गूगलने लॉन्च केला बोलणारा, हसणारा तसेच रडणारा शूज
विकसीत तंत्रज्ञान, व्हर्चुअल जगात क्रांती घडवून 'गुगल'ने तरुणाईला अक्षरश: वेड लावलंय. स्वप्नवत वाटणार्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा गुगलने प्रयत्न सुरु केले...
विकसीत तंत्रज्ञान, व्हर्चुअल जगात क्रांती घडवून 'गुगल'ने तरुणाईला अक्षरश: वेड लावलंय. स्वप्नवत वाटणार्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा गुगलने प्रयत्न सुरु केले...
नोकिया स्टोअरमध्ये असलेल्या विविध अॅपमध्ये जागतिक पातळीवर भारतीय अॅप विकासकांनी आघाडी घेतली आहे. या स्टोअरमध्ये असलेल्या जवळपास 1 लाख 20...
बिल कमी करणारे ' स्मार्ट ' अॅप्स ' एसएमएस , फोन कॉल्स , व्हिडीओ कॉल्स या सर्वांमुळे आपले मोबाइलचे बिलाचे आकडे इतक्या झपाट्याने वाढतात की , ते आपल्या लक्षातही येत नाहीत . पण आपला फोन स्मार्ट असेल तर आपण आपले बिल नक्कीच कमी करू शकतो . अँड्रॉइड किंवा आयओएसवर चालणाऱ्या अॅप्सची त्यासाठी मदत होईल . आपले बिल वाचविणारे काही अॅप्स ... फ्री कॉलिंगला वाढती पसंती स्कायपे तसं हे फेमस अॅप आहे . बहुतांश स्मार्टफोन यूजर्स हे अॅप वापरतच असतील . हे अॅप मोबाइल आणि डेस्कटॉप अशा दोन्हीकडे वापरता येऊ शकते . स्कायपेवरून आपण फ्री व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकते . यावरून आपल्याला फोन्स किंवा व्हिडीओ कॉल्स करायचे असतील तर आपल्या मित्रांचे किंवा कुटुंबीयांचे अकाऊंट त्यात अॅड करून घ्यावे लागते . यानंतर आपण त्या व्यक्तींना एक रुपयाही खर्च न करता फोन करू शकतो किंवा व्हिडीओ कॉलिंग करू शकतो . याचा वापर आपण इन्स्टंट मेसेंजिंगसाठीही करू शकतो. याद्वारे आपण फोटोही शेअर करू शकतो . Download Skype निंबूझ इन्स्टंट मेसेंजिंग इंटीगेटर म्हणून सुरू झालेल्या निंबूझ या अॅपचा वापर आता खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाआहे . हे अॅप आता कम्प्युटर , स्मार्टफोन आणि फीचर फोन यामध्ये वापरू शकतो . निंबूझ ते निंबूझ यूजरसोबतआपण व्हॉइस कॉल्स आणि व्हीडिओ कॉल्स करू शकतो . कम्प्युटर , अँड्रॉइड , आयओएस आणि सिंबियन याऑपरेटिंग सिस्टिमवरून आपण वॉइस कॉल्स करू शकतो तर आयओएस आणि कम्प्युटरवरून व्हिडीओ कॉल्सकरू शकतो . याशिवाय या अॅपवरून आपण चॅटिंगही करू शकतो . Download Nimbuzz ओवू तुम्हाला तुमच्या ग्रुप्सशी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत किंवा त्यांच्याशीच चॅटिंग करायचं आहे तर तुम्हीओवू हे अॅप वापरू शकता . या अॅपच्या माध्यमातून आपण ग्रुप व्हिडीओ चॅट करू शकतो . यामध्ये आपणएकावेळी १२ जणांशी बोलू शकतो . हे अॅप आपल्याला स्मार्टफोन आणि कम्प्युटर्सवर उपलब्ध आहे . याचबरोबरआपण या माध्यमातून फेसबुक फ्रेंडस आणि ट्विटरच्या फॉलवर्सशी व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल्स करू शकतो . हेअॅप आपल्याला चॅटिंगसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार आहे . वुई चॅट वुई चॅट हे अॅप्लिकेशन आपल्याला व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देते . यामध्ये आपल्याला व्हॉइस चॅटची सुविधाआहे . पण यातून आपण व्हॉइस कॉलिंग करू शकणार नाही . व्हॉइस चॅटच्या माध्यमातून आपण व्हॉइस मेसेजेसपाठवू शकतो . याशिवाय यामध्ये आपल्याला ग्रुप टेक्स्ट चॅट्स , मल्टिमीडिया शेअरिंग आणि ब्राऊजर्सच्यामाध्यमातून चॅट करू शकतो . यात ' लूक अराऊंड ' नावाचं एक फीचर आहे , ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याआसपास असलेल्या वूई चॅट यूजर शोधून त्याच्याशीही आपण चॅटिंग करू शकतो Download WeChat. फ्रिंग स्कायपेशी साधर्म्य साधारणारे हे अॅप सध्या बाजारात चांगलेच चालत आहे . अँड्रॉइड , आयओएस आणि सिंबियनऑपरेटिंग सिस्टिमवर वापरता येणार आहे . यामध्ये आपण व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स करू शकणार आहोत .हे कॉल्स करण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडेही फ्रिंग असणे आवश्यक आहे . यात तुम्ही चॅट करू शकतातयाचबरोबर तुम्ही मल्टीमीडिया कंटेन्टही आपण शेअर करता येऊ शकणार आहे . याशिवाय यात तुम्हाला ग्रुपव्हिडीओ प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत .. Download...
आयफोन आणि सॅमसंगच्या स्मार्टफोनमुळे ब्लॅकबेरी बिझनेस फोनच्या स्पर्धेतून कधी बाहेर पडला कोणालाकळलंही नाही . पण नुकत्याच लाँच झालेल्या ब्लॅकबेरीच्या ' झेड१० ' या फोनमुळे स्मार्टफोनचे मार्केट पुन्हाएकदा ढवळून निघणार आहे . या स्पर्धेत सध्या ब्लॅकबेरीसमारे सॅमसंगचा गॅलेक्सी एस ३ , नोकिया लुमिया ९२०आणि आयफोन ५ हे फोन्स आहेत . यात कोण बाजी मारेल हे येणारा काळच ठरवेल . या सर्व फोन्समध्ये कोणवरचढ आहे हे जाणून घेऊया ... ब्लॅकबेरी झेड १० ब्लॅकबेरी भारतीय बाजारात आला आणि फोनच्या वापरला नवा पैलू मिळाला . कुणाचा बिझनेस तर कुणाचंऑफिस फोनवर अवतरलं . कालांतराने स्मार्टफोन बाजारात आले आणि ब्लॅकबेरी जुनाट वाटू लागला . पणनुकतंच ' ब्लॅकबेरी १० ' ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम घेऊन बाजारात आलेल्या ' झेड १० ' या फोनने अनेकटेकसॅव्ही मंडळींचे लक्ष वेधून घेतलं आहे . आकर्षण : याचं पाहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्यात होमस्क्रीन , विजेट्स , अप लिस्ट आणि ई - मेल इनबॉक्स एकत्रकरण्यात आले आहे यामुळे युजर नॅविगेशन सोपं होणार आहे . लॉक स्क्रीन : तुमचा फोन लॉक असला तरीही अलार्म , न वाचलेले ई - मेल्स फोनच्या डाव्या बाजूला दिसताततसंच तुमच्या मिटींग्सही सतत दिसत राहतात . फोन लॉक असतानाच कॅमेरा वापरून पटकन एखादा फोटोहीकाढू शकता . अगदी अँड्रॉइडप्रमाणे अंगठा स्लाईड करून हा फोन अनलॉक करता येतो . होम स्क्रीन : मेन होम स्क्रीन मध्ये ' अॅक्टिव फ्रेम्स ' अर्थात अॅप्सची थोडक्यात माहिती दिसते तर त्यावर टॅपकरून ते अॅप्स सुरू करता येतात . या फ्रेममध्ये आपण सतत वापरात असलेले आठ अॅप्स आपोआप दिसतात .यामुळे सर्वात जास्त वापरात असलेले अॅप्स हाताशी राहतात . इंटरफेस : अॅपलिस्टमध्ये अॅप्स बघण्यासाठी तुम्हाला उजवीकडून डावीकडे स्वाईप करावं लागतं . यात एकापेजमध्ये १६ अॅप्स दिसतात . जर जास्त अॅप्स असतील तर आणखी पेजेस येत जातात . फेड इफेक्ट : एका पानावरून दुसऱ्या पानावर जाताना फेड इफेक्ट दिला आहे जो खूप मस्त आहे . यात जुन्यापानावरचे अॅप्स फेड होतात आणि नवीन पानावरचे अॅप्स दिसतात . नोटिफिकेशन : इतर स्मार्टफोनपेक्षा या फोनमधील नोटिफिकेशनची सिस्टीम वेगळी आहे . यात तुम्हालाखालच्या बाजूने वर स्वाइप करावे लागते . याचा फायदा म्हणजे नोटिफिकेशन चेक करत असताना एखादं अॅपसुरू असेल तर ते अॅप मिनिमाईज होऊन जातं . डाव्या बाजूला नवीन इ - मेल्स , बीबीएम , एसएमएस आणिसोशल मिडिया मेसेजेस दिसत राहतात . उजव्या बाजूला स्क्रोल केलंत तर तुम्हाला या सगळ्याचा प्रिव्ह्यू दिसतो. ब्लॅकबेरी हब ःनावाप्रमाणेच या हबमध्ये तुम्ही तुमचे अनेक ई - मेल अकाऊंट्स , बीबीएम , एसएमएस , सोशलमीडिया मेसेजेस , कॉल हिस्ट्री तसंच व्हॉटअप्स , फेसबुक , ट्विटर सारखे थर्डपार्टी अॅप्स एकत्र आणू शकता . पर्सनल आणि वर्क मोड : ब्लॅकबेरी झेड १०मध्ये पर्सनल आणि वर्क असे दोन मोड आहेत . यातील पर्सनलमोडमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या फाइल्स , ई - मेल्स सेव्ह करून ठेऊ शकता . या मोडमधील फाइल्स एनस्क्रिप्टेडहोतात पण यात लॉकिंग सिस्टीम नसते . वर्क मोडमध्ये काम करत असताना तुमच्या कंपनीच्या नियमांनुसारत्याला बंधनं येतात . या दोन्हीचा वापर जर फोन कंपनीने दिला असेल तरच होतो . अॅप्स वर्ल्ड : ब्लॅकबेरी १० मध्ये आपल्याला नवीन अॅप्सवर्ल्ड पाहता येणार आहे . यात अॅप्स बरोबरच म्युझिक ,व्हिडिओही खरेदी करता येऊ शकणार आहे . कॅमेरा : ब्लॅकबेरी १० चा कॅमेरा हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य . यामध्ये टाइम शिफ्ट नावाचं एक फीचर देण्यातआले आहे . ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचा फोटो अगदी बिनचूक येऊ शकेल . याच्या कॅमेरामध्ये मोठ्या प्रमाणावरइनोवेशन्स करण्यात आले असून त्याला खूप अतिरिक्त फिचर्स देण्यात आले आहेत . यामुळे फोटोग्राफीचा एक छानअनुभव आपल्याला घेता येणार आहे . ब्राऊजर : ब्लॅकबेरी१०मध्ये ब्राऊजरही बदलण्यात आला असून याचा अॅड्रेस बार विंडोजच्या फोनप्रमाणे खालच्याबाजूस असणार आहे . याशिवाय यामध्ये एचटीएमल ५ असणार आहे . बॅटरी लाइफ : मोठी टच स्क्रीन आणि अॅक्टिव्ह फ्रेम्स असल्या तरी याची बॅटरी लाइफ इतर स्मार्टफोनपेक्षा चांगलीअसल्याचा दावा रिसर्च इन मोशन या कंपनीने केलाय . यामध्ये फिक्स टाइम बॅटरीचे अनोखे फिचर देण्यात आलेआहे . इतर फिचर्स प्रोसेसर - ड्युएल कोर , १ . ५ गीगाहार्टज मेमरी - १६ जीबी इंटरनल मेमरी , ६४ जीबीपर्यंत एक्स्पाण्डेबल कॅमेरा - आठ मेगापिक्सेल , फ्रंट कॅमेरा दोन मेगापिक्सेल रेडीओ - नाही . रॅम - दोन जीबी . सिमकार्ड सपोर्ट - फक्त मायक्रो सिम किंमत - ४३ , ४९० सॅमसंग गॅलेक्सी एस ३ स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये ४५ टक्के शेअर्स असलेल्या कंपनीचे फोन अँड्रॉइड या अफलातून ऑपरेटिंगसिस्टीमबरोबरच कॅमेऱ्याच्या वैशिष्ट्यांमुळेही चर्चेत आहेत . त्यापैकीच गॅलेक्सी एस - ३ हा ब्लॅकबेरी झेड - १०च्या स्पर्धेत उतरणारा हा स्मार्टफोन आहे . कॅमेरा : या फोनमधला कॅमेरा ही याची खासियत . ८ मेगापिक्सेल ताकदीचा कॅमेरा त्याच्या बॅक साइडइल्युमिनिटेड या नव्या फीचरमुळे चांगलाच लोकप्रिय आहे . या फीचरमध्ये फोटो काढताना अधिक प्रकाश पडतोआणि त्यामुळेच तो चांगला येतो . याशिवाय ' बर्स्ट ' नावाचं एक झकास फीचरही या कॅमेऱ्यामध्ये आहे . हे फीचरतुम्हाला एका विशिष्ट क्षणाचे २० फोटो काढून त्यातील आपल्या आवडीचा फोटो निवडण्याचा पर्याय देतो .त्यापैकी हवे तितके फोटो ठेऊन बाकीचे डीलिट करता येऊ शकतात . याशिवाय टच फोकस , स्माइल डिटेक्शन ,जीओ - टॅगिंग , इमेज एडिटर हे फीचर्सही सोबतीला आहेतच . ओएस : अँन्ड्रॉइड ४ . ० ( आइस्क्रीम सँडविच ) डिसप्ले : ७२० x १२८० पिक्सेल ४ . ८ इंच सुपर एमोएलइडी डिसप्ले विथ कॅपेसेटिव्ह टच स्क्रीन , गोरिलाग्लास इंटर्नल मेमरी : १६ / ३२ / ६४ जीबी एक्सपांडेबल मेमरी : ६४ जीबी रॅम : १ जीबी कॅमेरा : ८ मेगापिक्सेल विथ ऑटोफोकस आणि एलइडी फ्लॅश , फ्रंट कॅमेरा १ . ९ मेगापिक्सेल . फ्रंट कॅमेरा : १ . ९ मेगापिक्सेल प्रोसेसर : १ . ५ गिगाहाटर्झ कोरटॅक्स ए ९ कोड कोर प्रोसेसर चिप : एक्सीनोस जी . पी . यू . : मेल ४०० रेडिओ : आहे . वैशिष्ट्यं स्मार्ट स्टे : जोपर्यंत तुम्ही स्क्रीनकडे बघत असाल तोपर्यंत डिसप्ले लाइट बंद होणार नाही . डायरेक्ट कॉल : तुम्ही एखाद्याला मेसेज करत असाल आणि तुम्हाला त्याला कॉल करायचा असेल तर फक्त फोनकानाला लावला की आपोआप त्या व्यक्तीला कॉल लागेल . इतर फीचर्स एस बीम , एस वॉइस , अॅक्टिव्ह नॉइझ कॅन्सलेशन विथ डेडिकेटेड माइक , ड्रॉपबॉक्स , इमेज / व्हिडियो एडिटर ,डॉक्युमेंट एडिटर , टी . व्ही . आऊटपुट , एस एन एस इंटीग्रेशन , अॅडॉब फ्लॅश ११ सपोर्टेबल काही तोटे या फोनमध्ये फक्त मायक्रो सिम कार्ड सपोर्टेबल आहे . विशिष्ट ' कॅमेरा की ' नाही . किंमत - ३४ , ९०० नोकिया लुमिया ९२० एकेकाळी मोबाइल मार्केटमध्ये राज्य गाजवणारी नोकिया . ही कंपनी स्मार्टफोनच्या मार्केटमधून बाहेर पडली .यावेळी सॅमसंग , आयफोन यांच्या तोडीस तोड बनून मार्केटमध्ये येण्यासाठी नोकियाने मायक्रोसॉफ्टच्याविंडोजशी भागीदारी करून लुमिया सीरिज लाँच केली . विंडोज ८ ही ऑपरेटिंग सिस्टिम फोनमध्ये लाँच केली .