फेसबुकसाठीही पैसे भरा : इव्हेंटच्या प्रसिद्धीसाठी
फेसबुकच्या शेअरच्या किमतीत सुरू असलेली घसरण अजूनही कायम आहे. त्यामुळे युझर्सची संख्या वाढत असली तरी कंपनीचा महसूल घसरत चालला आहे....
फेसबुकच्या शेअरच्या किमतीत सुरू असलेली घसरण अजूनही कायम आहे. त्यामुळे युझर्सची संख्या वाढत असली तरी कंपनीचा महसूल घसरत चालला आहे....
आपल्या कार्यालयीन दिवसाची सुरुवात आणि शेवट ही ई-मेलनेच होते. म्हणता म्हणता आपल्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग बनलेला या ई-मेलला नुकतेच...
कॉलेज प्रोजेक्ट असो किंवा एखादा पत्ता शोधणे ,नेटकनेक्शन जोडल्या जोडल्या डोक्यात पहिल्यांदा क्लिकहोणारे आणि ए टू झेड सर्व माहिती पुरवणारे गुगल १५व्या वर्षात पदार्पण करत आहे . जगातील कोणतीही माहिती हवी असल्यास तिच्या पर्यंतपोहचण्यासाठी मदत करण्यात गुगल या सर्च इंजिनचाकोणीच हात धरु शकत नाही . भारतात गुगल डॉट को डॉटइन ही सेवा मराठी , हिंदीसह नऊ भारतीय भाषांत उपलब्धआहे . त्यामुळेच प्रोजेक्टची कामे करताना तरुण पीढीने 'गुगल तर उगल ' अशी एक म्हणच तयार केली आहे . विशेषम्हणजे इंटरनेटकरांच्या या विश्वासाला गुगलने नेहमीच सार्थकेले आहे . गुगलने अॅनिमेटेड होमपेज तयार केले. या पेजवर गेल्यागेल्या गुगलच्या नावाऐवजी एकामोठ्या आयताकृती चॉकलेट केकवर असणा - या १४ मेणबत्त्या काही क्षणातच केक गुगल लोगोच्या रंगांचा होत . मेणबत्या टॅलीच्या भाषेत १४ आकडा तयार करतात . गुगल कंपनी ७ सप्टेंबर १९९८ रोजी स्थापन झाली . स्थापनेपासून २००४ पर्यंत कंपनीने सात सप्टेंबर याचदिवशी आपला वाढदिवस केला होता . मात्र २००५ पासून कंपनीने २७ सप्टेंबर हाच आपला वाढदिवस असल्याचेजाहीर केले . सर्वात जास्त पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्याची तारीख आणि वाढदिवस एकाच दिवशी असावाया हट्टापायी गुगलने ही सर्व उठाठेव केली . गुगलच्या जन्माची गोष्ट कॅलिफोर्नियातील स्टँडफोर्ड विद्यापीठात शिकणा - या लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी सात सप्टेंबर १९९८ रोजीगुगल कंपनीची स्थापना केली . या कंपनीने इंटरनेटकडे पहाण्याचा जगाचा दृष्टीकोनच बदलला .
जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलने देशभरातील युझर्ससाठी मोफत एसएमएस सेवा सुरू केली आहे . गेल्या मार्चपासूनच सुरू झालेली निवडक ग्राहकांपुरती ही सेवा गुगलने आता सर्वांसाठी खुली केली आहे . यासेवेद्वारे जीमेल चॅटच्या माध्यमातून मोबाइल फोनवर एसएमएस पाठवता येईल . या एसएमएसला फोनवरून रिप्लाय करता येईल. स्पॅम रोखण्यासाठी गुगलने प्रत्येक ग्राहकाला ५० एसएमएसचे क्रेडिट दिले आहे . वॉट्स अप ,निंबूझ यासारख्या मेसेज सेवांनी मोबाइलवर यापूर्वीच अधिराज्य निर्माण केल्याने गुगलचे हे पाऊल काहीसे उशीराच पडल्याचे मानले जाते . सध्या मोफत एसएमएस सुविधा देणाऱ्या अनेक वेबसाइट आहेत . आता जीमेलनेही भारतात ही सोय उपलब्ध केली आहे . यापूर्वी आफ्रिका , उत्तर अमेरिका आणि आशियातील ५१ देशांमध्ये ही सुविधा सुरू होती . सर्वप्रथम२०११मध्ये आफ्रिकेतून या सुविधेची सुरुवात जीमेलने केली . भारतात प्रवेश करायला मात्र त्यांनी उशीर केला ,असंच म्हणावं लागेल . कारण याहूमेल आणि इंडियाटाइम्स यांसारख्या वेबसाइट्सवर एसएमएस सुविधाया आधीच उपलब्ध करून देण्यात आली होती . जीमेलची ही एसएमएस सुविधा मोफत उपलब्ध आहे . याआधारे जीमेलधारक मोबाइलवर जीमेल चॅटमार्फत एसएमएस पाठवू शकतात . या एसएमएसला आलेला रिप्लायही चॅटमध्ये दिसू शकेल आणि हे संभाषण चॅट हिस्टरीमध्ये सेव्ह केले जाईल . १० ऑक्टोबरपासून भारतीय ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध झाली असून गुगल अॅप्सवरही ती उपलब्ध आहे . सध्या एअरसेल , आयडीया , लूप , एमटीएस , रिलायन्स , टाटा डोकोमो , व्होडाफोन यांसारख्या ऑपरेटरच्या मोबाइलवर हे मोफत एसएमएस पाठवता येतात . मात्र देशातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी असलेल्या एअरटेल आणि बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांच्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही .यापूर्वी मार्च महिन्यात केवळ काही मोजक्या ऑपरेटरसह ही सुविधा गुगलने सुरू केली होती . कसा करायचा एसएमएस ? या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जीमेल काँटॅक्टमधील व्यक्तीच्या नावावर क्लिक केल्यावर ' ऑप्शन्स ' असा पर्याय येईल . त्यात ' सेंड एसएमएस ' पर्यायावर क्लिक केल्यास मोबाइल नंबर नमूद करण्याचा पर्याय येईल .त्याठिकाणी संबंधित व्यक्तीचा मोबाइल नंबर अॅड केल्यास तुम्हाला त्या व्यक्तीच्या मोबाइलवर तुमच्या चॅटवरून थेट एसएमएस पाठ वता येईल . सुरुवातीला या सेवेमध्ये ५० मोफत एसएमएसचे ' क्रेडिट ' मिळणार असून प्रत्येक पाठविलेल्या एसएमएसबरोबर ते कमी होणार आहे . त्याचवेळी त्याला मिळालेल्या प्रत्येक रिप्लायनुसार पाच क्रेडिट वाढणार आहेत . मात्र ही मर्यादाही ५०ची असणार आहे . क्रेडिट शून्य झाले तर २४ तासानंतर तुमच्या खात्यात क्रेडिट जमा होईल . जीमेलवरून ही सुविधा मोफत असली , तरी तिला रिप्लाय करण्यासाठी केलेल्या एसएमएसला ऑपरेटरनुसार शुल्क लागू शकते . कोणत्याही जीमेल चॅटवरून एसएमएस नको असल्यास + ९१८०८२८०१०६० या क्रमांकावर STOP असाएमएसएम पाठवावा लागेल तर पुन्हा सुरू करण्यासाठी त्याच क्रमांकावर START असा एसएमएस पाठवावालागेल . जीमेलवर टाइप करा मराठीत जीमेलने आता मराठीसह इतर भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये थेट टायपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करूनदिली आहे . यापूर्वी गुगल ट्रान्सलिटरॉनच्या सहाय्याने ही सुविधा उपलब्ध होती . तुमच्या मेलमध्ये ही सुविधाअॅक्टिवेट करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन जनरल ऑप्शन्समधून लँग्वेज या पर्यायातून show all language options वर क्लिक करा . त्यात येणाऱ्या उपपर्यांयांमधून enable input tools वर क्लिक केल्यास तुम्हाला मराठी ,हिंदी , उर्दू , कन्नड , तेलगू , संस्कृत , अरेबिक , जर्मन यासारख्या जवळपास सर्व भारतीय आणि परकीय भाषांचापर्याय दिसेल . त्यातून तुम्हाला हव्या असलेल्या भाषा निवडा आणि सेटिंग्जमधील बदल सेव्ह करा . तुमच्याजीमेल होमपेजच्या हेडर बार तुम्हाला मराठीसाठी ' म ' हिंदीसाठी ' अ ' असे भाषानिहाय पर्याय दिसतील .तुम्हाला ज्या भाषेत टाइप करायचे असेल त्यावर क्लिक करा आणि ट्रान्सलिटरॉनच्या पद्धतीमध्ये ( उदा . ' मला 'साठी mala ) टाइप करा की झाला तुमचा मराठीतील इमेल तयार . यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या फॉन्टची, विशेष सॉफ्टवेअरची गरज नाही .
सध्या तुम्ही आयफोन , आयपॅड किंवा आयपॉड टच वापरत असाल आणि आयफोन ५ वापरण्याची तुमची इच्छा असेल पण घेण्याची तयारी नसेल तर...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech