ऑपरेटिंग सिस्टिम्स

असा वापरा अँड्रॉइड फोन

नॉन मार्केट अॅप ओपन करण्यासाठी  काही फोन वगळता बहुतांश अँड्रॉइड फोनमध्ये आपल्यालानॉन मार्केट अॅप ओपन करता येऊ शकतात . म्हणजे आपण थर्ड पार्टी अॅप्स डाऊनलोड करू शकतो . जसे की , अमेझॉन अॅप स्टोअर किंवा ऑनलाइन अॅप्समधून आपण आपल्याला पाहिजे ते अॅप्स डाऊनलोड करू शकतो . हे फीचर वापरण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन अॅप्लिकेशन सेटिंग्जमध्ये जा आणि ' अननोन सोर्स ' समोरील चौकनात टिक मार्क करा. हे केल्यावर तुम्हाला विविध अॅप स्टोअरमधील अॅप्स डाऊनलोड करता येणं शक्य होणार आहे .  अॅप बंद करा  अँड्रॉइड फोनमध्ये आपले अॅप्स सतत सुरू असतात .ज्यावेळेस आपण त्याचा वापर करत नसू त्यावेळी हे अॅप बंद केले तर आपली बॅटरी जास्तवेळ वापरता येऊ शकेल . हे अॅप्स बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा . त्यानंतर रनिंग सर्व्हिसेसमध्ये लिस्ट व्ह्यू करा . मग जे अॅप्स तुम्हाला नको असतील त्या अॅप्सच्या पुढे स्टॉप करून अॅप्लिकेशन बंद करा .  अॅनिमेटेड वॉलपेपर वापरू नका  अॅनिमेशन असलेले वॉलपेपर खूप छान दिसतात . ते एन्जॉयही करता येतात . मात्र , त्यामुळे आपल्या मोबाइलची बॅटरी खूप जास्त खर्च होते . अशावेळी तुम्ही अॅनिमेशनच्या वॉलपेपरचा वापर करू नका . हे वॉलपेपर्स बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये डिस्प्लेमध्ये जा आणि नंतर अॅनिमेशन्समध्ये जाऊन ऑल  अॅनिमेशन्सवर टिक करा .  स्पेशन कॅरॅक्टर म्हणजे बॅक स्लॅश , अॅट द रेट अशा किजचा क्विक अॅक्सेस पाहिजे असेल तर स्पेसबारवर टॅप करा आणि होल्ड करा . ते केल्यावर आपण नेहमी वापरत असलेल्या कॅरेक्टर्सचा बॉक्स पॉप अप करत राहतो .  गुगल वॉइस नंबर  कोणत्याही अँड्रॉइड फोनवर गुगल वॉइस वापरता येऊ शकतील . यामध्ये तुम्ही तुमचा डिफॉल्ट नंबर सेव्ह करूशकता . म्हणजे आपण त्या व्यक्तीचे नाव घेतले की फोन लागतो . यासाठी तुम्हाला वॉइस अॅप डाऊनलोड करावालागेल . हे अॅप तुमचा मोबाइल नंबर व्हेरीफाय करतो आणि मगच तुम्हाला ते अॅप वापरता येऊ शकते .  सर्व अॅप फोल्डरमध्ये ठेवा  तुमच्या होम स्क्रीनवर अनेकदा अॅप्सची गर्दी दिसते . हे टाळायचे असेल तर तुम्ही सर्व अॅप्स एका फोल्डरमध्ये सेव्हकरा . यासाठी तुमच्या मोबाइलच्या होमस्क्रीनवर टॅप करून होल्ड करा . यानंतर एक फोल्डर तयार करा आणिमग त्यात सर्व अॅप्स तुम्हाला ड्रॅग करता येऊ शकतील . 

आयफोन की अँड्रॉइड

नवीन मोबाइल घेताना नेहमी प्रश्न पडतो कोणता घ्यावा ? अँड्रॉइड की आयफोन ? त्यातही महागडा फोन घ्यायचा तर गोंधळ आणखीनच वाढतो . सॅमसंग गॅलक्सी एस ३ आणि आयफोन पैकी कशाची निवड करावी ते कळतच नाही .दोन्ही त्यांच्या ठिकाणी ग्रेट आहेत , पण मग निवड कशी करायची ? तेव्हा निवड करताना सर्वात आधी पहा ते तुमचा मोबाइल ऑपरेटर . तसेच तुमच्या गरजेच्या अॅप्स आणि इतर गोष्टी कुठे आहेत तेही पहा . कारण एकदा का खरेदी झाली की स्विच करणे आर्थिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने त्रासदायक असते  आयफोन  मोठ्या प्रमाणात चांगल्या अॅप्सची उपलब्धता हे आयफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे . अॅपलच्या अॅप स्टोअरवर ७ लाखाहून अधिक अॅप्स उपलब्ध आहेत . ब - याचशा प्रस्थापित कंपन्या सुरुवातीला आयफोनसाठी अॅप बनवतात नंतर अँड्रॉइडसाठी . कितीतरी काळ इन्स्टाग्राम फक्त आयफोनसाठीच उपलब्ध होतं . फेसबुकनेही त्यांचं नवीन अॅप सुरुवातीला फक्त आयफोनसाठी उपलब्ध करून दिलं नंतर अँड्रॉइडसाठी . ट्विटर आणि फेसबुकचे आयफोन अॅप अतिशय उत्तम आहेत . त्यामुळे पोस्ट टाकणं अगदीचसहज होतं . पासबुकसारखी काही आयफोनसाठीच बनविलेली अॅपही याठिकाणी आहेत . मोबाइल पेमेंट क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्क्वेअर कंपनीने त्यासाठी ही सुविधा देऊ केली आहे . याच्या सेटअपसाठी खूप वेळ लागत असला तरी फायदेही आहेतच . सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अॅपलच्या सिस्टीममध्ये उदा . की - बोर्ड बदलण्यासारखे फारसे बदल करू शकत नाहीत . त्यामुळे टेक सॅव्ही नसलेल्या किंवा ज्यांना फारसे बदल करायचे नसतील त्यांना याचा फायदा होतो .  अँड्रॉइड  अँड्रॉइडचा सर्वात मोठा प्लसपॉइंट म्हणजे विपुल प्रमाणात उपलब्ध असलेले मोबाइल्स . सँमसंग , एलजी ,मायक्रोमॅक्सपासून कितीतरी कंपन्यांचे अँड्रॉइड फोन बाजारात उपलब्ध आहेत . अगदी गुगलचा नेक्ससही तुमच्यासाठी हजर आहे . अँड्रॉइडचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे , तुम्हाला गरजेप्रमाणे यात बदल करता येतात . उदा . स्विफ्ट की हे प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले एक आघाडीचे अॅप आहे . यात तुम्ही गरजेप्रमाणे की- बोर्ड बदलू शकता किंवा तुम्ही कोणता शब्द टाइप करणार याचा अंदाज हे सॉफ्टवेअर व्यक्त करते . त्यातून टायपिंग जलद होऊ शकते . आणखी एक गोष्ट म्हणजे याठिकाणी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या अॅप्स .अॅपल अॅप्स ही डेव्हलपरची पहिली पसंत असली तरी कित्येक अॅप्सला अॅपल मंजुरीच देत नाही . गुगलचं तसं नाही . त्यामुळे गुगलवरही जवळपास ७ लाख अॅप्स आहेत . विंडोज फोन आणि ब्लॅकबेरी हे देखील काही पर्याय आहेत . पण त्यांना अँड्रॉइड किंवा आयफोन इतक्या अॅप्सपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल .

भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीयांनी खूप मोठी झेप घेतली आहे. विंडोज , लिनक्स , अँड्रॉइडसह विविध ऑपरेटिंगसिस्टीमच्या विकासात हातभार लावला आहे . पण संपूर्ण भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम बनविण्यात भारताला अद्याप यश आलेले नाही . पण येत्या तीन वर्षांत ही गोष्ट साध्य होऊ शकते . संरक्षण संशोधन व विकास संस्थाअर्थात डीआरडीओ इतर काही संस्थांच्या मदतीने यावर काम करते आहे . बाहेरील देशातून विंडोज , लिनक्स यासारख्या ऑपरेटिंग सिस्टीम आयात केल्याने व्हायरसचा धोका असतो .त्यामुळे आपली स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम असणे अनिवार्य असल्याचे डीआरडीओचे प्रमुख व्ही . के . सारस्वतम्हणाले . नवीन ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करण्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून त्याला मोठ्याप्रमाणात सॉफ्टवेअर इंजिनीअरची गरज लागणार आहे . सध्या देशभरातील १५० इंजिनीअर्स यावर काम करतअसून संपूर्ण भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम पूर्ण व्हायला आणखी तीन वर्षं लागतील . विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारची परदेशी मदत घेतली जाणार नाही . त्यामुळे देशातील उद्योग , संशोधक , वैज्ञानिकांनीडीआरडीओ आणि इतर वैज्ञानिक विभागांच्या साथीने या कामाला हातभार लावावा . त्यामुळे पूर्णपणे स्वायत्तहोणे भारताला शक्य होईल , असे आवाहन त्यांनी केले . यापूर्वीही भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्याचे काही प्रयत्न झाले होते . तामिळनाडूतील लोयोला इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थी दीपक जॉन यानेही गेल्या वर्षी मायक्रोस ( मोबाइल इनक्युर्ड रिव्होल्युशनाइज्ड ऑपरेटिंग सिस्टीम ) ही ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली होती . दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दीपकची सिस्टीम क्रॅश झाल्याने त्याला ही प्रेरणा मिळाली होती . १०० एमबी आकाराची ही ओएस त्याने क्लाऊडवर तयार केली होती. त्यामुळे पेनड्राइव्हमधूनही ती वापरता येत होती . त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या इन्स्टॉलेशनची गरज नव्हती पण सिस्टीममध्ये साठविलेल्या विविध फाइल्स यामध्ये अॅक्सेस करता येत होत्या व त्यावर कामंही करता येत होती . त्याने यामध्ये ओपन ऑफिसही दिले होते . यावर इंटरनेट आणि विंडोजवरील विविध अॅप्लिकेशन वापरता येतात . कम्प्युटर बंद केल्यावर त्यातील रॅममध्ये असणारी या संदर्भातील सर्व माहिती डिलीट होत असल्याने युझर्सला त्यांची गोपनीयता जपता येत होती .

