ब्लॉग म्हणजे काय रे भाऊ?
लेखक : मकरंद करकरे ब्लॉग म्हणजे नक्की काय हे समजून घेणे , आवश्यक आहे. प्रसारमाध्यमे बातम्या वा विचार लोकांपर्यंत पोचवतात. बातमीदार वा...
लेखक : मकरंद करकरे ब्लॉग म्हणजे नक्की काय हे समजून घेणे , आवश्यक आहे. प्रसारमाध्यमे बातम्या वा विचार लोकांपर्यंत पोचवतात. बातमीदार वा...
अमेरिकेत इंटरनेटच्या खासगी वाय - फायनेटवर्कमधून गुपचूपपणे , बेकायदेशीर माहिती गोळा केल्याप्रकरणी ७० लाख अमेरिकन डॉलर्स दंड भरण्याचीतयारी गुगलने दर्शवली . अमेरिकेतील ३८ राज्यांमध्ये अॅटर्नी जनरलसोबत हा करार केला . माहितीची गोपनीयता राखण्याबाबत कर्मचाऱ्यांना कडक प्रशिक्षण देण्यास तसेच यूजर्सना वायरलेस नेटवर्कसुरक्षित करण्याविषयी जागरूक करण्याची मोहीम राबवण्यासही गुगलने मान्यता दिली . गुगलच्या स्ट्रीट व्ह्यूइमेजसाठी पॅनोरमा फोटो काढणाऱ्या वाहनांनी वायफाय इंटरनेटच्या असुरक्षित नेटवर्कमधून बेकायदेशीररित्याडेटा गोळा केल्याच्या वृत्तानंतर सुमारे डझनभर देशांमध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती . गुगलनेस्थानिक कायद्यांचे उल्लंघन केल्याचे नऊ देशांमध्ये समोर आले , असे इलेक्ट्रॉनिक प्रायव्हसी इन्फॉर्मेशन सेंटरनेस्पष्ट केले . स्ट्रीट व्ह्यू वाहनांनी अमेरिकेत २००८ ते २०१० या काळात गोळा केलेला ईमेल , पासवर्ड , वेबहिस्ट्री आणि अन्य डेटा नष्ट करण्याचे आश्वासनही गुगलने दिले .
मोबाइल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे जेथे जाईल तेथे त्याची सोबत ठरलेलीच . असेअसताना कामाच्या गडबडीत , व्यापात मोबाइल चार्ज करणं चुकून राहून गेलं आणि अचानक बॅटरी डाउनझाल्यास मात्र धांदल उडते . मग मोबाइल चार्ज करण्याची पळापळ ठरलेलीच . आता मात्र या पळापळीला एकसोपा पर्याय उपलब्ध झाला आहे . फक्त एक टेक्स्ट एसएमएस पाठवायचा की बॅटरी चार्ज्ड ! बुचकळयात पडलात ना ? पण हे खरंच आहे . लंडनस्थित ' बफेलो ग्रिड ' नामक कंपनीने सौर ऊर्जेवर आधारितमोबाइल चार्जिंग स्टेशनची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे . या चार्जिंग स्टेशनचा वापर करण्यासाठी फक्त एकएसएमएस पाठविण्याची आवश्यकता आहे . मात्र हा पर्याय सध्या युगांडा येथील मोबाइलधारकांना उपलब्धअसून जगभरात पोहोचायचा आहे . आफ्रिका आ णि आशिया खंडात दिवसेंदिवस मोबाइलधारकांचे प्रमाण वाढत आहे . त्यातही शहरी भागापेक्षाग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा असल्याने तेथील मोबाइलधारकांना हे स्टेशन वरदानच ठरणार आहे . 'बफेलो ग्रिड ' ने या तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम आफ्रिकेतील युगांडा या देशात केल्याचे वृत्त ' न्यू सायंटिस्ट ' नेदिले आहे . चार्जिंग स्टेशनमध्ये साठविण्यात आलेली उर्जा मोबाइलच्या बॅटरीला ' मॅक्सिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग 'या ( एमपीपीटी ) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होणार असल्याचेही ' न्यू सायंटिस्ट ' ने म्हटले आहे . मात्र ,तत्पूर्वी वर म्हटल्याप्रमाणे एक टेक्स्ट एसएमएस या ' ग्रिड ' ला पाठविणे आवश्यक आहे . हे सौर स्टेशन ६० वॉटक्षमतेचे आहे . हे स्टेशन तयार करण्यासाठी सर्व प्रकारच्या पर्यावरणाच्या निकषांचे पालन करण्यात आल्याचेहीकंपनीने म्हटले आहे . मात्र , मोबाइलचे चार्ज होणे सर्वस्वी स्टेशनच्या परिसरातील तापमान आणि सूर्याचाप्रकाश यावर अवलंबून असल्याचे ' बफेलो ग्रिड ' ने स्पष्ट केले आहे . ' एमपीपीटी ' ला जोडण्यात आलेले कम्प्युटर्सतापमान आणि त्यातील बदल यांची निरीक्षणे नोंदवणार आहेत . जेणेकरून यूजरना बॅटरी चार्ज होण्यासाठीलागणारा वेळ आणि शक्यता यांची माहिती मिळणार आहे . कशी चार्ज होईल बॅटरी ? युगांडातील मोबाइलधारकांना बॅटरी चार्ज करण्यासाठी ( एका एसएमएससाठी ) ११० शिलिंग ( भारतीयचलनात दोन रुपये ) खर्च येतो . स्टेशनला मेसेज आल्यानंतर मोबाइलमधील बॅटरी सॉकेटशी स्टेशन जोडण्यातयेते आणि नेहमीप्रमाणे बॅटरी चार्ज होण्यासाठी तयार असल्याचा संकेत दिला जातो . पण संबंधित मोबाइलचीबॅटरी चार्ज होण्यासाठी दीड तासांचा अवधी लागत असल्याचेही ' न्यू सायंटिस्ट ' ने म्हटले आहे . युगांडामधील हेस्टेशन पूर्ण चार्ज झाल्यानंतर तीन दिवस कार्यरत राहू शकते आणि दिवसाला ३० ते ५० मोबाइल चार्जिंगचीत्याची क्षमता आहे .
विकसीत तंत्रज्ञान, व्हर्चुअल जगात क्रांती घडवून 'गुगल'ने तरुणाईला अक्षरश: वेड लावलंय. स्वप्नवत वाटणार्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा गुगलने प्रयत्न सुरु केले...
आतापर्यंत कागदावर लिहिणे , मोबाइलमध्ये टाइप करणेकिंवा इलेक्ट्रॉनिक पेनचा वापर करून लिहिणे , कम्प्युटर टायपिंग यासारख्या गोष्टी सर्वसामान्यांना ज्ञात होत्या .पण कधी हवेत लिहिता येईल आणि ते इमेलद्वारे पाठविता येईल , असा विचार कुणी गांभीर्याने केलाच नव्हता .केवळ काहीतरी हवेत बोटं फिरवून समोरच्याला तात्पुरत्या स्वरूपात संदेश पोहोचविण्यापर्यंत हे मर्यादित होतं .पण जर्मन संशोधकांनी हवेत लिहून इमेल , मेसेज पाठविण्याचे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणलं आहे . जर्मनीतील कार्ल्सरूह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील संशोधकांनी एक विशेष प्रकारचे हँडग्लोव्हज तयार केलेआहेत . यामुळे टचस्क्रीनवर , कीबोर्ड किंवा मोबाइलवर बोटांच्या आधारे एसएमएस टाइप करणे यासारख्यागोष्टी हद्दपार होतील , असा दावा या संशोधकांनी केला आहे . ख्रिस्तोफ अम्मा व सहकाऱ्यांनी तयार केलेल्याग्लोव्हजमध्ये अॅक्सिलरोमीटर आणि गायरोस्कोप बसविण्यात आले असून , या आधारे हाताच्या हालचालीटिपल्या जातात . ही उपकरणे नंतर हवेत काढलेली अक्षरे ओळखतात व त्यांना डिजिटल टेक्स्टमध्ये कन्व्हर्टकरतात . हा डिजिटल टेक्स्ट नंतर वायरलेस माध्यमाद्वारे इमेल , एसएमएस किंवा मोबाइल अॅपमध्ये पाठवलाजातो . पॅटर्न रिक्गनिशन सॉफ्टवेअर ही सिस्टीम अक्षरे ओळखते . यामध्ये जवळपास आठ हजार शब्द आणिवाक्य लक्षात ठेवण्याची क्षमता आहे . अगदी कॅपिटल आणि स्मॉल लिखाण ओळखण्याचीही सुविधा यात आहे . सध्या यामध्ये ११ टक्के वेळा त्रुटी आढळून आल्या . मात्र , लिहिणाऱ्याची पद्धत लक्षात आल्यानंतर या त्रुटी तीन टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात . विशेष म्हणजे , हे ग्लोव्हज घालून एखादी व्यक्ती लिहीत आहे किंवा इतर काहीकाम करत आहे , हे ओळखण्याची सुविधा या तंत्रज्ञानामध्ये आहे . त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता कमी होईल .या संशोधनाला ८१ हजार डॉलर्सचा गुगल फॅकल्टी रिसर्च अवॉर्ड मिळाला असून , या आधारे मोबाइल किंवा इतरमाध्यमातून हवेत टाइप करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यास मदत होईल , अशी आशा संशोधकांना आहे . सध्या यावर संशोधन सुरू असून बाजारात विक्रीसाठी ते कधी खुले होईल , हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही . तरीभविष्यात जेव्हा केव्हा हे संशोधन सर्वसामान्यांच्या वापरात येईल तेव्हा , मात्र टायपिंगचा कंटाळा असणाऱ्यांचीसोय होईल . पण बोटांनी टाइप करण्यापेक्षा हवेत हात हलवून टाइप करण्याचा वेग निश्चितच कमी असणारअसल्याने टायपिंगचा वेग मात्र कमी होईल.
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech