आयफोनचा व्यावसायिक कॅमेरा कसा तयार करायचा याची रेसिपी
बाहेर मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जायचं असो वा कामासाठी, पन्नास गोष्टी कुठे वागवत बसणार? तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय मग अनेक गोष्टी सहज शक्य...
बाहेर मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जायचं असो वा कामासाठी, पन्नास गोष्टी कुठे वागवत बसणार? तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय मग अनेक गोष्टी सहज शक्य...
बहुप्रतिक्षीत HTC कंपनीचा हायडेफिनेशन डिस्प्ले असलेला स्मार्टफोन बाजारात लॉंन्च झाला आहे. जपानमध्ये कंपनीने नवा HTC बटरफ्लाई J लॉंन्च केला आहे....
असूसने तैवानमध्ये नवा पॅडफोन लॉंन्च केला आहे. या डिव्हाईसचे नामकरण त्यांनी पॅडफोन- 2 असे ठेवले आहे. असूस ग्राहकांना क्वॉड कोअर...
फ्रॅंकफर्ट- कोरियन मोबाईल कंपनी 'सॅमसंग'ने नुकताच 'गॅलेक्सी एस 3 मिनी' लॉन्च केला. जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरातील बाजारात 11 ऑक्टोबरला 'गॅलेक्सी एस...
माटुंगा रेल्वे स्टेशन कुठे आहे ? असा प्रश्न मुंबईतील शेंबड्या पोराला जरी विचारला तरी तो त्याचे उत्तर देईल . मात्र जर कोणी तुम्हाला सांगितले की माटुंगा स्टेशन अरबी समुद्रात आहे तर तुम्ही मुर्खात काढाल . पण अॅपल कंपनीच्या आयफोन ५ मध्ये हा प्रकार घडला आहे . आयफोन ५ साठी अॅपल कंपनीने तयार केलेल्या अॅपल मॅप्सया अॅप्लीकेशनमध्ये माटुंगा स्टेशनची नोंद अरबी समुद्रात झाली आहे . मुंबईची शान असणारा वांद्रे वरळी सागरी सेतूया अॅपमध्ये अस्तित्वातच नाही . सर्वाधिक आधुनिक म्हणून ओळखल्या जाणा- या या अॅपल मॅप्समध्ये मुंबईतील अनेक रेल्वे स्टेशनची नोंद झालेली नाही . काही स्टेशन तर मूळ जागेपेक्षा खूप दूर असल्याचे दाखवण्यात आले आहे . अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्येही ( आयओएस सहा ) अनेक दोष आढळले आहेत . आयफोन ५ हा स्टिव्ह जॉब्ज यांच्या मृत्यूनंतर अॅपलने तयार केलेला पहिला स्मार्ट फोन आहे . या फोनच्या सॉफ्टवेअरसाठी जॉब्ज यांचे मार्गदर्शन मिळालेले नाही . त्याचा फटका आयफोन ५ ला बसल्याची शक्यता व्यक्तहोत आहे .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech