अॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार रुपये
सप्टेंबर महिन्यात आय फोन फाइव्ह लॉन्च करताना , आपण लवकरच मिनी ऑयपॅड घेऊन येणार असल्याची खुशखबर अॅपलनं टेक - सॅव्ही तरुणांना दिली होती . आपला हा शब्द त्यांनी पाळला असून , मिनी आयपॅडचं दर्शन जगाला घडवले. नव्या मिनी आयपॅडची स्क्रीन फक्त ७ . ९ इंचांची आहे . याआधीच्या आयपॅडची स्क्रीन दहा इंचांची होती . ए - ५प्रोसेसर , पाच मेगापिक्सल कॅमेरा , एचडी व्हिडिओ चॅट ही नव्या मिनी आयपॅडची वैशिष्ट्ये आहेत . नव्या मिनी आयपॅडचे वाय - फाय मॉडेल ३२९ डॉलर (सुमारे १७ हजार ६७८ रुपये ) किंमतीचे आहे , तर थ्री जी मॉडेलची किमान किंमत ४५९ डॉलर सुमारे २५हजार २०० रुपये आहे . अॅपलच्या नव्या आयपॅडसाठी २६ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होत आहे . नवा मिनी आयपॅड टॅबलेट गूगलच्या नेक्सस - ७ टॅबलेटपेक्षा जास्त उत्तम आहे ; असे अॅपल कंपनीने सांगितले .कंपनीने मिनी आयपॅड टॅबलेट व्यतिरिक्त १३ इंची स्क्रीन आणि ० . ७५ इंची जाडीचे मॅकबुक प्रो देखिल लाँच केले. हे आतापर्यंतचे वजनाने सर्वात हलके मॅकबुक प्रो आहे . अॅपलने मंगळवारी रात्री उशिरा सॅन जोन्स येथे बहुप्रतिक्षित आयपॅड मिनी लॉंच केले. यावेळी अॅपलचे वरिष्ठ उपाध्यक्ष फिलिप शिलर...