चित्रपटांचा खजिना

हॉलिवूडमध्ये सातत्याने नवनवीन आणि दर्जेदार चित्रपट येत असतात . काही जुने चित्रपटही पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. या सर्व चित्रपटांचा खजिना  या वेबसाइटवर उपलब्ध आहे . त्यात चित्रपट , त्यांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे . अगदी विषयानुसार , मूडनुसार याठिकाणी चित्रपट उपलब्ध आहेत . काही चित्रपट पाहण्यासाठीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत . youtube movies           (मराठी सुद्धा उपलब्ध )   allmovie yahoo movies watchfreemovies Other Informations :  www.rediff.com/movies...

हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क! कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’

हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क! कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’

 यंदा झालेल्या 'कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो'मध्ये (सीईएस) सुमारे एक लाख 20 हजारांपेक्षा जास्त नवे  प्रॉडक्ट्स सहभागी झाले होते. त्यात 10  प्रॉडक्टस्...

शॉर्ट अँड बंडल लिंक (bit.ly, goo.gl)

फेसबुक आणि ट्विटरने पुन्हा एकदा ' शेअरिंग ' ची सोयउपलब्ध करून दिली आहे . त्यामुळे तरुण पिढीला नव्याशेअरिंगची सवय लागली आहे . त्यामुळे दररोज कित्येक गोष्टीविविध लिंक्सच्या माध्यमातून शेअर केल्या जातात . मात्रआता या अनेक लिंक्स शेअर करायचाही कंटाळा येतो . लिंकशेअर तर करायचीय पण अनेक लिंक शेअर करायचा कंटाळा. ट्विटरवर तर १४० शब्दांची मर्यादा असल्याने आणखीनचप्रॉब्लेम होतो . या समस्येवर सोल्युशन्स देणाऱ्या काहीवेबसाइट्स आहेत . त्यात अनेक लिंक एकाचवेळी शेअर करतायेतात .  1. Bit.ly  यूआरएल छोटी करून देण्याची सेवा देणाऱ्या वेबसाइट्समध्ये ही एक आघाडीची वेबसाइट . यामध्ये तुम्हालासुरुवातीला इ - मेल आयडी वापरून अकाऊंट तयार करावे लागते . त्यानंतर तुम्ही यूआरएल अॅड करू शकता . हीयूआरएल शेअर करताना शॉर्ट स्वरुपात दिसते . याठिकाणी बंडल करून अनेक यूआरएल एकाचवेळी शेअरहीकरता येतात . याठिकाणी युआरएल बरोबरच फोटो , डॉक्युमेंट , ई - बुक अॅड करता येतात . हे बंडल किंवा सिंगलयुआरएल तुम्ही फेसबुक , ट्विटरवर शेअर करू शकता किंवा ई - मेलही करता येईल .  2. BridgeURL  यूआरएल शॉर्ट करण्यासाठी ही वेबसाइट bit.yl चीच मदत घेते . पण तरी त्यासाठी कुठलंही अकाऊंट तयार करावंलागत नाही हा या वेबसाइटचा मोठा प्लस पॉइंट . याठिकाणीही यूआरएलसाठी टायटल देऊन यूआरएल अॅडकरून थेट शेअर करू शकता . एकापेक्षा अधिक यूआरएल बंडल केल्या असतील तर ओपन करताना त्या स्लाइड शोप्रमाणे दिसतात . याठिकाणी अकाऊंटही तयार करता येते . त्याचा उपयोग करून लिंक अॅड करता येतात , काढूनटाकता येतात .  3. MinMu  यूआरएल शॉर्ट करण्याची किंवा बंडल करण्याची ही आणखी एक वेबसाइट . कुठलेही पाच नंबर टाइप करा ,टायटल द्या , यूआरएल टाइप करा किंवा पेस्ट करा आणि जनरेट मेन्यूवर क्लिक करून तुम्ही शॉर्ट लिंक तयार करूशकता . ही लिंक फेसबुक किंवा ट्विटरमध्ये पेस्ट करून शेअर करू शकता . मात्र या हायपरलिंक नसल्याने कॉपी -पेस्ट करूनच काम करावे लागते , ही या वेबसाइटची एक त्रुटी आहे . याठिकाणी लॉगिनची सोय नसल्याने तुमच्यालिंक साठवून ठेवता येत नाहीत .  4. Fur.ly  लिंक शॉर्ट करण्याची किंवा बंडल करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे . केवळ यूआरएल टाइप करा , सिक्युरिटीकोड टाइप करा आणि एंटर क्लिक केले की झाली तुमची शॉर्ट लिंक तयार . या लिंकला तुमच्या सोयीचे टायटलदेण्याचीही पर्याय याठिकाणी उपलब्ध आहे . या वेबसाइटवर तुमचे अकाऊंट असेल तर सिक्युरिटी कोड टाइपकरण्याचीही गरज नाही . मात्र याठिकाणी ५ पेक्षा अधिक यूआरएल बंडल करायचे असल्यास थोडी अडचण होते .

फॉण्ट्सची गंमत

कम्प्युटरमध्ये टायपिंग करत असताना एरिअल , टाइम्सरोमन फार फार तर कॅम्बरिया आणि  मराठीसाठी मंगल अशा ठराविक फॉण्टच्या पलीकडे आपण कधीच विचार करत नाही . प्रत्यक्षात  कम्प्युटरमध्ये खूप फॉण्ट्स असतात . प्रत्येक फॉण्ट बनवण्यामागचा एक उद्देश असतो . हेफॉण्ट  बनवताना टायपोग्राफर्स त्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत असतात , त्यात आपल्या भावना उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो . वर्षाला असे शेकडो फॉण्ट्स बाजारात येत असतात . सुंदर अक्षर ज्याप्रमाणे आपले लक्ष वेधून घेते त्याप्रमाणेच सुंदर फॉण्टही आपले लक्ष वेधून घेत असतो . यामुळे  टेक जगतात फॉण्टला विशेष महत्त्व आहे . सरत्या वर्षात बाजारात आलेल्या वेबवर तसेच मोबाइलवर वापरता येतील अशा काही बेस्टफॉण्ट्स विषयी ...  नोटीसीआ  हा फॉण्ट कॉम्पटीबल टाइपचा आहे . टॅबलेटच्या स्क्रीनवर कोणतीही गोष्ट वाचताना सुसह्य  व्हावी यादृष्टीने हा फॉण्ट तयार करण्यात आला आहे . या फॉण्टमध्ये वळदार अक्षरे चांगल्या  प्रकारे दिसतात . यामुळे हा फॉण्ट्सला अनेकांनी पसंती दर्शविली आहे . या फॉण्टमधील  वळणदारपणामुळे नेहमीच्या मोठ्या फॉण्टला पर्याय मिळणार आहे , असे फॉण्ट बनवणाऱ्यांचे  म्हणणे आहे . यात फॉण्टचे चार प्रकार असतील . हे फॉण्ट गुगल वेब फॉण्टमध्येउपलब्ध  आहेत . हे चारही फॉण्ट्स मोफत उपलब्ध आहेत .  बॅरिओल  विविध वेबसाइट्स आणि विविध अॅप्समध्ये दिसणारा गोलाकार फॉण्ट हा बॅरिओल फॉण्ट आहे  . हा फॉण्ट रेग्युलर आणि इटॅलिक अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे . गोलाकार अक्षरांमुळे  कोणतीही मोठी गोष्ट छोट्या जागेत सेट करता येणे शक्य होत आहे . कोणत्याही वेबसाइटच्या  मोबाइल आणि टॅबलेट व्हर्जनमध्ये मोठे फॉण्ट वापरले की , अनेकदा आपल्याला त्या गोष्टी  वाचण्यासाठी स्क्रोल करावे लागते . या त्रास या फॉण्टमुळे कमी होतो आणि छोट्या स्क्रीनवरही  फॉण्ट तितकाच चांगला दिसतो , असे फॉण्ट क्रिएटरने स्पष्ट केले आहे . ...

Page 54 of 62 1 53 54 55 62
ADVERTISEMENT
error: Content is protected!