यूट्यूबचा नवा हिरो

सामाजिक संदेश देणारा कुठलाही व्हिडीओ यूट्यूबवर लोकप्रिय होऊ शकतो ? होय... ' गंगनम ', ' कोलावेरी ' या टाइमपास व्हिडीओजनंतर ' टॉक इट आऊट ' हा असाच एक व्हिडिओ यूट्यूबवर सध्या हिट...

टचस्क्रीनची चिंता नको!

नव्वदच्या दशकापर्यंत लँडलाइन फोन हीच चैन होती. पुढे कॉर्डलेस आल्यानंतर फोनच्या वापरामध्ये आणखी सुलभता आली. त्यानंतर मोबाइलचा विचार पुढे आला....

चिनी ड्रॅग्रनला भारत देणार ‘सुपर’ झटका

 ' सुपर - सुपरकॉम्प्युटर ' च्या निर्मितीसाठी भारत , चीन , जपान , अमेरिका यांच्यात सुपरकॉम्पिटीशन सुरु झाली आहे . येत्या आठ वर्षात सुपर - सुपर कॉम्प्युटर तयार होईल . निर्मितीत भारत सगळ्यांवर मात करेल . अगदी चीनवर सुध्दा , असा विश्वास सुपर कॉम्पुटरचे जनक डॉ . विजय भटकर यांनी व्यक्त केला आहे .  गेल्या शतकात मानवी जीवनात तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणला तो संगणकानेच . पाश्चात्यांकडून आपण ते तंत्रज्ञान आयात केलं . त्यानंतर झालेले महत्त्वाचे संशोधन म्हणजे महासंगणक ( सुपर कम्प्यूटर ). पाश्चात्यांनी हे तंत्रज्ञान आपल्याला देण्याचे नाकारले . भारताचे प्रसिध्द वैज्ञानिक डॉ . विजय भटकर यांनी हे आव्हान स्विकारले आणि भारतानेच महासंगणक तयार केला. भारताच्या याच सुपुत्राने आता महा - महासंगणक तयार करण्याचा ध्यास घेतलेला आहे .  आजचा सुपर कम्प्यूटर म्हणजे उद्याचा लॅपटॉप  ' तंत्रज्ञानामुळे आज जग झपाट्याने बदलते आहे . प्रत्येक क्षणी एक नवे तंत्रज्ञान जन्माला येत आहे . आजचा सुपरकम्प्यूटर हा उद्याचा लॅपटॉप झालेला असेल . त्यामुळे बदलत्या काळासोबत अपडेट राहणे आवश्यक आहे . हे जरीखरे असले तरीसुध्दा इतरांच्या एक पाऊल पुढे जाण्याचाही विचार करणे अत्यंत गरजेचे आहे . याच गरजेतून२००८ साली महा - महासंगणकाची संकल्पना पुढे आली . २०१० साली याबाबत शासनापुढे प्रस्ताव मांडण्यातआला . हा प्रस्ताव मान्य करीत त्यासाठी ११ हजार कोटीं रूपयांचा निधी देण्याचे शासनाने कबूल केले आहे .बाराव्या पंचवार्षिक योजनेत शासनाने त्यासाठी ५ हजार कोटींचा निधी मान्य केला ,' अशी माहिती डॉ . भटकरयांनी मटाशी बोलताना दिली .  अडचणच असते ' इनोव्हेशनची ' जननी  ' एक अब्ज अब्ज प्रक्रिया ( एक ' एक्झा ') एका सेकंदात करण्याइतकी गती या संगणकाची असेल . परिणामतःत्यासाठी ' ५ हजार मेगा वॅट ' इतकी उर्जा लागणे अपेक्षित आहे . मात्र उर्जेचा तुटवडा असताना एवढी वीज केवळएका प्रकल्पासाठी देणे भारताला अशक्य आहे . त्यामुळे २० मेगा वॅट विजेच्या सहाय्याने हे काम कसे करता येईलयासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत . एखादे मोठे ध्येय साध्य करताना अनेक अडचणी येतात . मात्र याच अडचणी 'इनोव्हेशन्स ' ला जन्म देतात आणि त्यातूनच ध्येय साध्य होते ' असे त्यांनी सांगितले .  एका चिपवर हजारो प्रोसेसर  कमी उर्जेत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका चिपवर हजारो प्रोसेसर्स लावण्यात येतील . त्यांना ' नेटवर्किंग ' च्यासाहाय्याने कनेक्ट करण्यात येईल , असे त्यांनी सांगितले .  २०२० ला साकारणार महा - महासंगणक  हा प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ आमच्या पुढे आहे . या प्रकल्पात आपण ' मेंटॉर ' म्हणून कार्यरतअसल्याचे डॉ . भटकर यांनी सांगितले .  सामान्य माणूसही वापरेल महा - महासंगणक  हा संगणक तयार झाल्यानंतर ' नॅशनल नॉलेज नेटवर्क ' अंतर्गत देशातील सर्व विद्यापीठांना हा जोडण्यात येईल .त्यामुळे अगदी शेतात बसलेल्या शेतकऱ्यालासुध्दा आपल्या ' ४ जी ' सुविधेद्वारे या संगणकाशी कनेक्ट होता येईल. अर्थातच त्याच्या वापरासाठी काही नियमसुध्दा घालून दिल्या जातील . या संकल्पनेवर आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले . 

विचार करा, कम्प्युटर चालवा

भारतीय वंशाच्या संशोधकांची किमया  जगातील सर्वाधिक वेगवान आणि अचूक गणिती प्रक्रिया करणारा कम्प्युटर विकसित करण्यात आला असून , मानवी मनातील भावना आणि विचारांच्या माध्यमातून त्याची हाताळणी शक्य असल्याचा दावा भारतीय वंशाच्या संशोधकाने केला आहे . या विशिष्ट कम्प्युटरचा फायदा शारिरीकदृष्ट्या अपंगांना होणार असल्याचेही त्यांनी स्पष्टकेले .  अचूकता आणि गतिमानता यांच्या बरोबरीने नैसर्गिकरित्या चलनवलन ही या कम्प्युटरची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत .स्टॅन्फोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी मानवी मेंदूमध्ये बसविता येईल , अशी कृत्रिम प्रणाली निर्माण केली असून , ​' रीफिट ' असे तिचे नामकरण करण्यात आले आहे .या प्रणालीसाठी आज्ञावलीदेखील  ( अल्गोरिदम ) तयार करण्यात आली आहे . या प्रणालीच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या मानवी मज्जासंस्थेतून ( न्यूरल प्रोस्थेटिक ) कम्प्युटरच्या कर्सरवर नियंत्रण ठेवता येणार आहे .  ' या प्रणालीच्या माध्यमातून शरीरावरील नियंत्रण हरवून बसलेल्या व्यक्तीदेखील सर्वसामान्यांनुसार कम्प्युटरची हाताळणी सहजरीत्या करू शकेल ,' असा विश्वास भारतीय वंशाचे संशोधक कृष्णा शेणॉय यांनी व्यक्त केला . ही प्रणाली मानवी मेंदूत बसविलेल्या सेन्सरद्वारे कार्यरत राहील . सेन्सरद्वारे होणारी प्रत्येक हालचाल अथवा कृती रेकॉर्ड करण्यात येईल . तसेच ती माहिती ' डेटा ' स्वरूपात कम्प्युटरकडे पाठविण्यात येईल , असेही शेणॉय यांनी नमूद केले .  या संशोधनासाठी शेणॉय यांना डॉ . विकाश गिल्जा यांनी सहकार्य केले . हे महत्त्वपूर्ण संशोधन ' नेचरन्युरोसायन्स ' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे .

Page 55 of 61 1 54 55 56 61
ADVERTISEMENT
error: Content is protected!