फेसबुक सुरक्षित पण स्लो होणार

वेगाच्या नव्या तंत्रज्ञानाच्या जगात रोज नवनवीन सर्व्हर , प्रोसेसर , तंत्रज्ञान यामुळे कम्प्युटर वेबसाइटचा वेग दिवसेंदिवस वाढतो आहे . सोबतच सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आहे . ऑनलाइन अॅक्टिव्हिटी अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी कंपन्या नवनवीन प्रणालीचा उपयोग करत आहेत . ही सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या फेसबुकचा वेग मात्र नव्या प्रणालीमुळे कमी होणार आहे .  युजर्सचे अकाऊंट अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी फेसबुक सुरुवातीला उत्तर अमेरिकेतील युजर्सला स्थलांतरितकरणार असून नंतर जगभरातील इतर ठिकाणच्या युजर्सला ही सुविधा दिला जाणार आहे . त्याठिकाणाहून फेसबुक https या http पेक्षा अधिक सुरक्षित कनेक्शनवर काम करणार आहे . त्यामुळे फेसबुकच्या वेब अॅड्रेसच्या अगदी सुरुवातीला http ऐवजी https दिसणार आहे . यातील s म्हणजे सिक्युअर . प्रामुख्याने बँकींग , ऑनलाइन शॉपिंग कंपन्या क्रेडीट कार्ड किंवा पासवर्डची माहिती मागताना अशाप्रकारच्या कनेक्शनचा वापर करतात .  फेसबुकच्या सर्व १ अब्जाहून अधिक युजर्ससाठी हेच कनेक्शन वापरले जाणार आहे . जानेवारी २०११ मध्ये फेसबुकने या स्थलांतरणाची सुरुवात केली . आतापर्यंत काही ठिकाणी ही सुविधा पर्यायी उपलब्ध होती .भारतातही इंटरनेट एक्सप्लोअरर सारख्या ब्राऊझरवर http तर मोझिलावर https कनेक्शन उपलब्ध होते . मात्र लवकरच सर्वांना ती बंधनकारक केली जाणार आहे . त्यामुळे अधिक सुरक्षित होण्याबरोबरच फेसबुक सुरक्षितहोणार आहे . वेग कमी होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी फेसबुककडून प्रयत्न केले जात असले तरी https वर ट्रान्सफर होण्यासाठीची प्रक्रिया थांबवणार नसल्याचे फेसबुकचे फ्रेडरीक वूलन्स यांनी स्पष्ट केले आहे .  या बदलाचा एक फायदा म्हणजे फेसबुक अकाऊंट अधिक सुरक्षित तर होईलच सोबत हॅकर्सपासूनही त्यांचे संरक्षण होईल . कारण https मध्ये सर्व डेटा एनक्रिप्टेड फॉर्ममध्ये असणार आहे . त्यामुळे वायफाय कनेक्शन वापरताना किंवा फेसबुक लॉग आऊट न करता कम्प्युटर बंद केल्यावरही अकाऊंटची सुरक्षा कायम राहणार आहे . या स्थलांतरणाचा आणखी एक फायदा म्हणजे ओळख नसलेल्या व्यक्तींनाही आता फेसबुक गेम खेळण्यासाठी आमंत्रित करता येईल . त्यामुळे फेसबुकच्या गेमिंगचा महसूल वाढणार आहे .  जानेवारी २०१० मध्ये जीमेलने सर्व युजर्सला https वर स्थलांतरित केले होते . पुढे जुलै २०१० मध्ये वेब ब्राऊझिंगच्या स्पीडमध्ये कुठलाही फरक पडला नसल्याचे जीमेलने म्हटले होते . हॉटमेल आणि ट्विटरवरही पूर्वीपासून https कनेक्शन वापरले जात आहे . 

