मराठीटेक अॅप्लिकेशन आता Amazon App स्टोरवरती उपलब्ध
Amazon App स्टोर हे गूगल प्ले स्टोर नंतरचे सर्वात विश्वासार्ह app स्टोर मानलं जातं. आणि अशा app स्टोरवर आता मराठीटेकचं...
Amazon App स्टोर हे गूगल प्ले स्टोर नंतरचे सर्वात विश्वासार्ह app स्टोर मानलं जातं. आणि अशा app स्टोरवर आता मराठीटेकचं...
विंडोजच्या वेगवेगळ्या व्हर्जन्सशी सगळेच परिचित आहेत .बहुतेक सगळेच जण ' विंडोज ' ची ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात . ' विंडोज व्हिस्टा ', ' विंडोज ७ ', ' विंडोज ८ 'नंतर आता ' विंडोज ब्लू ' किंवा ' विंडोज ८ . १ ' येऊ घातलेआहे . विंडोजच्या आधीच्या व्हर्जनमध्ये असलेल्या उणीवा दूर करून नवीन व्हर्जन अधिक आकर्षक आणि यूझर फ्रेंडली करण्याची ' मायक्रोसॉफ्ट ' ची हातोटी आहे . पण , ' विंडोज८ ' च्या बाबतीत ही ' हातोटी ' तितकीशी यशस्वी झाली नाही . टच स्क्रीनची सुविधा नसलेल्या कम्प्युटरवर ही सिस्टीम तितकी समर्थपणे ऑपरेट झाली नाही आणि थेट डेस्कटॉपला बूट न होणे या बाबी अनेकांना पटल्या नाहीत . त्यामुळे किमान या दोन बाबींचे समाधान ' विंडोज 'ने द्यावे , अशी मागणी यूझरकडून बराच काळ होत होती . ग्राहकांचा हा तक्रारींचा सूर ' मायक्रोसॉफ्ट ' पर्यंत पोहोचला असावा . येऊ घातलेल्या ' विंडोज ब्लू ' मध्ये ' स्टार्टबटन ' पुन्हा दिसणार असल्याची चर्चा कम्प्युटर जगतात आहे . थेट डेस्कटॉपलाही बूट करता येणार आहे . या नव्या व्हर्जनमध्ये हे बदल होण्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे . खात्रीशीर वृत्त मात्र नाही . त्यामुळे हे नक्की काय गौडबंगाल आहे , हे जाणून घेण्याचे कुतूहल ग्राहकांमध्ये आहे . मात्र , असा बदल झाला , तर तो ग्राहकांसाठी इष्टच आहे . असे झाले , तर कंपनीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे होईल , की मायक्रोसॉफ्ट ' बॅक फूट' वर गेली आहे आणि पुन्हा एकदा यूझरच्या मागणीला अनुसरून आपल्या सिस्टीममध्ये ती पूर्वीप्रमाणे बदल करेल. नव्या व्हर्जनमध्ये पहिल्यांदा हे बदल प्रस्तावित नव्हते . पण , ते होण्याची दाट शक्यता आहे . वेगवेगळ्या माध्यमांतून गेल्या आठवड्यांपासून ही वृत्ते येत आहेत . ' मेट्रो स्टाइल ' मध्ये होणाऱ्या बूटिंगला फाटा देऊन थेट डेस्कटॉप बूटिंग यूझरना करता येईल , अशी सुविधा पुरवण्याकडे मायक्रोसॉफ्टची वाटचाल सुरू आहे . ' विंडोज 'वर ' स्टार्ट बटन ' ही पुन्हा येण्याची शक्यता असल्याचे विविध सूत्रांनी सांगितले आहे . ' विंडोज ब्लू ' चे उत्पादन या वर्षी कदाचित सुरुवात होईल . त्यावेळी हे दोन्ही बदल होतील , की नाही हे सर्वांना कळेलच . तत्पूर्वी काही अधिकृत घोषणा झाली , तर ग्राहकांसाठी उत्तमच ! ' विंडोज ८ ' चा यूझर इंटरफेस हा चांगला आहे . मात्र , टच स्क्रीन नाही , त्यांच्यासाठी ' विंडोज ' चे जुनेच व्हर्जन चांगले , असे सध्या म्हणावे लागत आहे . बरेचसे यूझर त्यामुळे जुन्याच व्हर्जन्सना पसंती देत आहेत . ' विंडोज ब्लू ' मधील नव्या बदलाने हा त्रास टळून विंडोज अधिक यूझर फ्रेंडली सिस्टीमचा वापर सर्वांना करता येईल , याची आशा बाळगूया .
दोन तास १४ मिनिटे ... आपण दिवसातील एवढा वेळ ई -मेल तपासण्यासाठी घालवत असतो . याचाच अर्थ असा की आपण आपले ई - मेल्स तपासणे आणि त्याला उत्तरे देण्यासाठी आपल्या कामाच्या वेळेतील २५ टक्के वेळ खर्च करत असतो . मॅकेन्सीने नुकतेच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार सन २०१२मध्ये ' ई - मेल ' हे दैनंदिन कामातील सर्वात मोठे काम असल्याचे समोर आले आहे . इनबॉक्समध्ये येणाऱ्या ई - कॉमर्स किंवा डिस्काउंटच्या जाहिराती त्रासदायक ठरतात . बड्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या एका माणसाला दिवसाला किमान १०० ई - मेल्स वाचायचे असतात . ही माहिती टेक्नॉलॉजी मार्केटिंग फर्म रडेकटी ग्रुपने केलेल्या पाहणीत समोर आली आहे . यातील बहुतांश मेल्स डीलीट करण्यात वेळ वाया जातो . कामाच्या गडबडीत वेळ वाचवायचा असेल तर काही सुविधांचा वापर करता येऊ शकेल . अनरोल डॉट मी (Unroll.me) - यामध्ये सर्व ई - मेल्सच्या इनबॉक्समधील जाहिरातींचे मेल्स आपण एकाच वेळी जमा करू शकतो . याला ' डेली डायजेस्ट ' म्हणतात . तुमच्या मेल्समधील मसेजेस इथं आले की , तुम्ही ते सर्व ई -मेल्स डिलिट करू शकतात . ही सेवा जीमेल आणि याहू मेल यांच्यासाठी उपलब्ध आहे . फॅन मिक्स (FanMix) - जे सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करतात अशा युजर्ससाठी ही सेवा उपयुक्त ठरूशकते . यामध्ये आपल्या ई - मेलवर येणारे सर्व नोटिफिकेशन्स एकत्र केली जातात . याचा फायदा असा की ,आपल्याला ट्विटर , फेसबुक , लिंक्डइन आणि ब्लॉग कन्व्हरसेशन एका ठिकाणी दिसू शकतात . यात आपल्याला फेसबुक नोटिफिकेशनबरोबरच फेसबुक मेसेजेसही पहावयास मिळतात . सेनबॉक्स (SaneBox) - या सेवेमध्ये महत्त्वाचे नसलेले ई - मेल्स एकत्रित केले जातात . जेणेकरून इनबॉक्समध्ये आपल्याला केवळ महत्त्वाचे मेल्स उपलब्ध राहतील . ही सुविधा आपण जीमेल , याहू , एओएल , अॅपल मेल ,आऊटलूक , आयफोन , अँड्रॉइड या सर्वांसाठी उपलब्ध आहे . द ई - मेल गेम (The Email Game) - आपला इनबॉक्समध्ये एकही बिनकामाचा मेल न ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे ' द ई - मेल गेम ' यामध्ये आपल्या इनबॉक्समधील मेल्सचे व्यवस्थित बायफरकेशन केले जाते .यामुळे आपला इनबॉक्स अधिक स्वच्छ दिसू शकतो . झीरो बॉक्सर (0Boxer) - ही एक जीमेलची प्लगइन टूल आहे . या माध्यमातून आपण आपले मेल्स अर्काइव्हमध्ये ठेऊ शकतो तसेच आपल्या ई - मेल्सला रिप्लायही देऊ शकतो . ही सुविधा सध्या बीटा मोडमध्ये उपलब्ध आहे .पण या सुविधेमध्येही आपण आपला इनबॉक्समध्ये एकही मेल राहणार नाही याची काळजी घेऊ शकतो .
मनोरंजन , ऑनलाइन व्हिडीओ आणि गेम्स , डॉक्युमेंटवर काम करणे , डाटाबेस हे सर्व क्लाऊडवर करण्याचे प्रमाण वाढले आहे . सोशल नेटवर्किंगवर मित्र आणि कुटुंबांबरोबर गप्पा होत असतात . हे सर्व करताना मोबाइलवरील इंटरनेटचा ब्राऊजर महत्त्वाची भूमिका बजावत असतो . ब्राऊजर हे एक प्रकारचे फ्री मिळणारे अॅप्लिकेशन आहे . मात्र , या सॉफ्टवेअरवर काही विशेष सुविधा आपल्या अॅड करता येऊ शकतात . वेबपेजवर एखादा लेख वाचताना अनेक स्पॉन्सर्ड लिंक ( अॅड ) असतात . त्या फोटो , पॉपअप स्वरूपात पुढे येतात. मात्र , अशा अॅड वाचण्यात अडथळा निर्माण करतात . मात्र , पुन्हा तेच आर्टिकल ऑनलाइन स्वरूपात वाचायचे असल्यास पॉपअपचा अडथळा टाळता येऊ शकतो . ' एव्हरनोट ' मुळे हे करता येणे शक्य आहे . डार्क आणि लाइट थीम यात निवडता येते . ' एव्हरनोट ' चे अकाऊंट असल्यास संबंधित लेखाचे क्लिप किंवा त्यातील काहीभाग अधोरेखित करून संदर्भासाठी वाचता येतो . डाऊनलोड Evernote : >>>>> एव्हरनोट <<<< फायरफॉक्स , क्रोम वापरणाऱ्यांना ही सुविधा वापरता येते .इंटरनेट एक्सप्लोअरर वापरत असलेल्या ' एव्हरनोट ' वेब क्लिपरचा वापर करता येऊ शकतो . मात्र , यासाठी 'एव्हरनोट ' प्रोग्रॅम कम्प्युटरवर लोड करावा लागतो . ही विशिष्ट अॅप्लिकेशन वापरल्यास वेब वापरण्याचा अनुभव सु्खद होऊ शकतो . त्यामुळे या अॅप्लिकेशनचा विचार करायला हरकत नाही . स्मार्टफोन आणि इंटरनेट प्लॅन रास्त दरात उपलब्ध असल्याने मोबाइलवर इंटरनेट सर्फ करण्याचे प्रमाण वाढले आहे . ऑनलाइन व्हिडीओ बघणे अनेकांना आवडते . ब्राऊजरमधील प्लग - इनच्यामार्फत आवडते व्हिडीओ डाऊनलोड करता येतात . इंटरनेट एक्सप्लोअरर वापरणारे यूजर आयई डाऊनलोड हेल्परचा वापर करता येऊ शकतो . इंटरनेट एक्सप्लोअररच्या नव्या ३ . ५ व्हर्जनवर व्हिडीओ फाइलच्या साइझबाबत मर्यादा आहेत .त्यामुळे आयईचे ३ . ३ च्या व्हर्जनचा विचार करता येईल . फायरफॉक्स वापरणाऱ्यांनी व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी व्हिडीओ डाऊनलोड हेल्परची मदत घ्यावी . वेबपेजचा अॅक्सेस केल्यावर या एक्स्टेंशन प्रोससमुळेव्हिडीओ हा एएलव्ही , एमपी४ आणि ३जीपी फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करता येऊ शकतो . याचे रेझोल्यूशन१०८० पिक्सेलपर्यंत असू शकतो . क्रोम वापरणारे यूजर यू - ट्यूब डाऊनलोडरचा विचार करू शकतात . आपण पाहत असलेल्या व्हिडीओच्या खालीच डाऊनलोड बटन असते . त्यामुळे फाइल डाऊनलोड करणे सोपे जाते . Tubemate : >>>> tubemate.net <<<< * marathitech does not take responsibility...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech