जीमेल झाला ‘हॅकप्रूफ’
एडवर्ड स्नोडेनने उघड केलेल्या अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीच्या (एनएसए) प्रतापांनंतर जगभरात इंटरनेटच्या खासगीकरणासंदर्भातील जागरुकता वाढली आहे. रशियाने तर थेट टाइपरायटरचा वापर सुरू...
एडवर्ड स्नोडेनने उघड केलेल्या अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीच्या (एनएसए) प्रतापांनंतर जगभरात इंटरनेटच्या खासगीकरणासंदर्भातील जागरुकता वाढली आहे. रशियाने तर थेट टाइपरायटरचा वापर सुरू...
एका 'क्लिक'द्वारे सर्व व्यवहार करणे आता शक्य असले, तरीही ऑनलाइन पेमेंट करताना विशिष्ट गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. ऑनलाइन पेमेंट...
सोशल मीडियामध्ये अग्रणी असलेल्या फेसबुकने गेल्या दोन वर्षांत साइटवरील ' बग ' दाखविणाऱ्यांना एक लाख डॉलरची बक्षिसे दिली आहेत. सर्वाधिक बक्षिसे मिळवणाऱ्यांच्या यादीत भारत...
कुठलीही गोष्ट मोफत मिळत असेल , तर सर्वांचा पहिला ओढा त्याकडे असतो . पण या मोफत गोष्टींसाठी आपल्याला केवढी मोठी किंमत मोजायला लागते हे बहुतांश लोकांच्या लक्षात येत नाही . गुगल , याहू मोफत इमेल सेवा पुरवतात .पण त्याबदल्यात ते यूजर्सवर जाहिरातींचा मारा करतात .आता तर या कंपन्यांनी यूजर्सचे मेल , सर्फिंग केलेल्या साइट्सच्या आधारे त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन जाहिराती देणे सुरू केले आहे . अशाच पद्धतीने फ्री अॅप्सही यूजर्सकडून काही छुपी किंमत वसूल करत आहेत . अॅप्स तयार करणाऱ्या प्रत्येक कंपनीला मोफत अॅप पुरविणे शक्य नसते. काही कंपन्या यूजर बेस वाढविण्यासाठी , अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी मोफत अॅप पुरवतात. छोट्या कंपन्यांना मात्र त्यातून उत्पन्न मिळणे गरजेचे असते . या कंपन्या त्यासाठी जाहिरातींची मदत घेतात . या जाहिराती सुरुवातीला त्रासदायक वाटत नसल्यातरी त्या तुमच्या इंटरनेटचे पॅकेज घटवत असतात. यामाध्यमातून तुमच्यावर मालवेअरचा हल्ला होऊ शकतो . गुगल प्लेवरील ७४ टक्के अॅप्सच्या माध्यमातून मालवेअरचा हल्ला होतो , असे मकॅफीचा अहवाल सांगतो . मालवेअरच्या हल्ल्याचा धोका बहुतांश अॅप्स इन्स्टॉल करताना अनेक परमिशन्स विचारल्या जातात . कोणत्या परमिशन्स विचारल्या जात आहेत याकडे न पाहता आपण डोळे मिटून ओके करतो . त्यात अनेकवेळा पर्सनल माहिती , कॉल रेकॉर्ड , डिव्हाइसमधील डेटा अॅक्सेस करण्याची परवानगी विचारली जाते . अगदी गेम किंवा बातम्यांचे अॅप्सही तुमच्याकडे पर्सनल इन्फॉर्मेशन अॅक्सेस करण्याची परवानगी विचारतात . यामुळे संबंधित अॅप तयार करणाऱ्या कंपन्या हा डेटा जाहिरातदारांना पुरवतात . मग तुमच्या आवडीनिवडींचा विचार करून तुमच्या मोबाइलवर जाहिराती पाठविल्या जातात किंवा तुमच्या मोबाइलवर विविध ऑफर्स , लॉटरीचे एसएमएस पाठवले जातात . त्यानंतर तुमच्या नावे तुमच्या फ्रेंडलिस्टमधल्यांना किंवा कॉन्टक्टलिस्टमध्ये असलेल्या व्यक्तींना काही चुकीचे मेल , मेसेज पाठविले जातात . यासाठी काहीवेळा तुमच्या मोबाइलमधील बॅलन्सचाही उपयोग केला जाऊ शकतो . ' गुगल प्ले ' चा वापर सुरक्षित त्यातल्या त्यात सुरक्षेची बाब म्हणजे , गुगल प्लेसारख्या प्लॅटफॉर्मवरून मिळणारे अॅप तुलनेने सुरक्षित असतात .कारण या कंपन्यांकडून अॅप्स उपलब्ध करून देण्याआधी काही सुरक्षा चाचण्या केल्या जातात . या चाचण्यांवर ते पात्र ठरले नाहीत , तर गुगल ते नाकारते . मग हे अॅप्स इतर वेबसाइटवर उपलब्ध होतात . त्यामुळे अनेक अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये गुगल प्ले व्यतिरिक्त इतर प्लॅटफॉर्मवरून अॅप्स इन्स्टॉल करायचे किंवा नाही यासाठी विशेष सेटिंग्ज करावी लागते . शक्यतो गुगल प्ले व्यतिरिक्त इतर पर्यायांमधून अॅप्स इन्स्टॉल न करणे हा खबरदारीचा पहिलामार्ग आहे .
वेगवेगळ्या ' थीम्स ' नी नेटिझन्सना कायम आकर्षित करणाऱ्या ' गुगल ' ने ' गुगल ग्लास ' च्या माध्यमातून इंटरनेटच्या जमान्यामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे. आपल्या कामावरील लक्ष विचलित होऊ न...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech