भारतातील हॅकिंग घटले

जगभरात सायबर हल्ल्यांची भीती व्यक्त होत असतानाभारतात मात्र हॅकिंगचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनासआले आहे . जगभरात हॅकिंगचे प्रमाण चीनमध्ये सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहेत . हॅकिंगच्या बाबतीत 'टॉप टेन ' देशांच्या यादीत भारत आठव्या स्थानावर आहे . ' अकामयी टेक्नॉलॉजीस ' या कंपनीने हॅकिंगच्या प्रमाणाबाबत केलेल्या सर्वेक्षणात विविध देशांची धक्कादायकमाहिती समोर आली आहे . जगभरातील एकूण हॅकिंग पैकी ४१ टक्के हॅकिंग हे चीनमध्ये होत असल्याचे निदर्शनासआले आहे . सन २०१२च्या शेवटच्या तिमाहीत झालेल्या हॅकिंगवरून ही आकडेवारी काढण्यात आली असून ,याची कारणमीमांसाही करण्यात आली आहे . चीनमध्ये हॅकर्सचे सर्वात मोठे नेटवर्क असल्याचे सर्वेक्षणात आढळलेआहे . यात काम करणारे काही लोक चीनच्या सैन्यातील असल्याचेही समोर आले आहे . चीन खालोखालअमेरिकेचा नंबर येतो . अमेरिकेत हॅकिंगचे प्रमाण १० टक्के असून , हे प्रमाण आधीच्या तिमाहीपेक्षा तीनटक्क्यांनी कमी झाले आहे . अमेरिकेत सर्वाधिक अनॉनिमस आणि विध्वंसक कारवाया करणारे अॅण्टिसेक लोकअसून , तेथे सायबर हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे . तिसऱ्या क्रमांकावर तुर्कस्तानहा देश आहे . या देशात हॅकिंगचे प्रमाण ४ . ७ टक्के इतके आहे . मागील तुलनेत या देशातील हॅकिंगचे प्रमाणमोठ्या प्रमाणावर वाढले आहे .  रशियाचा क्रमांक चौथा असून , या देशातील हॅकिंगचे प्रमाण ४ . ३ टक्के इतके आहे . तैवान हा देश चीनी हॅकर्सचा नेहमीचाच टार्गेट राहीला आहे . मात्र , या देशाने उभी केलेली सायबर सुरक्षा यंत्रणा चीनी हल्लेखोरांना पुरून उरली आहे . देशातील हॅकिंगचे प्रमाण १२ . ७ टक्क्यांवरून ३ . ७ टक्क्यांवर आले आहे . त्याखालोखाल ब्राझील , रोमानिया या देशांचा नंबर येतो . या खालोखाल आठव्या स्थानी भारताचा क्रमांक येतो . भारतातील हॅकिंगचे प्रमाण हे २ . ३ टक्के इतके आहे . यापूर्वी हे प्रमाण २ . ५ टक्के इतके होते , तर मागील वर्षी ते तीन टक्के इतके होते . देशातील सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी करण्यात आली असून ,एथिकल हॅकर्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आले आहे . या खालोखाल इटली नवव्या स्थानावर तर हंगेरी दहाव्या स्थानावर आहे . जगातील सर्वात मोठा धोका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायबर क्राइमकडे जगातील सर्व देशांनी विशेष लक्ष पुरविले आहे . यामुळे हल्लेखोरांना हल्ले करणे कठीण होत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे . भारताच्या बाबतीत सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात प्रगत देश म्हणून असे संबोधण्यात आले आहे .

सुरक्षितता तुमच्या अकाऊंटची Secure email or facebook accounts

अनेकवेळा ऑफिसात, सायबर कॅफेमध्ये गेल्यावर जीमेल, फेसबुकवर लॉगइन केले जाते पण लॉग आऊट करण्याचा विसर पडतो. अशावेळी कुणीतरी त्याचा गैरवापर...

सुरक्षा ‘अॅप’ल्याच हाती…महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी

तरुणींवर होणाऱ्या अत्याचारांच्या विविध घटनांच्या बातम्या सातत्याने येत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी घेतली जाऊ लागली आहे. समाजातील...

