टीव्ही

नेक्सस 5X आणि नेक्सस 6P सादर सोबत नवा क्रोमकास्ट

नेक्सस 5X आणि नेक्सस 6P सादर सोबत नवा क्रोमकास्ट

गूगलने दोन नव्या नेक्सस फोन्स जाहीर केले असून आजपर्यन्त एकच फोन दसर करण्याच्या प्रथेला त्यांनी फाटा दिलाय. नेक्सस फोन्सचं वैशिष्ट्य...

गुगल क्रोमकास्ट

काही दिवसांपूर्वी गुगलने क्रोमकास्ट हे व्हिडीओ डोंगल सादर केले. टीव्हीला कनेक्ट करून या  डोंगलच्या आधारे युट्यूबआणि इतर साइट्सवरील व्हिडीओ पाहता येणार आहेत.सध्या अमेरिकेत हे डिव्हाइस उपलब्ध असले तरी लवकरच त्याचे भारतातही आगमन होणार आहे.  सध्या डिव्हाइसची किंमत ३५ डॉलर ठरविण्यात आली आहे.अॅपल टीव्हीसाठी सेटटॉप बॉक्स घ्यायचा असेल तर १०० डॉलर मोजावे लागतात.तर वेबबेस्ड अॅप्लिकेशन चालविण्यासाठी आवश्यक टीव्हीची किंमत १ हजार डॉलर आहे.त्या तुलनेत क्रोमकास्ट स्वस्तच म्हणावा लागेल.  अॅपल टीव्ही वगैरे इंटरनेटला कनेक्ट होणारे असले,तरी त्यांना सोबत घेऊन फिरणे शक्य नाही . क्रोमकास्ट हे केवळ डोंगल असल्याने सोबत कुठेही नेऊन वापरता येते.टीव्हीला जोडा,वायफायकनेक्ट करा आणि सुरू करा त्याचा वापर , इतके ते सोपे आहे.  www.google.com/chromecast‎<<<<<To Know More क्रोमकास्ट युट्यूब,नेटफ्लिक्स आणि गुगल प्ले सारख्या अॅप्लिकेशनला सपोर्ट करते.पैसे मोजले तर  अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि एचबीओ देखील यावर पाहता येतात.त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुलभ होतात.  आयफोन , आयपॅड , अँड्रॉइड मोबाइल किंवा टॅब क्रोमकास्टच्या सहाय्याने थेट टीव्हीशी जोडतायेतो.त्यामुळे तुमच्या मोबाइल,टॅबमधील व्हिडीओ थेट टीव्हीवर पाहता येतात.यासाठी कुठल्याही विशेष रिमोटची गरज पडत नाही.  क्रोमकास्ट घेतल्यावर सेट टॉप बॉक्स,इंटरनेट डोंगल यासारख्या इतर कुठल्याही उपकरणाची गरज पडत नाही.केवळ क्रोमकास्टच्या आधारे व्हिडीओ ऑडिओ टीव्हीवर थेट पाहता येतात .  इतर सर्व सोयीसुविधांप्रमाणे हे डिव्हाइसदेखील यशस्वी व्हावे यासाठी गुगल सर्वतोपरी प्रयत्न  करेल.त्यामुळे युजर्सचा सध्याचा अनुभव पाहून गुगल नजिकच्या भविष्यात त्यातील त्रुटी दूर  करून अधिकाधिक सोयी पुरवेल हे निश्चित . याची लोकप्रियता पाहून भविष्यात केवळ गुगलचनव्हे तर अॅपल , अॅमेझॉन आणि इतर कंपन्याही या डिव्हाइससाठी त्यांचे अॅप्स लवकरच सादरकरतील .  सध्या एचडी व्हीडिओचा ट्रेंड आहे.क्रोमकास्ट एचडीएमआय पोर्टला जोडायचे असल्याने यात थेट एचडी व्हिडीओ पाहण्याची सोय होणार आहे. 

Page 5 of 6 1 4 5 6
ADVERTISEMENT
error: Content is protected!