एसएमएस होणार इतिहासजमा

दिवसभरात तुम्हाला मेसेजेस येण्याचे प्रमाण आणि तुम्ही मेसेजेस फॉरवर्ड करण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे तुमच्या लक्षात येईल . स्मार्टफोनचा जन्म आणि सोशल नेटवर्किंग साईटचा मोबाइलवरील वाढता वापर यामुळे एसएमएसच्या वापरावर परिणाम होऊ लागला आहे .  बहुतांश स्मार्टफोन युजर हे मेसेंजर सर्व्हिसेसचा सर्वाधिक वापर करू लागले आहेत . वायबारडॉटकॉम ,जक्सटर एसएमएस , आय मेसेज , व्हॉटसअॅप , अशा विविध फ्री अॅप्समुळे टेक्स्ट मेसेजेस पाठवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण टेक्नोलॉजी एक्सपर्ट , जेफ कागन यांनी मांडले आहे .  अमेरिकेतील मेजेस पाठवण्याच्या घटत्या प्रमाणाचा सर्वाधिक फटका जगातील तमाम मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्याना बसू लागला आहे . मेसेजेससाठी इतर पर्याय वापर वापरल्यास मोबाइल कंपन्यांना आर्थिक फायदा होत नाही . यामुळे अमेरिकेतील अनेक मोबाइल कंपन्यांनी आपल्या एसएमएस सुविधांचा पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे .  चेतन शर्मा या मोबाइल कन्सल्टंटने केलेल्या सर्व्हेत २०१२च्या तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेत टेक्स मेसेजेसमध्ये तब्बल तीन टक्के घट झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे . २०१२च्या सुरुवातीला फोर्बनेही अशीच आकडेवारीप्रसिद्ध केली होती यामध्ये हाँगकाँग , ऑस्ट्रेलिया , ब्रिटन , अमेरिका या देशांमधील आकडेवारी प्रसिद्ध करण्यातआली होती .  भारताच्या बाबतीत अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाली नसली तरी इथेही चित्र फारसे वेगळे नाही . येथील मोबाइल कंपन्यांनीही पर्यायी सुविधांचा विचार सुरू केला आहे . थ्रीजी तसेच लवकरच सुरू होणाऱ्या फोरजी या सुविधांमुळे टेक्स्ट मेसेजेस इतिहास जमा होतील , अशी भीती व्यक्त होत आहे . 

आता विकिपिडियावरही व्हिडिओ अपलोड करा

जगभरातील ' नेटक - यां ' साठी माहितीचा सर्वात मोठासाठा असणा - या विकिपिडियाने एक नवीन प्रकल्प हातीघेतला आहे . हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विकिपिडियाच्यानोंदणीकृत सदस्यांना त्यांच्या पोर्टल सर्विसच्या सपोर्टनुसारविकिपिडियाच्या पानांमध्ये व्हिडिओ अपलोड करता येतील .  विकिमीडीया फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार हे नवीनव्हिडिओ प्लेयर विकिपिडिया आणि विकिपिडियाशी संबंधीतइतर साइटच्या पानांवरच दिसतील . तसेच या व्हिडिओमुळेलोकांना अनेक भाषांमध्ये माहिती पुरवता येईल , अशीआशाही फाऊंडेशनने व्यक्त केली .  सामान्य ज्ञान , संदर्भ तसेच सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण ठरणारीमाहिती आतापर्यंत विकिपिडियावर फक्त लिखित स्वरुपात उपलब्ध होती . मात्र विकिपिडियाच्या प्रयोगामुळेजगभरातील माहिती व्हिडिओ स्वरुपात मिळेल . व्हिडिओ अपलोडींगचा हा प्रकल्प मुक्त माहितीपुरवठ्याअंतर्गतउपलब्ध असणारा व्हिडिओ कलतुरा आणि गुगल सर्च इंजिनच्या मदतीने २००८ सालीच सुरु केला होता . मात्रअनेक तांत्रिक अडचणींमुळे या हा प्रकल्प अनेक वेळा रखडला . आता विकिपिडिया , गुगल आणि कलतुरा यांच्याएकत्रित प्रयत्नांनी एचटीएमएल - ५ ही नवीन संगणकीय भाषा तयार करण्यात आली आहे . तिचा या प्रकल्पातवापर करण्यात येणार आहे .  सध्या विकिपिडियाच्या इंग्रजी भाषेतील पानांना रोज २५ कोटी लोक भेट देतात . तसेच सध्या विकिपिडियाच्यानावे १५ हजार व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत . हे सर्व व्हिडीओ २००७ पर्यंत वापरत असलेल्या ओग थेओराव्हिडीओ प्लेअरद्वारे अपलोड करण्यात आले आहे किंवा ते एचटीएमएल - ५च्या चाचणीसाठी नवीन व्हिडीओप्लेअरमार्फत अपलोड करण्यात आले आहेत .

नवे सुधारित फेसबुक कसे वापराल?

सोशल नेटवर्किंग म्हणजे फेसबुक असं सध्या समीकरण झालेलं आहे. २००४ साली अमेरिकेतील एका कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी सुरू झालेल्या...

गॅजेट चार्ज करणारा स्टोव्ह

गॅजेट चार्ज करणारा स्टोव्ह

 मोबाइल किंवा गॅजेटशिवाय वीकेंडला बाहेर जाण्याची कल्पनाही करवत नाही ना? पण निसर्गरम्य वातावरणात लाकडे टाकून स्टोव्हवर स्वयंपाक करत असतानाच तुमचा...

Page 56 of 61 1 55 56 57 61
ADVERTISEMENT
error: Content is protected!