वायरलेस चार्जिंग ही या फोनची मोठी खासियत आहे . या फोनचं सर्वात मोठ वैशिष्ट्यं म्हणजे सर्वात लेटेस्टटेक्नोलॉजीची विंडोज ८ ऑपरेटिंग सिस्टीम आहे . भारतीय मोबाइल बाजारात विंडोज फोन्सशी संख्या हाताच्याबोटावर मोजण्याइतकी आहे . या फोनची बॉडी अॅल्युमिनिअम बेस्ड आहे . त्यामुळे हा दिसायला फारच क्लासीआणि आकर्षक दिसतो . याचं वजन १८५ ग्रॅम आहे . यावरून हा फोन किती हलका आहे ह्याचा अंदाज येईल . याफोनसाठी ' गोरील्ला ग्लास २ ' चा वापर करण्यात आला आहे . त्यामुळे हा फोन हातातून सटकून पडला तरीघाबरण्याची गरज नाही . स्क्रीन साइज : ४ . ५ इंच ( १२८० x ७६८ ) प्युअर मोशन एचडी + डिस्प्ले ऑपरेटिंग सिस्टिम : विंडोज फोन ८ प्रोसेसर : ड्यूअल कोर १ . ५ जीएचझेड स्नॅपड्रॅगन एस ४ प्रोसेसर रॅम : १ जीबी रॅम कॅमेरा : ८ . ७ मेगापिक्सल प्युअर व्ह्यू रेअर कॅमेरा , १ . २ मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा मेमरी : ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज चार्जिंग : वायरलेस चार्जिंग कनेक्टिविटी : वायफाय , ब्लू टूथ , मायक्रो युएसबी बॅटरी : २ , ००० एएच बॅटरी किंमत : ३८ , १९९ आयफोन ५ मोबाइलप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते तो , ' अॅपल ' चा ' आयफोन ५ ' शुक्रवारी देशभरातीलनिवडक आउलेट्समध्ये दाखल झाला . आयफोन म्हणजे ब्रॅण्डबाबत कोणालाही शंका घेण्याचे कारणच नाही .फोनचे फीचर्स आणि त्यांचा वापर याही गोष्टी खूप चांगला अनुभव देऊन जातात . ' सॅमसंग गॅलॅक्सी एस - ३ ' 'ब्लॅकबेरी झेड १० ' आणि काही प्रमाणात नोकिया लुमिया या तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी ' आयफोन ५ ' ची कडवीटक्कर आहे . ' आयफोन५ ' ची वैशिष्ट्ये : स्क्रीन : चार इंचाची स्क्रीन , १३६ बाय ६४० पिक्सेलचे स्क्रीन रिझोल्युशन डिस्प्ले : रेटिना डिस्प्ले प्रोसेसर : ड्युअल कोअर ए ६ चिप कॅमेरा : १ . २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा मेमरी : इंटरनल १६ जीबी ते ६४ जीबीपर्यंत . ( याला एक्स्पाण्डेबल मेमरी नसते . कारण यात कार्ड स्लॉटउपलब्ध नाही .) डिस्प्ले : एलईडी बॅकलाइट कपॅसेटिव्ह टचस्क्रीन ऑपरेटिंग सिस्टिम : आयओएस ६ यामध्ये तुम्ही आयओएस ६ . १पर्यंत अपग्रेड करू शकता . ब्राऊजर : एचटीएमएल सफारी ब्राऊजर प्रोसेसर : ड्युअल कोर १ . २ गीगाहार्टज सिमकार्ड : मायक्रो सिमकार्ड रेडिओ : नाही . किंमत : ३२ आणि ६४ जीबी फोनची किंमत अनुक्रमे ५२ , ५०० आणि ५९ , ५०० असणार आहे . एक्सपिरीया झेड' मोबाईलमधील सॉफ्टवेअरपासून बॉडी पार्टपर्यंत सर्व फिचरमध्ये आधुनिक टेक्नोलॉजी http://marathitech.blogspot.com/2013/03/xperia-sony-tablet-z-launched.html
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech