इंटरनेट

‘त्या’ ई-मेलवर लक्ष ठेवा

ईमेलच्या माध्यमातून घोटाळा होण्याचे प्रमाण वाढत आहे .सायबर गुन्हेगार विविध युक्त्या त्यासाठी शोधून काढत आहेत . वकील , पोलिस किंवा मित्रांच्या नावानेहीसंशयास्पद आशय असणारे ई - मेल आल्यास फसू नका . सायबर गुन्हेगारांनी घोटाळे काढण्यासाठी नवे मार्गशोधले आहेत . अशा प्रकारच्या ई - मेलमध्ये क्रेडिट कार्ड , बँक अकाऊंटबद्दल माहिती विचारणाऱ्या लिंक असतात . नुकताच मारुती उद्योग कर्मचारी भरती करीत असून ,  अंतिम मुलाखतीसाठी दिल्लीला येण्यासाठी रक्कमजमा करा , अशा आशयाचा ई - मेल एकाला आला ; तसेच तुमच्या विरूद्ध स्थानिक कोर्टात खटला दाखल झालाआहे , अशा आशयाचेही ई - मेल येऊ लागले आहेत . असे ई - मेल हे पूर्ण अभ्यास करूनच पाठविण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांत इंटरनेट वापरणाऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्या प्रमाणात सायबरगुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे . इंटरनेट वापरणारे नवखे युजर , अशा ई - मेलना बळी पडत आहेत . इंटरनेट स्कॅमचा सर्वांत मोठा स्रोत भारत होता . पण आता हा क्रम बदलला असून चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा क्रमांकलागतो आहे , असे इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाचे म्हणणे आहे .  काही दिवसांपूर्वी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्याने दंड जमा करण्याची मागणी करणारा एक मेल चेन्नईत एकाला मिळाला . त्यात क्रेडिट कार्डने पेमेंट करण्यासाठीच्या अनेक लिंक किंवा स्टेट बँकेच्या अमूक एकाअकाऊंटमध्ये पैसे भरा , असे लिहिले होते . मात्र , पोलिसांकडून असा कोणताही ई - मेल पाठविण्यात आलानसल्याचे स्पष्ट झाले . त्यामुळे वकील , पोलिसांच्या नावाचा वापरही सायबर गुन्हेगार करू लागले आहेत .  इंटरनेट वापरणाऱ्यांनी कोणताही पैसे मागणाऱ्या ई - मेल आल्यास त्याला प्रतिसाद देता काम नये . बँका कधीहीई - मेलमार्फत पैशाची मागणी करीत नाहीत . त्यामुळे इंटरनेट युजर्सनी अशा ई - मेलबाबत सजग राहण्याचीगरज आहे . ई - मेलमध्येही एखादा मेल फिशिंग स्कॅम असल्याचे नोटिफिकेशन येण्यास सुरुवात झाली आहे . 'अनेक लोकांनी यास फिशिंग स्कॅम मेल , असे शेरा दिला आहे . त्यामुळे यात असुरक्षित आशय असू शकतो ,' असेनोटिफिकेशन मेलमध्ये येत आहे . त्यामुळे त्याकडे युजरनी लक्ष द्यायला हवे .  email, junk, spam

‘जी-मेल’ने केला प्रायव्हसीचा भंग? ‘ गुगल ‘ ची खेळी संशयास्पद.

यूजरने पाठविलेला (सेन्ट) किंवा स्वीकारलेला (इनबॉक्स) प्रत्येक मेल गुगलतर्फे वाचला जातो , असा खळबळजनक दावा सॉफ्टवेअरनिर्मात्या ' मायक्रोसॉफ्ट ' ने केला आहे.  ' डोंट गेट स्क्रूगल्ड बाय जी-मेल ' या...

गुगलचे हँगआऊट जीमेलवर : मित्रांसोबत चॅट जीमेलचा नवा पर्याय

ग्रुप चॅट तेही व्हिडिओवर करण्याची धम्माल आता जीमेलवर उपलब्ध होणार आहे . गुगलने नुकतेच आपल्या ग्रुप व्हिडीओ चॅटिंगची हँगआऊट सेवा भारतीय युजर्ससाठी लाँच केली .यामध्ये आपण एकाच वेळी नऊ जणांशी बोलू शकणारआहोत .  ही सेवा वापरण्यासाठी युजर्सनी केवळ जीटॉकच्या पॅनेलशेजारी असलेल्या व्हिडीओ कॅमेरावर क्लिक करायचे आहे . यानंतर एक नवीन विंडो पॉप - अप होईल . यात गुगल प्लसमधील आपल्या मित्रांची यादी दिसणार आहे .यामध्ये आपण त्यांच्या जीमेल आयडीवर क्लिक करून त्यांना व्हिडीओ चॅटलिस्टमध्ये अॅड करू शकतो .                      गुगल प्लसमध्ये नसलेल्या एखाद्या मित्राशी आपल्याला चॅट करायचे असेल तर आपण जीमेल आयडीवरून त्यांना इन्व्हिटेशन पाठवू शकतो . हे चॅट आपण हँगआऊट या फिचरचा वापर करून सर्वांसाठी खुले करू शकतो . यासाठी युट्यूबचे अकाऊंट लागते . यानंतर ते चॅट ब्रॉडकास्ट होताना दिसेल . आपण त्या ग्रुपमध्ये करत असलेल्या विविध चर्चा आपल्या फोटोसह सर्वांना पाहवयास मिळणार आहेत . एकदा हँगआऊट सुरू झाले की , आपल्या ग्रुपमेंबर्सची यादी आपल्याला स्क्रीनच्या खालच्या बाजूस दिसते तर व्हिडीओ वरच्या बाजूस दिसतो . जीमेलच्या विंडोच्या डाव्या बाजूला चॅट्स , स्क्रीनशेअर , गुगल ड्राइव्ह , गुगल डॉक्स , इफेक्ट्स आणि पिंग पाँग हँगआऊट असे पर्याय दिसू लागतील . चॅट आणि हँगआऊटच्या माध्यमातून मित्रांना मेसेजेसही पाठवता येणार आहेत . तर स्क्रीनशेअर या सुविधेमध्ये मित्रांशी स्क्रीनशॉट शेअर करता येणार आहेत . हे शेअर केल्यावर आपल्या ग्रुपमधील सर्व मेंबर्सना तो व्हिडीओ पाहता येणार आहे . गुगल ड्राइव्ह आणि गुगल डॉक्स हे व्हिडीओ चॅट्समध्ये अधिक गंमत आणतील , असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे .  हँगआऊटमध्ये जाऊन मज्जा - मस्ती करायची असेल तर गुगलने हँगआऊटमध्ये गेम्सचीही सुविधा दिली आहे .यामध्ये आपल्या ग्रुपमधील एखाद्याशी गेम्स खेळता येणार आहेत . याचबरोबर यामध्ये आपण विविध वॉलपेपर्स ,साऊंड इफेक्ट्स , फोटो आदी गोष्टी आणि आपल्या आवडीचे अॅप्सही वापरू शकणार आहोत . भविष्यात गुगलच्या सर्व सुविधा म्हणजे कॅलेंडर , ई - मेल यालाही हँगआऊट करता येणार आहे . म्हणजे एकाच वेळी आपण एखादी गोष्ट आपल्या विविध मित्रांशी शेअर करू शकतो . त्यामुळे आता मित्रांसोबत हँगआऊट करण्यासाठी जीमेलचा नवा पर्याय खुला झाला आहे . 

मोबाईल इंटरनेट वापर वाढला

मोबाईल इंटरनेट वापर वाढला

सायबर कॅफेत जाण्याऐवजी मोबाईलवर इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषत: महाविद्यालयीन युवक-युवती फेसबुक, ऑर्कुट, ट्‌विटर यासारख्या सोशल वेबसाईटवर...

गुगलच्या भाषांतराचे अजब-गजब !

देशात राजकीय पक्षांपासून सर्वांनाच सध्या लोकसभा निवडणूकांचे वेध लागले असताना गुगललाही ते लागल्याचे दिसतेय. म्हणून तर ' सोनिया जी आ रही है ' असे टाईप...

Page 29 of 32 1 28 29 30 32
ADVERTISEMENT
error: Content is protected!