स्मार्टफोन्स

1 कोटी गॅलेक्सी मोबाइलची विक्री

1 कोटी गॅलेक्सी मोबाइलची विक्री

कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने भारतात आपल्या ‘गॅलेक्सी’ मालिकेतील स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या विक्रीत तब्बल एक कोटीचा आकडा पार केला आहे....

आठवी खिडकी विंडोज ८ ‘ मोबाइल नोकिया ल्युमिया

डेस्कटॉप , लॅपटॉपमध्ये लोकप्रिय ठरत असलेल्या ' विंडोज ८ ' ची मोबाइल आवृत्ती नोकियाने बाजारात आणली आहे. नोकिया ल्युमिया ९२० , नोकिया ल्युमिया ८२० आणि नोकिया ल्युमिया ६२०...

शानदार फीचर्ससह नोकिया ‘ल्युमिया 920’ झाला लॉन्च

शानदार फीचर्ससह नोकिया ‘ल्युमिया 920’ झाला लॉन्च

गॅजेटच्या दुनियेत नोकिया कंपनीने आणखी एक धमाका केला आहे. तो म्हणजे नोकियाने आज (गुरुवारी) स्मार्टफोन चाहत्यांसाठी लेटेस्ट विंडोज 8 टेक्नॉलॉजीवर...

असा वापरा अँड्रॉइड फोन

नॉन मार्केट अॅप ओपन करण्यासाठी  काही फोन वगळता बहुतांश अँड्रॉइड फोनमध्ये आपल्यालानॉन मार्केट अॅप ओपन करता येऊ शकतात . म्हणजे आपण थर्ड पार्टी अॅप्स डाऊनलोड करू शकतो . जसे की , अमेझॉन अॅप स्टोअर किंवा ऑनलाइन अॅप्समधून आपण आपल्याला पाहिजे ते अॅप्स डाऊनलोड करू शकतो . हे फीचर वापरण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन अॅप्लिकेशन सेटिंग्जमध्ये जा आणि ' अननोन सोर्स ' समोरील चौकनात टिक मार्क करा. हे केल्यावर तुम्हाला विविध अॅप स्टोअरमधील अॅप्स डाऊनलोड करता येणं शक्य होणार आहे .  अॅप बंद करा  अँड्रॉइड फोनमध्ये आपले अॅप्स सतत सुरू असतात .ज्यावेळेस आपण त्याचा वापर करत नसू त्यावेळी हे अॅप बंद केले तर आपली बॅटरी जास्तवेळ वापरता येऊ शकेल . हे अॅप्स बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा . त्यानंतर रनिंग सर्व्हिसेसमध्ये लिस्ट व्ह्यू करा . मग जे अॅप्स तुम्हाला नको असतील त्या अॅप्सच्या पुढे स्टॉप करून अॅप्लिकेशन बंद करा .  अॅनिमेटेड वॉलपेपर वापरू नका  अॅनिमेशन असलेले वॉलपेपर खूप छान दिसतात . ते एन्जॉयही करता येतात . मात्र , त्यामुळे आपल्या मोबाइलची बॅटरी खूप जास्त खर्च होते . अशावेळी तुम्ही अॅनिमेशनच्या वॉलपेपरचा वापर करू नका . हे वॉलपेपर्स बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये डिस्प्लेमध्ये जा आणि नंतर अॅनिमेशन्समध्ये जाऊन ऑल  अॅनिमेशन्सवर टिक करा .  स्पेशन कॅरॅक्टर म्हणजे बॅक स्लॅश , अॅट द रेट अशा किजचा क्विक अॅक्सेस पाहिजे असेल तर स्पेसबारवर टॅप करा आणि होल्ड करा . ते केल्यावर आपण नेहमी वापरत असलेल्या कॅरेक्टर्सचा बॉक्स पॉप अप करत राहतो .  गुगल वॉइस नंबर  कोणत्याही अँड्रॉइड फोनवर गुगल वॉइस वापरता येऊ शकतील . यामध्ये तुम्ही तुमचा डिफॉल्ट नंबर सेव्ह करूशकता . म्हणजे आपण त्या व्यक्तीचे नाव घेतले की फोन लागतो . यासाठी तुम्हाला वॉइस अॅप डाऊनलोड करावालागेल . हे अॅप तुमचा मोबाइल नंबर व्हेरीफाय करतो आणि मगच तुम्हाला ते अॅप वापरता येऊ शकते .  सर्व अॅप फोल्डरमध्ये ठेवा  तुमच्या होम स्क्रीनवर अनेकदा अॅप्सची गर्दी दिसते . हे टाळायचे असेल तर तुम्ही सर्व अॅप्स एका फोल्डरमध्ये सेव्हकरा . यासाठी तुमच्या मोबाइलच्या होमस्क्रीनवर टॅप करून होल्ड करा . यानंतर एक फोल्डर तयार करा आणिमग त्यात सर्व अॅप्स तुम्हाला ड्रॅग करता येऊ शकतील . 

स्मार्टफोन होणार ऑल इन वन

इंटरनेट , मोबाइल संवादाच्या क्षेत्रात प्रगती होण्याबरोबरच संबंधित क्षेत्रांमधील तांत्रिक बाबींमध्ये लक्षणीयरित्या बदल झाला . कम्प्युटर , इंटरनेट क्षेत्रात मिनिटामिनिटाला अपडेट्स येत असतात . मोबाइल , स्मार्टफोनमध्येही सतत नवी व्हर्जन्स येत असतात . त्यातील तंत्रज्ञान आणि इतर फिचर्स अपडेट होताना कॅमेरा मात्र तितकासा प्रगत नव्हता .आता ही कमतरता दूर होणार असल्याने स्मार्टफोनला ' ऑल इन वन ' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .  मोबाइल अथवा स्मार्टफोनमधील कॅमेरा ही कल्पना काही नवीन नाही . मात्र , या नव्या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यात फ्रेममधील कुठल्याही ऑब्जेक्टवर फोकस करता येणार आहे .त्यामुळे फोटोमधील एखादी ठराविक वस्तू स्पष्ट बघता येणारआहे . असा कॅमेरा येत्या काही वर्षांत तयार केला जाणार आहे.  या क्षेत्रातील नवनवे शोध पाहिले , की मल्टिपरपझ तंत्रज्ञान बनवण्याकडे कंपन्यांचा ट्रेंड आहे , असे जाणवते .त्यातल्या त्यात स्मार्टफोनसारख्या तंत्रज्ञानाचा विचार केला , तर या एका स्मार्टफोनमध्येच इंटरनेट , फोन करण्याची सुविधा , फोटो काढण्याची सुविधा तयार आहे . जेणेकरून डेस्कटॉप कम्प्युटर , लॅपटॉप आदी बाबींना 'चालता - बोलता ' पर्याय तयार होईल . आता नव्याने सांगितलेल्या या कॅमेऱ्याच्या पर्यायामुळे अत्याधुनिक कॅमेऱ्यांनाही कदाचित पर्याय तयार होईल .  तोशिबा कंपनी या कॅमेऱ्यावर काम करत आहे . या कॅमेऱ्यासाठी पाच लाख छोट्या लेन्सेसचा वापर कंपनी करणार आहे . हा कॅमेरा केवळ स्मार्टफोनसाठी नसेल , तर टॅब्लेटमध्येही वापरता येणार आहे . वेगवेगळ्या ' फोकल लेन्थ 'ने या लेन्सेस ' फिल्ड ऑफ व्ह्यू ' कॅप्चर करतील . यामुळे फोटोग्राफरना फोटोमध्ये नेमके कुठे फोकस करायचे , हे ठरवता येईल . एका किड्याच्या डोळ्याप्रमाणे या लेन्सची रचना तयार करण्यात आली आहे . ' कम्पाउंड लेन्स 'त्यामध्ये बसवण्यात आल्या आहेत . या वर्षाअखेरीला व्यावसायिक स्तरावर स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या उत्पादनाला सुरुवात होईल .  पाच वर्षांपूर्वी ' आयफोन ' च्या निर्मितीनंतर डिजिटल कॅमेऱ्यांच्या विक्रीत घट झाली होती . ' लिट्रो ' कंपनीकडून अशीच सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे . डिजिटल कॅमेऱ्याला तोडीस तोड सुविधा स्मार्टफोनमध्ये निघाल्यामुळे डिजिटल कॅमेऱ्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे . 

Page 75 of 81 1 74 75 76 81
ADVERTISEMENT
error: Content is protected!