आयबीएमने बनवला नॅनो चित्रपट
चित्रपट आपण सध्या मोठय़ा पडद्यावर पाहणे पसंत करतो, परंतु आता चित्रपट अगदी सूक्ष्म म्हणजे रेणवीय पातळीवर पाहू शकणार आहोत. आयबीएमने...
चित्रपट आपण सध्या मोठय़ा पडद्यावर पाहणे पसंत करतो, परंतु आता चित्रपट अगदी सूक्ष्म म्हणजे रेणवीय पातळीवर पाहू शकणार आहोत. आयबीएमने...
सुट्ट्यांमध्ये सर्वांचा टाइमपास म्हणजे फेसबुकवर वेळघालवणे . याच जोडीला आपण अशा काही गोष्टी करूशकतो , ज्यामुळे आपल्याला भविष्यात आपल्या करिअरलात्याचा फायदा होऊ शकतो . यासाठी तुम्हाला कुठल्याहीवर्कशॉपला किंवा घराच्या बाहेरही पडण्याची गरज नाही .अगदी घरी बसून तुम्ही तुमच्या या सर्व गोष्टी करू शकता .याबाबत सांगतायेत अनुपम भाटवडेकर आणि पराग मयेकर ब्लॉगर . कॉम आपल्या मनातील भावना , वाचनात येणाऱ्या चांगल्या गोष्टीकिंवा अगदी आपल्या आवडीच्या गोष्टी लिहून ठेवाव्याशावाटतात . वही पेन ऐवजी आपण कम्प्युटरचा वापरकरायला लागलो . पण या गोष्टी आणखी काही जणांशी शेअर करायच्या असतील , तर तुम्ही blogger.com यावेबसाइटवर तुमचा ब्लॉग क्रिएट करू शकता . त्या ब्लॉगची डिझाइन आणि त्यातले आर्टिकलही सेट करू शकता .ही वेबसाइट फ्री आहे आणि जर तुम्हाला तुमचा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा असेल , तरगुगलने अॅडसेन्स असा प्रोग्राम काढला आहे . ज्यात तुम्ही प्रत्येक महिनाला काही ठराविक रक्कम गुगलला देऊन ,आपल्या ब्लॉगला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकता . या वेबसाइटमध्ये गुगल टूल बार आणि सोशलसाइट्सचे इंटिग्रेशन आहे . त्यामुळे आपल्या ब्लॉगला इतर साइट्सद्वारेही बघता येतं आणि शेअर करता येतं . वर्डप्रेस . कॉम ही इंटरनॅशनल वेबसाइट आहे , अमेरिकेमध्ये याचा वापर जास्त होतो . या साइटवर विविध व्यवसायातील लोकआपले ब्लॉग्ज बनवत असतात . wordpress.com या साइटच्या माध्यमातून तयार केलेल्या ब्लॉगवर तुम्हीवेबसाइटमध्ये निरनिराळ्या थीम्स आणि टेमप्लेट्स दिले गेले आहेत . या वेबसाइटचे फीचर्स आहेत विड्जेट्सआणि प्लगिन्स इंटिग्रेशन , ज्याचा वापर आपल्या साइट्सच्या इंटरफेसमध्ये आणि इतर गोष्टींसाठी केला जातो .मल्टी - यूजर्स आणि मल्टी - ब्लॉगिंग करता येतं जेणेकरून आपली साइट्स आपल्या कंपनीमधली लोकं एकत्र पणचालवू शकतात . टॅगिंगमुळे साइट्स जास्तीत जास्त प्रदर्शित करू शकतो . टुम्बलर . कॉम तुम्हाला भारंभार लिहायला आवडत नसेल आणि ट्विटरपेक्षा जास्त स्पेस हवी असले तर तुम्ही मायक्रोब्लॉगिंगचा पर्याय स्वीकारू शकतात . यासाठी तुम्ही tumblr.com चा पर्याय निवडू शकतात . या वेबसाइटनेतुम्हाला डॅशबोर्ड , टॅगिंग , मोबाइल आणि एचटीएमएल कोडिंगचे फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत . याफीचर्सचा खूप उपयोग होतो आणि खूप चांगल्या तऱ्हेने आपला ब्लॉग लोकांसमोर सादर करता येतो . यासाइटच्या मदतीला Thoughts.com and Xanga.com या वेबसाइट्सही उपलब्ध आहेत . विक्स . कॉम तुम्हाला तुमचा फोटोग्राफिकल पोर्टफोलिओ किंवा पर्सनल वेबसाइट बनवायची असेल तर तुम्ही wix.com चापर्याय निवडू शकता . या साइटवर तुम्हाला ' ड्रॅग एण्ड ड्रॉप ' हा वेबसाइट बिल्डिंग प्लॅटफॉर्म एचटीएमएन ५ सहमिळतो . कॅपबिलिटीज , १००पेक्षा जास्त डिझायनर मॅड टेमप्लेट्स , टॉप ग्रेड होस्टिंग , इनोवेटिव्ह अॅप्स आणिविवध फीचर्स आहेत तेही फ्री . या वेबसाइटमध्ये खूप टेमप्लेट्स आहेत ज्यात बिझनस आणि पर्सनल असे विविधटेमप्लेट्स आहेत . या वेबसाइटध्ये बॅनर अॅड्स आहेत . वीबली . कॉम विविध एलिमेंट्स व्हिडीओज , फोटो गॅलरीज , मॅप्स , फॉरम्स , कॉंटॅक्ट फॉर्मस आणि इतर फीचर्स weebly.comया वेबसाइटमध्ये तुम्हाला वेग्रे थीम्स आणि टेमप्लेट्सचा वापर करून पर्सनल वेबसाइट्स आणि बिझनेसवेबसाइट्सही तयार करता येऊ शकते . ही सुद्धा ड्रॅग अँड ड्रॉप बेस्ड वेबसाइट आहे . ज्यात वेबसाइट बनवणं खूपसोपं आहे . या वेबसाइटला प्रोफेशनल लूकही देता यतो . ज्यांना वेबसाइट डिझाइन करण्याची आवड आहे , अशालोकांनी या वेबसाइटची मदत घेऊन काम करण्यास हरकत नाही . वेब्ज . कॉम ' ड्रॅग अॅण्ड ड्रॉप ' बेस्ड असेलेली ही आणखी एक वेबसाइट . यामध्ये तुम्हाला फेसबुक आणि ट्विटर यांच्या लिंक्सही तयार करता येणार आहेत . या वेबसाइटमध्ये बॅनर अॅड्स देण्यात आल्या आहेत . त्या अॅड्स जर आपल्याला नको असतील , तर आपल्याला पैसे भरावे लागतात . याचप्रकारे काम करणारी moonfruit.com अशीही एक वेबसाइट आहे . फेसबुक पेज या सुट्टीत तुमच्या आवडीच्या विषयावर एखादं फेसबुक पेज तयार करून ते आपल्या फेसबुक कंटेंट शेअर करूनत्यावर अधिकाधिक लाइक्स आणि कमेंटस मिळवू शकता . यात फोटोग्राफी , टेक्नॉलॉजी , म्युझिक , व्हिडीओज ,जोक्स , फूड अॅण्ड हॉटेल्स हे विषय सध्या हिट आहेत . या पेजमुळे तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून एखाद्याविषयावर अधिक संवाद घडवून आणला जाऊ शकतो . एकट्याने किंवा ग्रुपने फेसबुक पेज मॅनेज करण्याचापर्यायही उपलब्ध आहे . युट्यूब चॅनेल तुमच्यातील कला लोकांपर्यंत पोहचविण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून सध्या याकडे पाहिले जाते ....
आज मोबाइल जीवनावश्यक वस्तू बनली आहे. घराबाहेर निघताना मोबाइलला चार्जिंग आहे की नाही याविषयी खात्री करूनच बहुतेक जण घराबाहेर पडतात....
स्मार्टफोनने तर आपली दुनिया केव्हाच काबीज केली आहे. आता येणाऱ्या काळात टॅब्लेटही अशाच प्रकारे सर्वत्र दिसू लागतील, असे म्हटले जाते....
तंत्रज्ञानामुळे आतापर्यंत दररोजच्या आयुष्यात खूप बदल झालेत . बदलांची ही प्रक्रीया अशीच सातत्याने सुरू राहणार आहे . जगणं अधिकाधिक सोपं करण्याच्या दृष्टीने सध्या तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत . आयबीएमने नुकतेच आगामी पाच - दहा वर्षात लोकांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवू शकणाऱ्या काही संशोधनांची यादी जाहीर केली आहेत . सध्या सुरू असलेले संशोधन , नवनवीन तंत्रज्ञान आणि समाजातील ट्रेंड्सवरुन ही यादी तयार करण्यात आली आहे . दृष्टी सध्या गुगलचे गॉगल्स अॅप फोटोतील गोष्टी ओळखून त्यांची माहिती देते . पण येत्या दशकाअखेर कम्प्युटर केवळ छायाचित्रांवरून ओळख पटवणार नाही तर मानवाप्रमाणे पिक्सेलनुसार समोरची गोष्ट ओळखू शकेल .उदाहरणार्थ भविष्यात लाल सिग्नल पाहून थांबायचे आहे , हे कम्प्युटरला कळेल . किंवा एखाद्या व्यक्तीला कोणते कपडे योग्य दिसतात , हे सांगू शकेल . वस्त्रोद्योगात सध्या अधिकाधिक ऑनलाइन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या तंत्राचा उपयोग सुरू आहे . हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रासाठी खूप फायदेशीर ठरेल . त्यामुळे निरोगीपेशी आणि दूषित पेशींमधील फरकही ओळखता येऊ शकेल . स्पर्श गेल्या कित्येक दशकांपासून यंत्रांना स्पर्श आणि संवेदनांची जाणीव व्हावी यासाठी तज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत .त्यांना लवकरच यश मिळेल अशी चिन्हे आहेत . टचस्क्रीन मोबाइल , टॅबलेट ही त्याचीच सुरुवात आहे . सध्या इन्फ्रारेड , प्रेशर सेन्सिटिव्ह तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्श ओळखणे यासारख्या गोष्टींवर संशोधन सुरू आहे . त्यामुळे भविष्यात कम्प्युटरला कापडाला स्पर्शकरुन त्याचा प्रकार किंवा त्वचेला स्पर्श करून निदान करता येईल . गंध एखादा वास घेऊन तो फुलाचा आहे की कृत्रिम हे ओळखणे लवकरच कम्प्युटरला शक्य होणार आहे . त्यामुळे स्क्रीनवर पाहून चमचमीत खाद्यपदार्थाचा गंध सामावून घेणे शक्य होईल . एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून येणारा गंध , श्वासातील विविध घटक आणि शारीरिक हालचालींवर यंत्राच्या सहाय्याने डॉक्टर दमा , डायबिटीस ,फिट्स येणे , किडनीतील बिघाड वगैरे आजारांचे निदान करू शकतील . सध्या डिजीसेंट आणि ट्रायसेनएक्स या कंपन्या कम्प्युटरच्या मदतीने गंध तयार करणारे उपकरण तयार करत आहेत . डिजीसेंटने केमिकल स्ट्रक्चरच्या आधारे हजारो गंध एकत्र केले असून सेंट स्पेक्ट्रमच्या आधारे त्याच्या डिजिटायझेशनचे काम सुरू आहे . जेणेकरून कम्प्युटर गंध ओळखू शकेल . आयबीएमही सेन्सर्सच्या आधारे परिसरातील केमिकल्स गोळा करण्याचे तंत्र विकसित करत आहे . त्यावरून साफसफाई झाली आहे का , प्रदूषण किती आहे याचा अंदाज येऊ शकेल . सध्या पर्यावरणातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी किंवा दुर्मिळ कलाकृती जतन करण्यासाठी आयबीएम यातंत्राचा वापर करत आहे . चव विविध पदार्थातील मूळ घटकांच्या मॉलेक्युल्सची चाचणी करून , मानवी मनाला आवडणारी चव आणि गंधयांचा संयोग साधून चव ओळखण्याचे तंत्र तयार करत आहे . लक्षावधी रेसिपींची तुलना करुन आयबीएम हे तंत्र विकसित करते आहे . जपानमध्येही त्सुकुबा विद्यापीठात खाद्यपदार्थाची चव आणि त्यानंतर तोंडात तयार होणा -या विविध क्रियांचे विश्लेषण करण्यासाठी फूड सिम्युलेटर विकसित करण्यात गुंतले आहे . विविध केमिकल्स एकमेकांबरोबर कशी वागतात , त्यातील बाँडिंग स्ट्रक्चर यांच्या अल्गोरिदमचे विश्लेषण करुन चव ओळखण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत . ध्वनी कम्प्युटरने ध्वनीचे विश्लेषण सुरू केल्यानंतर आवाज , त्यामागील प्रेशर , ध्वनी तरंग ओळखणे सोपे होणार आहे .त्यामुळे परिसरात घडणा - या बारीकसारिक बदलांवरुन भविष्यातील हालचालींचे अंदाज वर्तवता येतील .उदाहरणार्थ , वा - याच्या आवाजात झालेला बदल यावरुन वादळ , भूकंप यांचा अंदाज वर्तवता येईल .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech