स्मार्टफोन्स

सॅमसंग गॅलक्सी एस फोर : चार सेकंदांत १०० फोटो काढा!

अॅपलच्या 'आयफोन ५'ला टक्कर देण्यासाठी आणि जागतिक स्मार्टफोनची बाजारपेठ काबीज करण्यासाठी आघाडीच्या स्मार्टफोनमेकर 'सॅमसंग'ने गुरुवारी 'सॅमसंग गॅलक्सी एस फोर'हा नवा...

स्मार्ट युद्ध आयफोन सॅमसंग ब्लॅकबेरी नोकिया स्मार्टफोन

आयफोन आणि सॅमसंगच्या स्मार्टफोनमुळे ब्लॅकबेरी बिझनेस फोनच्या स्पर्धेतून कधी बाहेर पडला कोणालाकळलंही नाही . पण नुकत्याच लाँच झालेल्या ब्लॅकबेरीच्या ' झेड१० ' या फोनमुळे स्मार्टफोनचे मार्केट पुन्हाएकदा ढवळून निघणार आहे . या स्पर्धेत सध्या ब्लॅकबेरीसमारे सॅमसंगचा गॅलेक्सी एस ३ , नोकिया लुमिया ९२०आणि आयफोन ५ हे फोन्स आहेत . यात कोण बाजी मारेल हे येणारा काळच ठरवेल . या सर्व फोन्समध्ये कोणवरचढ आहे हे जाणून घेऊया ... ब्लॅकबेरी झेड १० ब्लॅकबेरी भारतीय बाजारात आला आणि फोनच्या वापरला नवा पैलू मिळाला . कुणाचा बिझनेस तर कुणाचंऑफिस फोनवर अवतरलं . कालांतराने स्मार्टफोन बाजारात आले आणि ब्लॅकबेरी जुनाट वाटू लागला . पणनुकतंच ' ब्लॅकबेरी १० ' ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम घेऊन बाजारात आलेल्या ' झेड १० ' या फोनने अनेकटेकसॅव्ही मंडळींचे लक्ष वेधून घेतलं आहे . आकर्षण : याचं पाहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्यात होमस्क्रीन , विजेट्स , अप लिस्ट आणि ई - मेल इनबॉक्स एकत्रकरण्यात आले आहे यामुळे युजर नॅविगेशन सोपं होणार आहे . लॉक स्क्रीन : तुमचा फोन लॉक असला तरीही अलार्म , न वाचलेले ई - मेल्स फोनच्या डाव्या बाजूला दिसताततसंच तुमच्या मिटींग्सही सतत दिसत राहतात . फोन लॉक असतानाच कॅमेरा वापरून पटकन एखादा फोटोहीकाढू शकता . अगदी अँड्रॉइडप्रमाणे अंगठा स्लाईड करून हा फोन अनलॉक करता येतो . होम स्क्रीन : मेन होम स्क्रीन मध्ये ' अॅक्टिव फ्रेम्स ' अर्थात अॅप्सची थोडक्यात माहिती दिसते तर त्यावर टॅपकरून ते अॅप्स सुरू करता येतात . या फ्रेममध्ये आपण सतत वापरात असलेले आठ अॅप्स आपोआप दिसतात .यामुळे सर्वात जास्त वापरात असलेले अॅप्स हाताशी राहतात . इंटरफेस : अॅपलिस्टमध्ये अॅप्स बघण्यासाठी तुम्हाला उजवीकडून डावीकडे स्वाईप करावं लागतं . यात एकापेजमध्ये १६ अॅप्स दिसतात . जर जास्त अॅप्स असतील तर आणखी पेजेस येत जातात . फेड इफेक्ट : एका पानावरून दुसऱ्या पानावर जाताना फेड इफेक्ट दिला आहे जो खूप मस्त आहे . यात जुन्यापानावरचे अॅप्स फेड होतात आणि नवीन पानावरचे अॅप्स दिसतात . नोटिफिकेशन : इतर स्मार्टफोनपेक्षा या फोनमधील नोटिफिकेशनची सिस्टीम वेगळी आहे . यात तुम्हालाखालच्या बाजूने वर स्वाइप करावे लागते . याचा फायदा म्हणजे नोटिफिकेशन चेक करत असताना एखादं अॅपसुरू असेल तर ते अॅप मिनिमाईज होऊन जातं . डाव्या बाजूला नवीन इ - मेल्स , बीबीएम , एसएमएस आणिसोशल मिडिया मेसेजेस दिसत राहतात . उजव्या बाजूला स्क्रोल केलंत तर तुम्हाला या सगळ्याचा प्रिव्ह्यू दिसतो. ब्लॅकबेरी हब ःनावाप्रमाणेच या हबमध्ये तुम्ही तुमचे अनेक ई - मेल अकाऊंट्स , बीबीएम , एसएमएस , सोशलमीडिया मेसेजेस , कॉल हिस्ट्री तसंच व्हॉटअप्स , फेसबुक , ट्विटर सारखे थर्डपार्टी अॅप्स एकत्र आणू शकता . पर्सनल आणि वर्क मोड : ब्लॅकबेरी झेड १०मध्ये पर्सनल आणि वर्क असे दोन मोड आहेत . यातील पर्सनलमोडमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या फाइल्स , ई - मेल्स सेव्ह करून ठेऊ शकता . या मोडमधील फाइल्स एनस्क्रिप्टेडहोतात पण यात लॉकिंग सिस्टीम नसते . वर्क मोडमध्ये काम करत असताना तुमच्या कंपनीच्या नियमांनुसारत्याला बंधनं येतात . या दोन्हीचा वापर जर फोन कंपनीने दिला असेल तरच होतो . अॅप्स वर्ल्ड : ब्लॅकबेरी १० मध्ये आपल्याला नवीन अॅप्सवर्ल्ड पाहता येणार आहे . यात अॅप्स बरोबरच म्युझिक ,व्हिडिओही खरेदी करता येऊ शकणार आहे . कॅमेरा : ब्लॅकबेरी १० चा कॅमेरा हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य . यामध्ये टाइम शिफ्ट नावाचं एक फीचर देण्यातआले आहे . ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचा फोटो अगदी बिनचूक येऊ शकेल . याच्या कॅमेरामध्ये मोठ्या प्रमाणावरइनोवेशन्स करण्यात आले असून त्याला खूप अतिरिक्त फिचर्स देण्यात आले आहेत . यामुळे फोटोग्राफीचा एक छानअनुभव आपल्याला घेता येणार आहे . ब्राऊजर : ब्लॅकबेरी१०मध्ये ब्राऊजरही बदलण्यात आला असून याचा अॅड्रेस बार विंडोजच्या फोनप्रमाणे खालच्याबाजूस असणार आहे . याशिवाय यामध्ये एचटीएमल ५ असणार आहे . बॅटरी लाइफ : मोठी टच स्क्रीन आणि अॅक्टिव्ह फ्रेम्स असल्या तरी याची बॅटरी लाइफ इतर स्मार्टफोनपेक्षा चांगलीअसल्याचा दावा रिसर्च इन मोशन या कंपनीने केलाय . यामध्ये फिक्स टाइम बॅटरीचे अनोखे फिचर देण्यात आलेआहे . इतर फिचर्स प्रोसेसर - ड्युएल कोर , १ . ५ गीगाहार्टज मेमरी - १६ जीबी इंटरनल मेमरी , ६४ जीबीपर्यंत एक्स्पाण्डेबल कॅमेरा - आठ मेगापिक्सेल , फ्रंट कॅमेरा दोन मेगापिक्सेल रेडीओ - नाही . रॅम - दोन जीबी . सिमकार्ड सपोर्ट - फक्त मायक्रो सिम किंमत - ४३ , ४९० सॅमसंग गॅलेक्सी एस ३ स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये ४५ टक्के शेअर्स असलेल्या कंपनीचे फोन अँड्रॉइड या अफलातून ऑपरेटिंगसिस्टीमबरोबरच कॅमेऱ्याच्या वैशिष्ट्यांमुळेही चर्चेत आहेत . त्यापैकीच गॅलेक्सी एस - ३ हा ब्लॅकबेरी झेड - १०च्या स्पर्धेत उतरणारा हा स्मार्टफोन आहे . कॅमेरा : या फोनमधला कॅमेरा ही याची खासियत . ८ मेगापिक्सेल ताकदीचा कॅमेरा त्याच्या बॅक साइडइल्युमिनिटेड या नव्या फीचरमुळे चांगलाच लोकप्रिय आहे . या फीचरमध्ये फोटो काढताना अधिक प्रकाश पडतोआणि त्यामुळेच तो चांगला येतो . याशिवाय ' बर्स्ट ' नावाचं एक झकास फीचरही या कॅमेऱ्यामध्ये आहे . हे फीचरतुम्हाला एका विशिष्ट क्षणाचे २० फोटो काढून त्यातील आपल्या आवडीचा फोटो निवडण्याचा पर्याय देतो .त्यापैकी हवे तितके फोटो ठेऊन बाकीचे डीलिट करता येऊ शकतात . याशिवाय टच फोकस , स्माइल डिटेक्शन ,जीओ - टॅगिंग , इमेज एडिटर हे फीचर्सही सोबतीला आहेतच . ओएस : अँन्ड्रॉइड ४ . ० ( आइस्क्रीम सँडविच ) डिसप्ले : ७२० x १२८० पिक्सेल ४ . ८ इंच सुपर एमोएलइडी डिसप्ले विथ कॅपेसेटिव्ह टच स्क्रीन , गोरिलाग्लास इंटर्नल मेमरी : १६ / ३२ / ६४ जीबी एक्सपांडेबल मेमरी : ६४ जीबी रॅम : १ जीबी कॅमेरा : ८ मेगापिक्सेल विथ ऑटोफोकस आणि एलइडी फ्लॅश , फ्रंट कॅमेरा १ . ९ मेगापिक्सेल . फ्रंट कॅमेरा : १ . ९ मेगापिक्सेल प्रोसेसर : १ . ५ गिगाहाटर्झ कोरटॅक्स ए ९ कोड कोर प्रोसेसर चिप : एक्सीनोस जी . पी . यू . : मेल ४०० रेडिओ : आहे . वैशिष्ट्यं स्मार्ट स्टे : जोपर्यंत तुम्ही स्क्रीनकडे बघत असाल तोपर्यंत डिसप्ले लाइट बंद होणार नाही . डायरेक्ट कॉल : तुम्ही एखाद्याला मेसेज करत असाल आणि तुम्हाला त्याला कॉल करायचा असेल तर फक्त फोनकानाला लावला की आपोआप त्या व्यक्तीला कॉल लागेल . इतर फीचर्स एस बीम , एस वॉइस , अॅक्टिव्ह नॉइझ कॅन्सलेशन विथ डेडिकेटेड माइक , ड्रॉपबॉक्स , इमेज / व्हिडियो एडिटर ,डॉक्युमेंट एडिटर , टी . व्ही . आऊटपुट , एस एन एस इंटीग्रेशन , अॅडॉब फ्लॅश ११ सपोर्टेबल काही तोटे या फोनमध्ये फक्त मायक्रो सिम कार्ड सपोर्टेबल आहे . विशिष्ट ' कॅमेरा की ' नाही . किंमत - ३४ , ९०० नोकिया लुमिया ९२० एकेकाळी मोबाइल मार्केटमध्ये राज्य गाजवणारी नोकिया . ही कंपनी स्मार्टफोनच्या मार्केटमधून बाहेर पडली .यावेळी सॅमसंग , आयफोन यांच्या तोडीस तोड बनून मार्केटमध्ये येण्यासाठी नोकियाने मायक्रोसॉफ्टच्याविंडोजशी भागीदारी करून लुमिया सीरिज लाँच केली . विंडोज ८ ही ऑपरेटिंग सिस्टिम फोनमध्ये लाँच केली .वायरलेस चार्जिंग ही या फोनची मोठी खासियत आहे . या फोनचं सर्वात मोठ वैशिष्ट्यं म्हणजे सर्वात लेटेस्टटेक्नोलॉजीची विंडोज ८ ऑपरेटिंग सिस्टीम आहे . भारतीय मोबाइल बाजारात विंडोज फोन्सशी संख्या हाताच्याबोटावर मोजण्याइतकी आहे . या फोनची बॉडी अॅल्युमिनिअम बेस्ड आहे . त्यामुळे हा दिसायला फारच क्लासीआणि आकर्षक दिसतो . याचं वजन १८५ ग्रॅम आहे . यावरून हा फोन किती हलका आहे ह्याचा अंदाज येईल . याफोनसाठी ' गोरील्ला ग्लास २ ' चा वापर करण्यात आला आहे . त्यामुळे हा फोन हातातून सटकून पडला तरीघाबरण्याची गरज नाही . स्क्रीन साइज : ४ . ५ इंच ( १२८० x ७६८ ) प्युअर मोशन एचडी + डिस्प्ले ऑपरेटिंग सिस्टिम : विंडोज फोन ८ प्रोसेसर : ड्यूअल कोर १ . ५ जीएचझेड स्नॅपड्रॅगन एस ४ प्रोसेसर रॅम : १ जीबी रॅम कॅमेरा : ८ . ७ मेगापिक्सल प्युअर व्ह्यू रेअर कॅमेरा , १ . २ मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा मेमरी : ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज चार्जिंग : वायरलेस चार्जिंग कनेक्टिविटी : वायफाय , ब्लू टूथ , मायक्रो युएसबी बॅटरी : २ , ००० एएच बॅटरी किंमत : ३८ , १९९ आयफोन ५ मोबाइलप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते तो , ' अॅपल ' चा ' आयफोन ५ ' शुक्रवारी देशभरातीलनिवडक आउलेट्समध्ये दाखल झाला . आयफोन म्हणजे ब्रॅण्डबाबत कोणालाही शंका घेण्याचे कारणच नाही .फोनचे फीचर्स आणि त्यांचा वापर याही गोष्टी खूप चांगला अनुभव देऊन जातात . ' सॅमसंग गॅलॅक्सी एस - ३ ' 'ब्लॅकबेरी झेड १० ' आणि काही प्रमाणात नोकिया लुमिया या तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी ' आयफोन ५ ' ची कडवीटक्कर आहे . ' आयफोन५ ' ची वैशिष्ट्ये : स्क्रीन : चार इंचाची स्क्रीन , १३६ बाय ६४० पिक्सेलचे स्क्रीन रिझोल्युशन डिस्प्ले : रेटिना डिस्प्ले प्रोसेसर : ड्युअल कोअर ए ६ चिप कॅमेरा : १ . २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा मेमरी : इंटरनल १६ जीबी ते ६४ जीबीपर्यंत . ( याला एक्स्पाण्डेबल मेमरी नसते . कारण यात कार्ड स्लॉटउपलब्ध नाही .) डिस्प्ले : एलईडी बॅकलाइट कपॅसेटिव्ह टचस्क्रीन ऑपरेटिंग सिस्टिम : आयओएस ६ यामध्ये तुम्ही आयओएस ६ . १पर्यंत अपग्रेड करू शकता . ब्राऊजर : एचटीएमएल सफारी ब्राऊजर प्रोसेसर : ड्युअल कोर १ . २ गीगाहार्टज सिमकार्ड : मायक्रो सिमकार्ड रेडिओ : नाही . किंमत : ३२ आणि ६४ जीबी फोनची किंमत अनुक्रमे ५२ , ५०० आणि ५९ , ५०० असणार आहे .  एक्सपिरीया झेड' मोबाईलमधील सॉफ्टवेअरपासून बॉडी पार्टपर्यंत सर्व फिचरमध्ये आधुनिक टेक्नोलॉजी  http://marathitech.blogspot.com/2013/03/xperia-sony-tablet-z-launched.html

बार्सोलिनात मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्‍ये जगातील सर्वात वेगवान मोबाइल बाजारात!

हवावेच्या जगातील सर्वात वेगवान मोबाइलच्या सादरीकरणाने बार्सोलिना येथील मोबाइल वर्ल्ड काँग्रेसला प्रारंभ झाला. या वार्षिक प्रदर्शनामध्ये जगभरातील 1500 कंपन्या सहभागी...

भारतात लॉंच झाला ब्‍लॅकबेरी Z10 स्‍मार्टफोन, नोकियाचे चार नवे हॅन्डसेट

ब्‍लॅकबेरीने अतिशय महत्त्वाकांक्षी स्‍मार्टफोन BB Z10 भारतात लॉंच केला आहे. पूर्णपणे टचस्‍क्रीन यंत्रणेवर आधारीत असलेला हा फोन अमेरिकेपूर्वी भारतात लॉंच...

Page 73 of 81 1 72 73 74 81
ADVERTISEMENT
error: Content is protected!