गुगलवरच गुगली
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बदल ही नवीन गोष्ट नसली तरी तेसर्वांनाच पसंत पडतील याची खात्री मात्र कुणीच देऊ शकतनाही . अगदी बड्या कंपन्यांनाही त्यामुळे टीकेचा सामना करावा लागतो . सध्या गुगलवर ही वेळ आली असूनजीमेल , डूडल आणि प्रायव्हसी पॉलिसीवरुन गुगलला टीकेचा सामना करावा लागतो आहे . जीमेल मध्ये नवीन ईमेल टाइप करण्यासाठी पूर्वी नवीन पेज दिसत होते . पण त्याऐवजी आता नवीन पॉप - अपविंडो ओपन होऊ लागली आहे . ऑक्टोबरपासून गुगल त्याची चाचपणी करत होते आणि पूर्वीच्या पेक्षा ही पद्धतअधिक वेगवान असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे . जीमेल युझर मात्र यावर खूश नाहीत . त्यांनी ट्विटरवरयाविषयी नापसंती व्यक्त केली असून इतर ईमेल सर्विसचा वापर करण्याचा विचार करत असल्याचे त्यांचे म्हणणेआहे . मात्र ज्या युझर्सला हा बदल आवडलेला नाही त्यांना जुन्या पद्धतीनेच ईमेल टाइप करण्याची सोय उपलब्धआहे . त्यासाठी कंपोझ बटनावर क्लिक केल्यावर नवीन ईमेल टाइप करण्यासाठी पॉप अप विंडो ओपन होईल .त्या विंडोमध्ये उजव्या हाताच्या खालील भागात more options असा पर्याय उपलब्ध आहे . त्यावर क्लिककेल्यावर temporily switch back to old compose असा ऑप्शन उपलब्ध आहे . त्यावर क्लिक केल्यावरपूर्वीप्रमाणे नवीन मेल टाइप करण्यासाठी स्वतंत्र पेज ओपन होईल . इस्टरच्या डुडलवरून टीका सीझार चावेझ यांच्या जयंतीनिमित्त इस्टरच्या दिवशी गुगलने तयार केलेले डूडल अनेक अमेरिकन नागरिकांनापसंत पडले नाही . अमेरिकेतील नॅशनल फार्म वर्कर्स असोसिएशनचे सहसंस्थापक असलेल्या चावेझ यांचे १९९३मध्ये निधन झाले होते . गेल्यावर्षी ३१ मार्च हा दिवस ओबामा यांनी सीझार चावेझ डे म्हणून जाहीर केला होता. त्यामुळे गुगलने रविवारी तयार केलेल्या डूडलमध्ये गुगल लोगोच्या मध्यभागी चावेझ यांचा चेहरा बसविण्यातआला होता . मात्र नेमका त्याच दिवशी इस्टर असल्याने इस्टरऐवजी चावेझ यांच्यावर डूडल तयार केल्याने अनेकनागरिक नाराज झाले . गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरिक स्मिड आणि ओबामा यांच्यातील घनिष्टसंबंधांमुळे हे डूडल तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यापर्यंत अनेकांची मजल गेली . प्रायव्हसीवरुन युरोपियन देशांचा रोष ब्रिटन , फ्रान्स , नेदरलँड , जर्मनी , स्पेन आणि इटली या सहा देशांनी मिळून गुगलच्या प्रायव्हसीपॉलिसीविरोधात संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे . गेल्यावर्षी कंपनीने ६० स्वतंत्र प्रायव्हसीपॉलिसी एकत्र करून एक युनिव्हर्सल पॉलिसी तयार केली होती . मात्र त्यामुळे गुगलकडे ग्राहकांची काय माहितीआहे आणि ती कंपनीकडे किती काळ राहील हे त्यांना कळत नसल्याचा आरोप या देशांनी केला आहे . माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांना मात्र कंपनीच्या सर्च इंजिनच्या यशस्वितेसाठी ही पॉलिसी गरजेची असल्याचे वाटते .