स्मार्टफोन्स

मोबाइल चाळिशीत

खिशात , पर्समध्ये सहज सामाविणारा आणि हातातउठून दिसणा-या सर्वव्यापी मोबाइलने बुधवारी चाळीशीतपदार्पण केले . आज घराघरात पोहोचलेल्या या दिमाखदारउपकरणाची ३ एप्रिल १९७३ रोजी मार्टीन कूपर या 'मोटोरोला ' कंपनीतील वरिष्ठ इंजिनीअरने निर्मिती केलीआणि लँडलाइनला नवा आणि अत्याधुनिक पर्याय दिला . गेल्या चाळीस वर्षांमध्ये मोबाइलने तंत्रज्ञान आणि दूरसंचारक्षेत्रात ' न भूतो न भविष्यति ' क्रांती घडवून आणली .जीनिव्हास्थित ' इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन 'च्या अहवालानुसार आजपावेतो जगभर ६ अब्जांपेक्षा अधिकमोबाइल आहेत . आजच्या घडीला जगाची लोकसंख्या ७अब्जांवर येऊन पोचली आहे . जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात मोबाइलच्या वाढीचे प्रमाण कितीतरी अधिकआहे . चाळीस वर्षांपूर्वी बाजारपेठेत आलेल्या या उपरणाची अनेकांनी हुर्यो उडविली होती . मात्र , उण्यापुऱ्या चारदशकांच्या कालखंडात या उपकरणाने सर्व विरोधकांची दाणादाण उडवित नाक मुरडणाऱ्यांच्या खिशातच नव्हेतर , मनातही जागा पटकाविली . पूर्वी केवळ हौस आणि चैनीसाठीच मोबाइल मिरविण्याचा ट्रेंड होता . आतामात्र , मोबाइल ही चैन नसून गरजेची वस्तू बनली आहे . मोबाइलचा जन्मदाता मार्टीन कूपर ( वय ८५ ) यांना मोबाइलचे जन्मदाता म्हणून ओळखले जाते . १९७३मध्ये मोबाइलची संकल्पनाकूपर यांनी विकसित करून तिचे प्रारूप सादर केले असले , तरी प्रत्यक्षात तो बाजारपेठेत येण्यासाठी दहा वर्षांचाकालावधी लागला . १९८३ मध्ये आलेल्या DynaTAX 8000X या हँडसेटची किंमत होती ३५०० डॉलर .. त्यावेळी असलेली किंमत पाहता हे उपकरण जनमानसांत लोकप्रिय होईल , अशी सुतराम शक्यताही वाटत नव्हती . 'मोबाइलची निर्मिती झाली त्यावेळी त्याचा आकार आणि वजन खूपच होते . पण आता मुठीत सामावणारेमोबाइलही बाजारात आले आहेत . ते पाहून डोळे भरून येतात ,' अशी भावपूर्ण प्रतिक्रियाही कूपर व्यक्त करतात .१९६०मध्ये ' एटी अँड टी ' ने कार टेलिफोनची निर्मिती केली . तो पाहून आपल्याला मोबाइलची कल्पना सुचली, असेही कूपर म्हणाले . सध्या जगभर ६ अब्जांहून अधिक मोबाइल फोनची विक्री झालेली असली , तरी त्यात सर्वाधिक वाटा अँड्रॉइडफोनचा आहे . ऑपरेटिंग सिस्टीम - बाजारहिस्सा ( टक्के ) अँड्रॉइड - ७२ . ४ आयओए - १३ . ९ ब्लॅकबेरी - ५ . ३ बाडा - ३ . ० सिंबियन - २ . ६ विंडोज - २ . ४ अन्य - ० . ४ ( स्रोत : गार्टनर ) 

चेहर्‍याकडे पाहून नाडी परीक्षा करणारा स्मार्टफोन

चेहर्‍याकडे पाहून नाडी परीक्षा करणारा स्मार्टफोन

तुमच्या चेहर्‍यावरील भाव पाहून नाडीचे ठोके ओळखणारा स्मार्टफोन, Tablet  विकसित करण्यात तंत्रज्ञांना यश आले आहे. जपानच्या तंत्रज्ञांनी या शोधाचा दावा...

खुशखबर ! सॅमसंग Galaxy S3, Grand Duos आणि S Duos झाले स्‍वस्‍त

खुशखबर ! सॅमसंग Galaxy S3, Grand Duos आणि S Duos झाले स्‍वस्‍त

भारतीय मोबाईल बाजारातील कंपन्‍यांच्‍या 'प्राईस वॉर'मध्‍ये सॅमसंगनेही उडी घेतली आहे. गॅलेक्‍सीचे नवे व्‍हर्जन लॉंच केल्‍यानंतर आता सॅमसंगने आपल्‍या दुस-या मॉडेलच्‍या...

नोकियाने भारतात लाँच केला सर्वात स्वस्त विंडोज स्मार्टफोन

नोकियाने भारतात लाँच केला सर्वात स्वस्त विंडोज स्मार्टफोन

मोबाईल बाजारातील प्रसिद्ध ब्रँड नोकियाने भारतात गुरुवारी दोन मोबाईल लाँच केले. त्यातील एक विंडोज 8 स्मार्टफोन असून त्यांची किंमत १०,५००...

Page 72 of 81 1 71 72 73 81
ADVERTISEMENT
error: Content is protected!