धोका ‘फेक मेसेजिंग अॅप्स’चा

मोबाइल व ई - मेल हे संवादाचे उत्तम माध्यम बनले असले ,तरी त्यातही आपणच आपल्याला कुणाच्याही नावे बनावटमेसेजेस करण्याची नवी अॅप्स बाजारात आली आहेत .संशयाने पोखरलेले कौटुंबिक नातेसंबंध किंवा व्यावसायिकअसूया यांच्यात मोबाइल - ईमेलवरील अशा माध्यमांचावापर वाढला असल्याने फेक मेसेजेसच्या अॅप्लिकेशनची त्यातनवी भर पडेल , अशी भीती तज्ज्ञांना वाटते . आपणच स्वतःला तिऱ्हाईतांच्या नावे ई - मेल करायचे आणित्यांचा भांडणतंटे किंवा व्यावसायिक काटाकाटीत पुरावाम्हणून वापर करायचा , असे प्रकार काही प्रकरणात उघडझाले आहेत . अशा प्रकारांमध्ये इंटरनेटवरील प्रॉक्सीसर्व्हरचा वापर केला जातो . हे सर्व्हर नायजेरिया , इंग्लंडआदी देशांमध्ये असल्याने भारतातील सायबर पोलिसांनागुन्हेगारापर्यंत पोहोचणे अशक्य बनते . आश्चर्य म्हणजे ,प्रत्यक्षात हा गुन्हेगार भारतातूनच फेक संदेशांचे व्यवहारकरीत असतो . काही पेड किंवा अनपेड वेबसाइट्सवरूनहीस्वतःच स्वतःला तिऱ्हाईत व्यक्तींच्या नावे ई - मेल करण्याचीसुविधा उपलब्ध होते . त्याचाही गैरवापर होत असतो , असेगुप्तवार्ता अधिकाऱ्यांना तपासात आढळले आहे . काहीदिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने तपास केलेल्या एका प्रकरणात एक बडी खासगी बँक बंदहोत असल्याच्या अफवा फेक संदेशाद्वारे पसरविण्यात आल्या होत्या . ठेवीदार खात्यातील पैसे काढू लागल्यावरत्यावर प्रकाश पडला होता . या माध्यमांमध्ये स्मार्टफोनसाठी उपलब्ध झालेल्या फेक मेसेजेस या अॅपची भर पडली आहे . यात इनकमिंग आणिआऊटगोइंग असे दोन्ही मेसेजेस कुणाच्याही नावे बनावट स्वरुपात तयार करण्याची सोय आहे . केवळ हे मेसेजेसतिऱ्हाइत व्यक्तीपर्यंत पाठविले जात नाहीत , इतकेच . केवळ मेसेजेस नव्हे तर कॉलच्या वेळा , आदी तपशीलांचेबनावट रेकॉर्ड तयार करण्याचे तंत्रही या अॅपमध्ये असते . अलीकडे पती - पत्नींमधील बिघडलेले संबंध आणि संशयाचे गढूळ वातावरण यांच्यात मोबाइलवरील मेसेजेसचावेगवेगळे दावे - प्रतिदावे करण्यासाठी उपयोग केला जातो . हे प्रमाण आता वाढल्याचे सायबर डिटेक्टिव्ह तज्ज्ञसांगतात . त्याचप्रमाणे दोन व्यवसाय भागीदारांमध्येही मोबाइल संभाषणांचा , कॉल रेकॉर्ड्सचा वापर केला जातो. एकमेकांमधले फेक मेसेजेस क्लायंटना दाखविल्यास त्यांचा त्यावर विश्वास बसू शकतो . पोलिस किंवा कोर्टाकडून या प्रकरणांच्या चौकशीचे आदेश आल्यास मोबाइल कंपन्यांमार्फत कॉलरेकॉर्ड्सचीखातरजमा होऊ शकते . पण प्रकरणे पोलिसांपर्यंत जाण्यापूर्वीच मेसेजेस , कॉल्सचे लॉग यांच्यावरून बिघडलेल्यानातेसंबंधांना तणावाचे नवे कारण मिळालेले असते . फेक मेसेजेस हे अशा प्रकारे दिशाभूल करू शकतात . त्यांचागैरवापर होऊ शकतो किंवा त्यातून नाहक गोंधळही उडू शकतो .

मालवेअर रोखणारं ‘इंटरनेट एक्स्प्लोलर ९’ : मॉझिला , क्रोम , सफारी या ब्राऊजर्सना पुन्हा मागे टाकले : मालवेअर , फ्रॉड्स  कळतात तातडीने

मालवेअर रोखणारं ‘इंटरनेट एक्स्प्लोलर ९’ : मॉझिला , क्रोम , सफारी या ब्राऊजर्सना पुन्हा मागे टाकले : मालवेअर , फ्रॉड्स कळतात तातडीने

मायक्रासॉफ्टचं कोणतंही उत्पादन कम्प्युटर बाजारात चाललंनाही असं नाही . मग याला ' इंटरनेट एक्स्प्लोलर ९ ' ('आयई९ ') अपवाद कसं ठरणार . एक्स्प्लोरर लाँच झाल्यानंतर अल्पावधीतच गेल्या काही महिन्यांमध्ये मार्केटमध्येआपलं स्थान प्रस्थापित केलेल्या मॉझिला , क्रोम  , सफारी या ब्राऊजर्सना पुन्हा मागे टाकले आहे . एनएसएसनेलॅबने केलेल्या पाहणीत ही बाब प्रकर्षाने जाणवली आहे . ' इंटरनेट एक्स्प्लोलर ९ ' मध्ये वेबसाइट ओपन केली की, त्यातील मालवेअर , फ्रॉड्स तातडीने कळतात . यामुळे या ब्राऊजरला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं निरीक्षणयात नोंदविण्यात आलं आहे .  एनएसएसने गेले ७५ दिवस विविध ब्राऊजर्सवर ओपन झालेल्या वेबसाइट्स आणि त्यांनी रोखलेले मालवेअर यांचेसर्वेक्षण केले . यामध्ये ' आयई९ ' वर ओपन झालेल्या एकूण साइट्सपैकी सुमारे ९५ टक्के मालवेअर रोखण्यात त्यांना यश आले आहे . फायफॉक्स आणि सफारी हे ब्राऊजर्स मालवेअर रोखण्याच्या स्पर्धेत कुठेच नसल्याचे दिसूनआले आहे . या दोन्ही ब्राऊजर्सनी केवळ सहा टक्केच मालवेअर रोखले आहेत . क्रोमने यामध्ये समाधानकारककामगिरी केली असून या ब्राऊजरला ७४ टक्के मालवेअर रोखण्यात यश आले आहे . यासाठी एनएसएसने प्रत्येकब्राऊजर्सच्या सुमारे साडे सात लाख वेब पेजेस टेस्ट केले आहेत . ब्राऊजर सिक्युरिटी हे आपल्याला पूर्णतः सुरक्षादेत नाहीत . त्याचा वापर केवळ प्राथमिक सुरक्षा म्हणून केला जाऊ शकतो , असे एनएसएसने आपल्यानिरीक्षाणात नमूद केले आहे . ब्राऊजर्सची ही सुरक्षा क्लाऊड तंत्राज्ञानावर अवलंबून आहे . ज्या कंपनीची क्लाऊडटेक्नॉलॉजी चांगल्या दर्जाची आहे त्यांना ही मालवेअर सुरक्षा पुरविणंच शक्य होणार आहे . आपण जेव्हा एखादीवेबसाइट ओपन करतो तेव्हा ती साइट ' बॅड ' म्हणून दर्शविण्यात आली तर ती ओपन होण्याआधी युजर वॉर्निंगदेण्यात येते . तरीही युजरला ती साइट ओपन करायची असेल तर तो पर्यायही खुला राहतो . अशाच अनेकप्रकरांमधून अॅण्टीव्हारसचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षणही सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे . ' आयई९ 'आणि क्राममध्ये मालवेअर असलेले वेबपेज ओपन होते मात्र त्या पेजेसवरून डाऊनलोडिंग करता येत नाही .बहुतांश मालवेअर हे अॅडच्या माध्यमातून पसविले जातात , असे निरीक्षण एनएसएसने या सर्वेक्षणात नोंदविलेआहे . यामध्ये गुन्हेगारांना पे - पर - क्लिकनुसार पैसे मिळत असतात . क्लिक फ्रॉड रोखण्याचे काम सर्वाधिकचांगल्याप्रकारे ' आयई९ ' ने केलेले आहे . त्याचेप्रमाण ९६ . ६ टक्के इतके आहे . त्याखालोखाल क्रोम १ . ६ टक्के ,फायरफॉक्स ० . ८ टक्के आणि सफारी ० . ७ टक्के असे मालवेअर रोखण्याचे ब्राऊजर्सचे प्रमाण आहे .

Page 7 of 7 1 6 7
ADVERTISEMENT
error: Content is protected!