‘सॅमसंग’, ‘मोझिला’चे नवे ब्राउजर : लवकरच ‘सर्वो’ ब्राउजर लाँच करणार
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनातील अग्रणी 'सॅमसंग' आणि ब्राउजरच्या दुनियेतील 'मोझिला' यांच्यातर्फे संयुक्तपणे नवे वेब ब्राउजर सादर करण्यात येणार आहे. 'सर्वो' या नावाने...
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनातील अग्रणी 'सॅमसंग' आणि ब्राउजरच्या दुनियेतील 'मोझिला' यांच्यातर्फे संयुक्तपणे नवे वेब ब्राउजर सादर करण्यात येणार आहे. 'सर्वो' या नावाने...
' मायक्रोसॉफ्ट विंडोज ' हा शब्द कधीही कम्प्युटर नहाताळलेल्या व्यक्तीलाही माहिती असेल . मायक्रोसॉफ्टनेएमएस - डॉसचे विस्तारक म्हणून २० नोव्हेंबर , १९८५ रोजी ' विंडोज ' नामक ऑपरेटिंग सिस्टिम आणली .१९८४ मध्ये सादर झालेल्या ' अॅपल ' च्या ' मॅकिंटॉश ' ला मागे टाकत विंडोजने पर्सनल कम्प्युटर ( पीसी )बाजार काबीज केला आहे . ऑक्टोबर २०११ च्या माहितीनुसार ग्राहक संचालन प्रणालीच्या बाजारात नव्वदटक्क्याहून जास्त वाटा विंडोजचा आहे . पर्सनल कम्प्युटर , ' विंडोज ७ ', सर्व्हरसाठी ' विंडोज सर्व्हर २००८आरटू ' व मोबाइल फोनसाठी ' विंडोज फोन ८ ' या विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या आहेत . आता मायक्रोसॉफ्ट' विंडोज ब्ल्यू ' या नावाने नवीन ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात आणत आहे . यानिमित्ताने मायक्रोसॉफ्टच्याऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाचा अक्षय पेंडभाजे यांनी घेतलेला हा आढावा . विंडोजचा इतिहास विंडोजचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला सप्टेंबर १९८१ पर्यंत मागे जावे लागते , जेव्हा ' इंटरफेसमॅनेजर ' हा प्रकल्प सुरू झाला . तो ' विंडोज ' या नावाने नोव्हेंबर १९८३ मध्ये घोषित झाला खरा , पण नोव्हेंबर१९८५ पर्यंत ' विंडोज ' प्रकाशित झाली नाही . ' विंडोज १ . ० ' चे बाह्यावरण ' एमएस - डॉस एक्झिक्युटिव्ह 'नावाचा प्रोग्रॅम होता . कॅल्क्युलेटर , कॅलेंडर , कार्डफाइल , क्लिपबोर्ड दर्शक , घड्याळ , कंट्रोल पॅनल , नोटपॅड ,पेंट , रिव्हर्सी , टर्मिनल , राइट हे इतर पुरवलेले प्रोग्राम होते . विंडोज ३ . ० व ३ . १ विंडोज ३ . ० ( १९९० ) व ३ . १ ( १९९२ ) या ऑपरेटिंग सिस्टिम खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्ट्या यशस्वीहोत्या . अॅपल विरुद्ध विंडोज या युद्धाच्या सुरुवातीला अॅपलच्या ओएसला टक्कर देण्यासाठी विंडोजने नवीनजीयूआय , इंटेलचा ८०२८६ आणि ८०३८६ या सीपीयूना चांगला सपोर्ट या गोष्टी ३ . ० मध्ये , तर ३ . १ मधेविंडोज राजिस्ट्री , ट्रू टाइप फॉन्ट्स , मिनीस्वीपर या गोष्टींचा समावेश केला . विंडोज ३ . १ च्या दोन महिन्यांतएक लाख कॉपीज विकल्या गेल्या . विंडोज ९५ ' विंडोज ९५ ' ऑगस्ट १९९५ साली प्रकाशित झाली . चार दिवसात एक लाख कॉपीज विकल्या गेल्या , असे हेओएस होते . यात विंडोजने पहिल्यांदाच स्टार्ट बटणचा समावेश केला होता . विंडोज ९८ मायक्रोसॉफ्टचे दुसरे प्रकाशन ' विंडोज ९८ ' जून १९९८ साली प्रकाशित झाले . मायक्रोसॉफ्टने १९९९ सालीयाचीच दुसरी आवृत्ती प्रकाशित केली . तिचे नाव विंडोज ९८ , सेकंड एडिशन होते . ' विंडोज ९८ एसई ' हात्याचा शॉर्टफॉर्म . या ओएसला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला . थीम सपोर्ट , थंबनेल्स , वन - क्लिकलाँच , गेमिंग साठी डायरेक्ट एक्स ६ . १ , अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात करण्यात आला होता . विंडोज एमई फेब्रुवारी २००० मध्ये ' विंडोज २००० ' बाजारात आले . या पाठोपाठ लगेजच विंडोज मिलेनियम एडिशन (एमई ) बाजारात आली . ' विंडोज एमई ' ने ' विंडोज ९८ ' कडून गाभा अद्ययावत केला असला , तरी ' विंडोज२००० ' कडूनही काही पैलू अद्ययावत केले व ' बूट इन डॉस मोड ' हा पर्याय काढला . विंडोज एक्सपी ' विंडोज एक्सपी ' खासगी कम्प्युटरवर ( गृह , व्यापारी , मीडिया केंद्रांसह ) चालणारी ओएस आहे . २४ ऑगस्ट२००१ रोजी ती प्रथम कम्प्युटर उत्पादकांना मिळाली . कम्प्युटरवर प्रस्थापित केलेली आणि वापरण्याससोयीस्कर अशी ही विंडोजची सध्याची सर्वात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम आहे . ' एक्सपी ' हे नाव'experience' याचा शॉर्टफॉर्म आहे . निर्मितीपूर्व काळात तिचे सांकेतिक नाव ' व्हिसलर ' असे होते . ' विंडोजएक्सपी ' ची रिटेल विक्री २५ ऑक्टोबर २००१ ला सुरू झाली . जानेवारी २००६ मध्ये ' विंडोज एक्सपी ' च्या४० कोटीहून अधिक प्रती वापरात होत्या , असे एका आयडीसी विश्लेषकाचा अंदाज आहे . ' एक्सपी ' नंतर 'विंडोज व्हिस्टा ' व्यावसायिकांना ६ नोव्हेंबर २००६पासून व सामान्य जनतेला ३० जानेवारी २००७ पासूनमिळू लागली ....
