eCommerce

ई कॉमर्स म्हणजे ऑनलाइन व्यापार (खरेदी-विक्री)...थोडक्यात ऑनलाइन शॉपिंग फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, इबे, myntra, बुकमायशो, स्नॅपडील अशा वेबसाईट्स संबंधित घडामोडींची माहिती... eCommerce in Marathi

अॅमेझॉन.com भारतीय बाजारात

अॅमेझॉन डॉट कॉम या जगप्रसिद्ध ऑनलाइन रिटेल कंपनीने भारतीय ई-कॉमर्स मार्केटमध्ये पाऊल ठेवले आहे. भारतीय बाजारात ती ' अॅमेझॉन डॉट इन ' या नावाने...

किराणामाल खरेदी करा ‘ऑनलाइन’

'एलबीटी' विरोधातील बंदमुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू वेळेवर मिळत नसल्याने गैरसोयीचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध असलेला ऑनलाइन ग्रोसरी स्टोअरचा पर्याय...

मोबाइल शॉपिंग जोरात

मोबाइल शॉपिंग जोरात

हातात स्मार्टफोन आला आणि कुठलीही कामं एका क्लिकवर होऊ लागली. कडक उन्हाळ्याच्या या दिवसांत तर बहुतेकांनी , दुकानांमध्ये जाऊन घामाघूम होत खरेदी...

शॉपिंग ‘ऑन’लाइन

हल्ली सगळंकाही ऑनलाइन असतं . मित्र - मैत्रिणी , गप्पा ,रूसवे - फुगवे , भेटीगाठी , प्रेम इतकंच काय तर अगदी लग्न -पत्रिकाही आणि इव्हेण्ट्सही . मग या सगळ्यात गिफ्ट्स आणि त्यासाठी केलं जाणारं शॉपिंगही . जवळपास सगळीपेमेण्ट्स ऑनलाइन करण्याचीही हल्ली सोय आहे . रांगेत उभे राहून वेळ घालवत ' सुट्टे पैसे द्या ', ' ही नोटचालणार नाही ' अशी काही कटकट सहन करण्यापेक्षा ऑनलाइन पेमेण्टचा पर्याय आजकाल अनेकजण अवलंबतात.  शॉपिंगप्रमाणे मोबाइल आणि ऑनलाइन बँकिंगचा ट्रेण्डही एकीकडे झपाट्याने पसरत आहे . बँकेतल्या गदीर्लाफाटा देत या नव्या पर्यायांकडे लोकांचा ओढा वाढत आहे . पण हे करत असताना अनेकदा फसल्या जाण्याचीशक्यताही असते .  त्यापासून काळजी घेण्यासाठीच या काही टिप्स  ऑनलाइन शॉपिंग टिप्स  * शक्यतो नावाजलेल्या वेबसाइट्सवरून शॉपिंग करा . जेणे करून काही अडचण आल्यास त्यांच्याशी थेट संपर्कसाधता येतो .  * कोणत्याही साइटवरून शॉपिंग करताना खाली ' लॉक सिम्बॉल ' आहे का याची खात्री करून घ्या . आणि पेमेण्टकरताना आपल्या ब्राउजरवर असणाऱ्या अॅड्रेस बारमध्ये द्धह्लह्लश्चह्य आहे याकडे लक्ष असू द्या , कारण सुरक्षितव्यवहार होत असल्याची ती खूण असते .  * कोणतीही शॉपिंग वेबसाइट तुमची जन्मतारीख किंवा तुमची अन्य माहिती मागवत नाही . पण जर तुमचीजन्मतारीख आणि क्रेडीट - डेबिट कार्ड नंबर जर कोणाला मिळाला तर ते कॉम्बीनेशन करून कार्ड वापरायचाप्रयत्न करू शकतात .  * आपले क्रेडीट आणि बँक स्टेटमेण्ट चेक करत राहा आणि कोणतेही अन्य चाजेर्स लावलेले नाहीत हे पडताळा .  * तुमचा कॉम्पुटरवर अपडेेटेड अॅण्टिव्हायरस आणि लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स इन्स्टॉल्ड आहेत याकडेलक्ष असू द्या .  * आपला पासवर्ड कोणाला सहज कळेल असा नसावा .  * शक्यतो बाहेरच्या मशीन्सवरून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करणे टाळावे .  * वायफाय नेटवर्क सिक्युअर्ड आणि पासवर्ड प्रोटेक्टेड असावे .  ऑनलाइन बँकिंग टिप्स  * बँकेच्या साइटवर नेहमीच नवीन लिंक ओपन करून जावे . इ - मेलमध्ये आलेली लिंक ओपन करू नये . आणितशी कोणती लिंक आल्यास बँकेला कळवावे .  * कुठलीही बँक कधीही तुमची खासगी माहिती परत मागत नाही . तुम्हाला त्यासंबंधीचा एखादा मेल आला तरीती माहिती बँकेत जाऊन द्यावी . त्या मेलवरून माहिती देऊ नये .  * आपला मोबाइल नंबर रजिस्टर्ड असल्यास आपल्याला ठराविक रकमेच्या व्यवहारांसाठी तुम्हाला एसएमएसअलर्ट येऊ शकतात .  * बँक स्टेटमेण्ट जर काही वेगळे आढळले तर लगेच बँकेशी संपर्क साधावा .  * ऑनलाइन बँकिंग वापरून झाल्यावर अकाउण्ट नेहमी लॉगआउट करावे . 

Page 14 of 15 1 13 14 15
ADVERTISEMENT
error: Content is protected!