमध्ये बदल करणे , पुस्तक वाचताना नोट्स काढण्याची सोय यांसारखी वैशिष्ट्ये या अॅप्लिकेशनमध्ये आहेत . एवढेच नव्हे , तर वाचायचा आपल्याला कंटाळा आला , तर वाचून दाखवण्याची सोय या अॅपमध्ये आहे .पुस्तक डाउनलोड करण्याची किंमत ही छापील पुस्तकाच्या किमतीपेक्षा फार कमी आहे . सर्वांत स्वस्त पुस्तक हे 'चाचा चौधरी कॉमिक बुक ' असून पुस्तकाची किंमत केवळ एक रुपया आहे . कंपनीने नुकतेच देशातील पन्नास प्रकाशकांशी ' टाय - अप ' केलेले आहे . विविध भाषांमधील आणखी एक हजार पुस्तके त्यामुळे कंपनीच्या संग्रहात दाखल झाली आहेत . सध्या ' रॉकस्टँड ' कडे वीस लाख पुस्तके आहेत . आर्थिक फायद्यांबरोबरच वाचनसंस्कृती वाढीला लागावी हा या बदलत्या आणि प्रगतीशील तंत्रज्ञानाचा उद्देश आहे . हेसर्वांनी लक्षात घेऊन टेक्नॉलॉजीचा वापर वाचून समृद्ध होण्यासाठी करावा . 

मोबाइल खिलाडी मोबाइल गेम्स

कम्प्युटर गेम्सनी गेमिंग मार्केटमध्ये झालेल्या भरगच्च उलाढालीनंतर आता टॅबलेट्स आणि स्मार्ट फोनमध्ये गेमिंगची लाट सुरू झाली. सरत्या वर्षांत या गेम्सनी...

वेबसाइट टेस्टिंग आणखी सोपे : मॉडर्न . आयई

गेल्या काही वर्षांत मोझिला , ओपेरा , क्रोम यासारखे अनेकब्राऊझर बाजारात आले . त्यातील सोयीसुविधांमुळे इंटरनेट एक्सप्लोअररकडे ( आयई ) काही अंशी दुर्लक्ष झाले .त्यामुळे आयईमध्ये स्वतः तयार केलेल्या वेबसाइटचे सर्व फीचर्स योग्यरितीने चालतील याची खात्री डेव्हलपर्सला नसते . त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने ' मॉडर्न . आयई ' ही वेबसाइट तयार केली आहे . या वेबसाइटवर वेबसाइट टेस्टिंगचे सर्व पर्याय उपलब्ध करून दिले आहेत . त्यात नव्याजुन्या सर्व आयईमध्ये चालू शकतील अशा वेबसाइटचे टेस्टिंग करता येते . यात वेबसाइट टेस्टिंगचे टूल मोफत देण्यात आले आहे .वेबसाइटच्या एचटीएमएल कोडिंगचे पूर्ण स्कॅनिंग यात होते आणि नव्याजुन्या आयईवर कुठे काही प्रॉब्लेमयेण्याची शक्यता वाटली ; तर लगेच अॅलर्ट दिला जातो . केवळ अॅलर्ट देऊनच ही वेबसाइट थांबत नाही , तर कशापद्धतीने कोड लिहिला म्हणजे त्याला प्रॉब्लेम येणारनाही हे देखील सुचविते . यात मोबाइल , टॅब , मोठे मॉनिटर यावर वेबसाइट योग्य रितीने कशी दिसेल यासाठीहीमदत केली जाते . विंडोज ८ वर वेबसाइट व्यवस्थित चालावी यासाठीही याठिकाणी मदत केली जाते . यावेबसाइटवर नव्या सिस्टीमसाठी आवश्यक कोडिंगबाबत १०० टक्के मार्गदर्शन केले जात नसले तरी , सध्याच्याकोडिंगमधील ८० - ९० टक्के कमतरता दूर करण्यासाठी मदत केली जाते , असे आयईचे जनरल मॅनेजर रायनगाविन म्हणतात . या व्यतिरिक्त साइटच्या चेकिंगसाठी मायक्रोसॉफ्टने दोन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात साइटची व्हर्च्युअल मशीनवर टेस्टिंग करण्याची सोय आहे .  Link to Click Here >>>>> modern.ieम्हणजे नवीन साइट विंडोज एक्सपी असणाऱ्या मशिनमध्ये आयई ६ वर , विस्टाच्या मशीनमध्ये आयई ७ वर ,विंडोज ८च्या मशीनवर आयई ८ मध्ये तुमची वेबसाइट कशी काम करेल हे ती ऑपरेटिंग सिस्टीम , सॉफ्टवेअरइन्स्टॉल न करताही चेक करता येऊ शकते . सध्या तरी विंडोज आधारित मशिनवर ही सुविधा उपलब्ध असून ,लवकरच लिनक्स आणि ओएसवर चालणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे . मायक्रोसॉफ्ट एवढ्यावरच थांबलेली नाही तर , वेबसाइटची अधिकाधिक टेस्टिंग करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्टने ब्राऊझर स्टॅकसोबत करार केला असून कंपनीच्या सुविधांचा तीन महिने मोफत लाभ घेता येणार आहे . सोबतच वेबसाइट डेव्हलपर्ससाठी विविध टिप्सही याठिकाणी देण्यात आल्या आहेत .त्यामुळे वेब डेव्हलपर्सच्या भविष्यातील समस्या कमी होतील , अशी आशा आहे . 

गुगलचे हँगआऊट जीमेलवर : मित्रांसोबत चॅट जीमेलचा नवा पर्याय

ग्रुप चॅट तेही व्हिडिओवर करण्याची धम्माल आता जीमेलवर उपलब्ध होणार आहे . गुगलने नुकतेच आपल्या ग्रुप व्हिडीओ चॅटिंगची हँगआऊट सेवा भारतीय युजर्ससाठी लाँच केली .यामध्ये आपण एकाच वेळी नऊ जणांशी बोलू शकणारआहोत .  ही सेवा वापरण्यासाठी युजर्सनी केवळ जीटॉकच्या पॅनेलशेजारी असलेल्या व्हिडीओ कॅमेरावर क्लिक करायचे आहे . यानंतर एक नवीन विंडो पॉप - अप होईल . यात गुगल प्लसमधील आपल्या मित्रांची यादी दिसणार आहे .यामध्ये आपण त्यांच्या जीमेल आयडीवर क्लिक करून त्यांना व्हिडीओ चॅटलिस्टमध्ये अॅड करू शकतो .                      गुगल प्लसमध्ये नसलेल्या एखाद्या मित्राशी आपल्याला चॅट करायचे असेल तर आपण जीमेल आयडीवरून त्यांना इन्व्हिटेशन पाठवू शकतो . हे चॅट आपण हँगआऊट या फिचरचा वापर करून सर्वांसाठी खुले करू शकतो . यासाठी युट्यूबचे अकाऊंट लागते . यानंतर ते चॅट ब्रॉडकास्ट होताना दिसेल . आपण त्या ग्रुपमध्ये करत असलेल्या विविध चर्चा आपल्या फोटोसह सर्वांना पाहवयास मिळणार आहेत . एकदा हँगआऊट सुरू झाले की , आपल्या ग्रुपमेंबर्सची यादी आपल्याला स्क्रीनच्या खालच्या बाजूस दिसते तर व्हिडीओ वरच्या बाजूस दिसतो . जीमेलच्या विंडोच्या डाव्या बाजूला चॅट्स , स्क्रीनशेअर , गुगल ड्राइव्ह , गुगल डॉक्स , इफेक्ट्स आणि पिंग पाँग हँगआऊट असे पर्याय दिसू लागतील . चॅट आणि हँगआऊटच्या माध्यमातून मित्रांना मेसेजेसही पाठवता येणार आहेत . तर स्क्रीनशेअर या सुविधेमध्ये मित्रांशी स्क्रीनशॉट शेअर करता येणार आहेत . हे शेअर केल्यावर आपल्या ग्रुपमधील सर्व मेंबर्सना तो व्हिडीओ पाहता येणार आहे . गुगल ड्राइव्ह आणि गुगल डॉक्स हे व्हिडीओ चॅट्समध्ये अधिक गंमत आणतील , असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे .  हँगआऊटमध्ये जाऊन मज्जा - मस्ती करायची असेल तर गुगलने हँगआऊटमध्ये गेम्सचीही सुविधा दिली आहे .यामध्ये आपल्या ग्रुपमधील एखाद्याशी गेम्स खेळता येणार आहेत . याचबरोबर यामध्ये आपण विविध वॉलपेपर्स ,साऊंड इफेक्ट्स , फोटो आदी गोष्टी आणि आपल्या आवडीचे अॅप्सही वापरू शकणार आहोत . भविष्यात गुगलच्या सर्व सुविधा म्हणजे कॅलेंडर , ई - मेल यालाही हँगआऊट करता येणार आहे . म्हणजे एकाच वेळी आपण एखादी गोष्ट आपल्या विविध मित्रांशी शेअर करू शकतो . त्यामुळे आता मित्रांसोबत हँगआऊट करण्यासाठी जीमेलचा नवा पर्याय खुला झाला आहे . 

Page 374 of 412 1 373 374 375 412

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected!