Social Media

डिसलाइक… फेसबुक..निधनाची बातमीही ‘लाइक ‘ केली जाते ?

फेसबुक हे व्यक्त होण्याचं साधन झालं आहे. वैयक्तिक आणि आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर इथे मत दिलं जातं. त्या मतांमध्ये जाणवतो तारतम्याचा...

‘फेसबुक’च्या भात्यातही आता ‘हॅशटॅग’ #

सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असणाऱ्या ' फेसबुक ' ने वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी अखेर ' हॅशटॅग ' ची घोषणा केली आहे. सध्या ' ट्विटर ', ' गुगल प्लस ' आणि ' इन्टाग्राम' या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट्सवर सध्या ' हॅशटॅग 'वापरले...

फेसबूकचा नवीन लूक भारतात दाखल

भारतामध्ये फेसबूकवरील नेटक-यांना आता त्यांचा व्हर्चुअल लूक बदलता येणार आहे. कारण फेसबूकने मार्च महिन्यात लाँच केलेला नवीन लूक भारतामध्येही अॅक्टीव्ह...

‘सोशल नेटवर्किंग’ची दुनिया आभासीच

सोशल नेटवर्किंग साइट्स . रोज एकदा तरी व्हिजिटकेल्याशिवाय कुणाचे पानही हलत नसेल , इतके त्याचे महत्त्व . फ्रेंडलिस्ट वाढवण्याची इच्छा आणि चॅटिंगकेल्याशिवाय चैन न पडणे , हे या साइट वापरणाऱ्यांचे वैशिष्ट्य . आताच्या काळात कुणीही या साइट्सचे महत्त्वनाकारणार नाही . अमेरिकेत मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनात ही दुनिया आभासीच असल्याच्या मुद्द्यावरशिक्कामोर्तब करण्यात आले . अण्णा हजारे यांची चळवळ , इजिप्तमधील नागरी चळवळ बऱ्यापैकी यशस्वीहोण्यामागे सोशल नेटवर्किंग साइट्सही कारणीभूत होत्या , असा दावा अनेकांनी केला . या दाव्याला धक्कापोहोचविणारे संशोधन तिथे झाले आहे . कुठलीही संकटकालीन परिस्थिती ( भूकंप , पूर इत्यादी ), मोठ्याप्रमाणावरील नागरी चळवळी यांमध्ये सोशल नेटवर्किंग साइट्स परिणामकारक ठरत नाहीत , असे हे संशोधनसांगते . उलट अशा प्रकारच्या साइट्सचा वापर अपेक्षित मदतकार्याला किंवा चळवळीला मारकच ठरतो , असाही दावा करण्यात आला आहे .  अमेरिकेतील ' डिफेन्स अॅडव्हान्स्ड् रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी ' ने २००९मध्ये हा प्रयोग केला . या प्रयोगातीलनिष्कर्षावरून संशोधकांनी सोशल नेटवर्किंग साइट्सच्या परिणामकारकतेवर भाष्य केले आहे . नेटवर्किंगसाइट्सचा वापर आणि त्याची प्रत्यक्षातील परिणामकारकता या प्रयोगात तपासण्यात आली . साइटच्यावापरामुळे एखाद्या संकटकालीन परिस्थितीत प्रत्यक्ष किती जण मदतीला आले एखादी चळवळ प्रत्यक्षात कितीमोठ्या प्रमाणात फोफावली , हे तपासण्यात आले . त्यासाठी एक अनोखा प्रयोग करण्यात आला . चाळीस हजारडॉलरचे पारितोषिक त्यासाठी ठेवण्यात आले . अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या अशा दहा ठिकाणी ' वेदर बलून्स 'ठेवण्यात आले . कमीत कमी वेळात ते शोधून काढायचे होते . या प्रयोगामध्ये ' मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफटेक्नॉलॉजी ' ( एमआयटी ) विजेती ठरली . त्यांना त्यासाठी नऊ तास लागले .  विजेत्यांना वृत्तपत्रे , रेडिओ , टीव्ही या पारंपरिक संवादाच्या साधनांशिवाय , केवळ सोशल नेटवर्किंगसाइट्सच्या वापराने हे बलून लवकर शोधता आले असते ; पण तसे झाले नाही . विजेत्या स्पर्धकांकडे केवळसोशल नेटवर्क होते म्हणून ते जिंकले नाहीत , तर त्यांनी ते नेटवर्क परिणामकारकरित्या उपयोगात आणले .त्यांच्या नेटवर्कच्या परिणामकारक उपयोगामध्ये साइट्स फारशा कामी आल्या नाहीत . कामी आले , ते त्यांनीप्रत्यक्ष जोडलेले नेटवर्क आणि ते वापरण्याचे त्यांच्याकडे असलेले कसब . त्यामुळे काही ठराविक परिस्थितीमध्येचसोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर परिणामकारक ठरतो , असा निष्कर्ष अंतिमतः काढण्यात आला .  सोशल नेटवर्किंग साइट्समुळे नागरी उठावांना चालना मिळते , असा दावा करणाऱ्यांना या संशोधनाने चोखउत्तर दिले आहे . वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास साइट्सचा वापर प्रचारासाठी होऊ शकतो ; पण याप्रचाराचा परिणाम प्रत्यक्षात शंभर टक्के दिसेलच , असे मात्र नाही . 

Page 22 of 25 1 21 22 23 25
ADVERTISEMENT
error: Content is protected!