‘अॅपल’पुढे गुगलची अँड्रॉइड सरस

जगातील सर्वांत मोठा मोबाइल प्लॅटफॉर्म कोणता , तर अँड्रॉइड असे म्हणावे लागले . या ओपन सोर्स मोबाइल ऑपरेटिंग प्लॅटफॉर्ममुळे इनोव्हेश करण्यास वाव मिळतअसून , परिणामी मोबाइल फोनच्या किमतीही कमी होत आहेत . यामुळे अॅपल कंपनीपुढे गुगल कंपनीच अँड्रॉइडही ऑपरेटिंग सिस्टिम वरचढ ठरत आहे .  जगात विविध ठिकाणी पाठविण्यात येत असलेल्या फोनमध्ये चार फोनमागे तीन फोन हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचे आहेत . याबाबतची पुष्टीही आयडीसीने केली आहे . २००८ मध्ये गुगल कंपनीने अँड्रॉइड ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम लाँच केली . तेव्हापासून स्मार्टफोनच्या विक्रीतही मोठी वाढ झाली असून , ही ऑपरेटिंग सिस्टिमच या वाढीचे मुख्य इंजिन आहे . लाँच झाल्यापासून प्रत्येक वर्षीअँड्रॉइड ही सिस्टिम वाढीच्या बाबतीत सरस ठरली आहे .  दुसऱ्या तिमाहीत टॅब्लेट बाजारपेठेत अॅपल कंपनीचा हिस्सा ६५ टक्के होता आणि आता तो ५० टक्क्यांपेक्षा किंचित जास्त आहे . जागतिक पातळीवर विविध उत्पादकांकडून या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित डिव्हाइस तयार केली जात असून , त्यांच्या किमतीतही विविधता आहे . अँड्रॉइड स्मार्टफोनची निर्यात १३ . ६ कोटी युनिटवर पोचली आहे . गेल्या वर्षापेक्षा यात ९०टक्क्यांहून अधिक वाढ आहे .  सॅमसंग गॅलेक्स एस३ या स्मार्टफोनने अॅपल कंपनीच्या आयफोन ४ एसला तिसऱ्या तिमाहीत मागे टाकत जगात सर्वाधिक विकला जाणारा फोन होण्याचा मान मिळाविला आहे , असे पाहणी अहवालत नमूद केले आहे . अॅपलपेक्षा इनोव्हेशनच्या बाबतीत अँड्रॉइडचा वेग अधिक आहे . अँड्रॉइडकडून जोरदार प्रयत्न सरू असून , अॅपल कंपनी बरीच मागे आहे , असे गार्टरनचे म्हणणे आहे .  अँड्रॉइड हा ओपन सोर्सप्लॅटफॉर्म असून , वापरण्यास कोणतेही शुल्क द्यावे लागत नसल्याने अनेक कंपन्या या सिस्टिमचा आधार घेतडिव्हाइस डेव्हलप करीत आहेत . याचा फायदा हा अँड्रॉइडला मार्केट वाढण्याच्या रूपाने होत आहे . अँड्रॉइडप्लॅटफॉर्मवर अनेक पर्याय उपलब्ध असून  बहुतेक पर्याय स्वस्तात मिळतात . हा प्लॅटफॉर्म वापरण्याकडे लोकांचाकल वाढत आहे . दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा असली , तरी त्याचा फायदा हा प्रॉडक्ट रास्त किमतीला प्रसंगी स्वस्तात मिळण्याच्या रूपाने होत आहे हे नक्की ! 

आठव्या खिडकीत डोकावताना विंडोज ८ नाविन्य

कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टिमची मक्तेदारी असलेल्या मायक्रोसॉफ्टने ' विंडोज ८ ' च्या माध्यमातून कम्प्युटर वापराला नवा आयाम दिला आहे. यामुळे कम्प्युटर वापरातील धम्माल आणखी वाढणार...

Page 14 of 16 1 13 14 15 16
ADVERTISEMENT
error: Content is protected!