ई-मेलचे मॅनेजमेंट
दोन तास १४ मिनिटे ... आपण दिवसातील एवढा वेळ ई -मेल तपासण्यासाठी घालवत असतो . याचाच अर्थ असा की आपण आपले ई - मेल्स तपासणे आणि त्याला उत्तरे देण्यासाठी आपल्या कामाच्या वेळेतील २५ टक्के वेळ खर्च करत असतो . मॅकेन्सीने नुकतेच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार सन २०१२मध्ये ' ई - मेल ' हे दैनंदिन कामातील सर्वात मोठे काम असल्याचे समोर आले आहे . इनबॉक्समध्ये येणाऱ्या ई - कॉमर्स किंवा डिस्काउंटच्या जाहिराती त्रासदायक ठरतात . बड्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या एका माणसाला दिवसाला किमान १०० ई - मेल्स वाचायचे असतात . ही माहिती टेक्नॉलॉजी मार्केटिंग फर्म रडेकटी ग्रुपने केलेल्या पाहणीत समोर आली आहे . यातील बहुतांश मेल्स डीलीट करण्यात वेळ वाया जातो . कामाच्या गडबडीत वेळ वाचवायचा असेल तर काही सुविधांचा वापर करता येऊ शकेल . अनरोल डॉट मी (Unroll.me) - यामध्ये सर्व ई - मेल्सच्या इनबॉक्समधील जाहिरातींचे मेल्स आपण एकाच वेळी जमा करू शकतो . याला ' डेली डायजेस्ट ' म्हणतात . तुमच्या मेल्समधील मसेजेस इथं आले की , तुम्ही ते सर्व ई -मेल्स डिलिट करू शकतात . ही सेवा जीमेल आणि याहू मेल यांच्यासाठी उपलब्ध आहे . फॅन मिक्स (FanMix) - जे सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करतात अशा युजर्ससाठी ही सेवा उपयुक्त ठरूशकते . यामध्ये आपल्या ई - मेलवर येणारे सर्व नोटिफिकेशन्स एकत्र केली जातात . याचा फायदा असा की ,आपल्याला ट्विटर , फेसबुक , लिंक्डइन आणि ब्लॉग कन्व्हरसेशन एका ठिकाणी दिसू शकतात . यात आपल्याला फेसबुक नोटिफिकेशनबरोबरच फेसबुक मेसेजेसही पहावयास मिळतात . सेनबॉक्स (SaneBox) - या सेवेमध्ये महत्त्वाचे नसलेले ई - मेल्स एकत्रित केले जातात . जेणेकरून इनबॉक्समध्ये आपल्याला केवळ महत्त्वाचे मेल्स उपलब्ध राहतील . ही सुविधा आपण जीमेल , याहू , एओएल , अॅपल मेल ,आऊटलूक , आयफोन , अँड्रॉइड या सर्वांसाठी उपलब्ध आहे . द ई - मेल गेम (The Email Game) - आपला इनबॉक्समध्ये एकही बिनकामाचा मेल न ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे ' द ई - मेल गेम ' यामध्ये आपल्या इनबॉक्समधील मेल्सचे व्यवस्थित बायफरकेशन केले जाते .यामुळे आपला इनबॉक्स अधिक स्वच्छ दिसू शकतो . झीरो बॉक्सर (0Boxer) - ही एक जीमेलची प्लगइन टूल आहे . या माध्यमातून आपण आपले मेल्स अर्काइव्हमध्ये ठेऊ शकतो तसेच आपल्या ई - मेल्सला रिप्लायही देऊ शकतो . ही सुविधा सध्या बीटा मोडमध्ये उपलब्ध आहे .पण या सुविधेमध्येही आपण आपला इनबॉक्समध्ये एकही मेल राहणार नाही याची काळजी घेऊ शकतो .