स्मार्टफोनच्या दुनियेत सध्या तगडी टक्कर सुरू आहे. एका बाजूस आयफोन विरुद्ध सॅमसंग गॅलेक्सी एस थ्री असा सामना रंगला आहे. त्यात...
खिशात , पर्समध्ये सहज सामाविणारा आणि हातातउठून दिसणा-या सर्वव्यापी मोबाइलने बुधवारी चाळीशीतपदार्पण केले . आज घराघरात पोहोचलेल्या या दिमाखदारउपकरणाची ३ एप्रिल १९७३ रोजी मार्टीन कूपर या 'मोटोरोला ' कंपनीतील वरिष्ठ इंजिनीअरने निर्मिती केलीआणि लँडलाइनला नवा आणि अत्याधुनिक पर्याय दिला . गेल्या चाळीस वर्षांमध्ये मोबाइलने तंत्रज्ञान आणि दूरसंचारक्षेत्रात ' न भूतो न भविष्यति ' क्रांती घडवून आणली .जीनिव्हास्थित ' इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन 'च्या अहवालानुसार आजपावेतो जगभर ६ अब्जांपेक्षा अधिकमोबाइल आहेत . आजच्या घडीला जगाची लोकसंख्या ७अब्जांवर येऊन पोचली आहे . जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात मोबाइलच्या वाढीचे प्रमाण कितीतरी अधिकआहे . चाळीस वर्षांपूर्वी बाजारपेठेत आलेल्या या उपरणाची अनेकांनी हुर्यो उडविली होती . मात्र , उण्यापुऱ्या चारदशकांच्या कालखंडात या उपकरणाने सर्व विरोधकांची दाणादाण उडवित नाक मुरडणाऱ्यांच्या खिशातच नव्हेतर , मनातही जागा पटकाविली . पूर्वी केवळ हौस आणि चैनीसाठीच मोबाइल मिरविण्याचा ट्रेंड होता . आतामात्र , मोबाइल ही चैन नसून गरजेची वस्तू बनली आहे . मोबाइलचा जन्मदाता मार्टीन कूपर ( वय ८५ ) यांना मोबाइलचे जन्मदाता म्हणून ओळखले जाते . १९७३मध्ये मोबाइलची संकल्पनाकूपर यांनी विकसित करून तिचे प्रारूप सादर केले असले , तरी प्रत्यक्षात तो बाजारपेठेत येण्यासाठी दहा वर्षांचाकालावधी लागला . १९८३ मध्ये आलेल्या DynaTAX 8000X या हँडसेटची किंमत होती ३५०० डॉलर .. त्यावेळी असलेली किंमत पाहता हे उपकरण जनमानसांत लोकप्रिय होईल , अशी सुतराम शक्यताही वाटत नव्हती . 'मोबाइलची निर्मिती झाली त्यावेळी त्याचा आकार आणि वजन खूपच होते . पण आता मुठीत सामावणारेमोबाइलही बाजारात आले आहेत . ते पाहून डोळे भरून येतात ,' अशी भावपूर्ण प्रतिक्रियाही कूपर व्यक्त करतात .१९६०मध्ये ' एटी अँड टी ' ने कार टेलिफोनची निर्मिती केली . तो पाहून आपल्याला मोबाइलची कल्पना सुचली, असेही कूपर म्हणाले . सध्या जगभर ६ अब्जांहून अधिक मोबाइल फोनची विक्री झालेली असली , तरी त्यात सर्वाधिक वाटा अँड्रॉइडफोनचा आहे . ऑपरेटिंग सिस्टीम - बाजारहिस्सा ( टक्के ) अँड्रॉइड - ७२ . ४ आयओए - १३ . ९ ब्लॅकबेरी - ५ . ३ बाडा - ३ . ० सिंबियन - २ . ६ विंडोज - २ . ४ अन्य - ० . ४ ( स्रोत : गार्टनर )
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech